आता तुमच्या फ्लिपकार्टवरच्या ऑर्डरचा पाठपुरावा करणे (ट्रॅकिंग) झाले आणखी सोपे. हा पहा एक झटपट मार्गदर्शक!

Read this article in हिन्दी | English | ಕನ್ನಡ | বাংলা | தமிழ் | ગુજરાતી

तुमची फ्लिपकार्ट ऑर्डर कधी हातात पडेल म्हणून अधीर झालात? फ्लिपकार्ट अ‍ॅपवरचे अपडेटस आणि नवीन फीचर्समुळे तुमची ऑर्डर ट्रॅक करणे आणखी सोपे झाले आहे. त्यामुळे तुमच्या घराची बेल कधी वाजेल याचे अंदाज लावत बसायची अजिबात गरज नाही. तुमच्यासाठी गरजेची असलेली माहिती ही अशी.

Flipkart order

फ्लिपकार्ट सेलमधल्या सगळ्या आश्चर्यकारक डील्सचा लाभ घेण्यापेक्षा अधिक आकर्षक काय असू शकतं? अर्थातच, तुमची फ्लिपकार्ट ऑर्डर घरपोच हातात मिळणं!

फ्लिपकार्टचा नवीन व अपडेटेड My Orders टॅब तुमच्या फ्लिपकार्ट ऑर्डरचा तुमच्या मोबाईल अ‍ॅपमधून होणारा पाठपुरावा सोपा करतो. तुम्ही ऑर्डर दिल्यापासून ते पॅकिंग आणि शिपिंगच्या कुठल्या टप्प्यावर ती आहे इथेपर्यंतची सगळी माहिती तुम्हाला मिळू शकेल. त्यासाठी दर मिनिटाला दाराच्या कीहोलमधून बघायची किंवा श्वास रोखून फोन कॉलची वाट पाहण्याची काहीच गरज नाही!

असे चालते याचे काम.

तुमची ऑर्डर द्या

तुम्ही एकदा फ्लिपकार्ट अ‍प, एम-साईट किंवा डेस्कटॉप वेबसाईटवरून लॉग-इन केले की मग तुम्ही फ्लिपकार्टचे बिग बिलियन डेज् सेल, विविध फ्लॅश सेल्स, डील्स ऑफ दी डे किंवा पूर्ण वर्षभरातल्या ऑफर्स यापैकी कशाचाही भरपूर लाभ घेतला तरी, तुमच्या सगळ्या ऑर्डर्स सेव्ह आणि लिस्टेड करून ठेवल्या जातात. तुम्ही कोणताही पेमेंट पर्याय निवडलेला असो – नेट बँकिंग किंवा क्रेडिट/डेबिट कार्ड, Flipkart Pay Later, CoD or PhonePe Wallet — हे अ‍प तुम्हाला सरळ ट्रॅकिंगच्या पानावर घेऊन जाईल.


माझ्या ऑर्डरवर जा

तुम्हाला नंतर तुमच्या फ्लिपकार्ट ऑर्डरचा पाठपुरावा करायचा असेल तेव्हा तुमचे फ्लिपकार्ट अ‍प, एम-साईट अथवा डेस्कटॉप साइट वरून फक्त इथे जा My Orders


आपली ऑर्डर निवडा

एकदा तुम्ही My Orders वर टॅप केले की तुमची प्रत्येक ऑर्डर तिथे सूचीबध्द केलेली तुम्हाला पाहता येईल. तुम्ही ऑर्डर केलेल्या सर्व वस्तू पाहण्यासाठी स्क्रोल करा. त्यात तुम्हाला उत्पादनाचे नाव, छायाचित्र आणि ते तुम्हाला कधी मिळणार अथवा मिळाले आहे त्याची सूचना खाली दिसेल.

Flipkart order
फ्लिपकार्ट डेस्कटॉप साईटवर तुमच्या ऑर्डरच्या पाठपुराव्याचे तपशील जाणून घेण्यासाठी ‘Track’वर क्लिक करा

ऑर्डर ट्रॅकिंग तपशील मिळवा

फ्लिपकार्ट मोबाईल अ‍पमध्ये तुम्हाला एक उभी रेषा दिसेल जी तुमची ऑर्डर घरपोच येईपर्यंतचा क्रम दाखवते. या क्रमामध्ये चार टप्पे आहेत – Ordered & Approved, Packed, Shipped and Delivery तुमची ऑर्डर या प्रक्रियेतील कोणत्या टप्प्यावर आहे त्यानुसार रेषेचा रंग हिरवा अथवा राखाडी असतो. सर्वात अलीकडचा टप्पा गोलाकार चिन्हाने ठळकपणे दाखवलेला असतो. उदाहरणार्थ, जर तुमची ऑर्डर पाठवलेली असेल तर Shipped या तिसऱ्या टप्प्याकडे तुमचे लक्ष वेधण्यासाठी गडद फिके होणारे गोलाकार चिन्ह तुम्हाला त्या रेषेवर दिसेल.

Flipkart order
तुमच्या फ्लिपकार्ट मोबाईल अ‍ॅपमध्ये प्रत्येक ऑर्डरच्या पाठपुराव्याचे तपशील मिळवा

Flipkart order


आणि अधिक तपशील

अधिक तपशील हवे आहेत का? चारपैकी कोणत्याही एका टप्प्यावर फक्त क्लिक करा आणि तुम्हाला तुमच्या ऑर्डरच्या अपेक्षित डिलिव्हरीच्या तारखेसहीत ऑर्डरसंबंधीचे सर्व तपशील पहायला मिळतील. उदाहरणार्थ, जर तुमची ऑर्डर पाठवली गेली असेल तर ती कुठून पाठवली, कुठे मिळाली आणि तेथून कधी निघाली हे संबंधित तारखांसहीत तुम्ही बघू शकता. मुख्य मेनू वर परत जाण्यासाठी तुमच्या स्मार्टफोनवर बॅक हे बटन दाबा.

Flipkart order
डेस्कटॉपच्या फ्लिपकार्ट साइटवर तुम्ही अपेक्षित वितरणाच्या तारखेसह ऑर्डरसंबंधीचे सगळे तपशील पाहू शकता

आपल्या ऑर्डरसह अधिक करा

तुमच्या ऑर्डरचा पाठपुरावा करण्याशिवाय आणखी काही करायचे आहे? वस्तू घरपोच येण्याच्या क्रमात तुम्हाला दोन मोठे टॅब्ज दिसतील: ‘Cancel’ and ‘Need Help?’ तुमची ऑर्डर कारण नमूद करून रद्द करण्यासाठी ‘Cancel’ वर टॅप करा आणि ही प्रक्रिया सहज पूर्ण करण्यासाठी त्या पानावरील पर्याय निवडा.


आपल्या फ्लिपकार्ट ऑर्डरसाठी मदत हवी आहे?

‘Need Help?’ वर टॅप केल्यावर तुम्हाला दुसरा स्क्रीन दिसेल, जिथे तुम्हाला तुमच्या ऑर्डरसंबंधीचा विषय निवडता येईल. मग ते रद्द करण्याविषयी असेल, returns, सवलत किंवा पेमेंटस्विषयी असेल. इथे तुम्हाला ‘माझ्या ऑर्डरला कॅशबॅक लागू होतो का हे मी कसे तपासायचे?’ किंवा ‘माझ्या ऑर्डरला उशीर झाला आहे’ अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील. त्वरीत उत्तर शोधण्यासाठी संबंधित विषयावर क्लिक करा.


अधिक मदतीसाठी फ्लिपकार्ट ग्राहक समर्थनाशी संपर्क साधा

तुम्हाला अधिक मदतीची गरज असेल तर पानाच्या तळाशी असलेल्या Contact Us या बटणावर क्लिक करा. इथे तुम्हाला तुमचा प्रश्न अथवा समस्या सोडविण्यासाठी फ्लिपकार्टच्या टीमला ई-मेल पाठवता येईल किंवा चॅट करता येईल.


फ्लिपकार्ट ऑर्डर अद्यतनांची सदस्यता घ्या

तुमच्या ऑर्डरचा पाठपुरावा करणे अधिक सोपे आणि सोयीस्कर करण्यासाठी, आता तुम्ही मुख्य पानावरील दोन अतिरिक्त फीचर्स निवडू शकता. तुमच्या ऑर्डरचे ऑटोमॅटिक अपडेटस् मिळविण्यासाठी छोट्या निळ्या घंटेचे चिन्ह असलेल्या Subscribe to Updates वर क्लिक करा. याप्रकारे अ‍ॅप न उघडताही तुम्हाला तुमच्या ऑर्डरविषयी सर्व माहिती जाणून घेता येईल.

Flipkart order
तुमचे फ्लिपकार्ट अ‍ॅप तुमचे ऑर्डरसंबंधीचे तपशील टप्प्याटप्प्याने अपडेट करते
Flipkart order
फ्लिपकार्टच्या डेस्कटॉप साईटवर तुमच्या अकाऊंटवर लॉग-इन केल्यावर तुमच्या ऑर्डरची प्रगती पहा

आपले फ्लिपकार्ट ऑर्डर तपशील सामायिक करा

याच पद्धतीने, तुम्ही लाभ घेत असलेली फिचर्स, जसे, तुमच्या ऑर्डरचा पाठपुरावा करणे, ती रद्द करणे, एक्सचेंज करणे किंवा कोणाबरोबर तरी बदलून घेणे हे सर्व शेअर करण्यासाठी Share order details वर टॅप करा. दुसर्‍या शहरात राहणारी तुमची बहीण किंवा तुमच्या एखाद्या मित्रासाठी तुम्ही खरेदी केलेली वाढदिवसाची भेट, यांसारख्या इतरांसाठी मागवलेल्या ऑर्डर्सकरीता ही सुविधा आहे. फक्त त्यांचा दूरध्वनी क्रमांक आणि नाव तिथे लिहा आणि त्यांनाही सहजपणे पाठपुरावा करता यावा म्हणून Share वर क्लिक करा!

Flipkart order
घरी नाही आहात? वेळेवर डिलिव्हरी मिळावी यासाठी तुमच्या घरातील सदस्य किंवा मित्राला तुमच्या ऑर्डरचे तपशील द्या.

आपले फ्लिपकार्ट प्लस पुरस्कार पहा

डिलिव्हरीशी संबंधित नाव आणि पत्त्यासह तुमच्या ऑर्डरचे शिपिंग तपशील पाहण्यासाठी मुख्य पानावर स्क्रोल डाउन करा. तुम्ही तुमच्या ऑर्डरवर फ्लिपकार्ट कॉईन्ससारखी काही रिवॉर्डस् मिळाली असतील तर तिथे खाली तुम्हाला ते दिसू शकेल, ज्यामुळे तुम्हाला फ्लिपकार्ट प्लसचे फायदे प्राप्त होतात. वस्तू परत करण्यासाठीचा कालावधी संपल्यानंतर ती कॉईन्स तुमच्या नावे जमा केली जातील.


बिलिंग तपशील पहा

या खाली तुम्ही तुमच्या ऑर्डरशी संबंधित यादी मधील किंमत (लिस्ट प्राइस), विक्रीची किंमत (सेलिंग प्राईस), शिपिंग फी, एकूण रक्कम, ऑफर्स आणि देय पध्दत (पेमेंट मोड) पाहू शकाल. ऑफर टॅब वर लक्ष द्या कारण यामध्ये तुमच्या पुढील खरेदीच्या वेळेस तुम्हाला मिळणार्‍या ऑफरविषयी लिहिले असेल ज्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. कसे हे जाणून घेण्यासाठी फक्त Know More button या बटणावर क्लिक करा!

तुमच्या ऑर्डरचा पाठपुरावा करण्याच्या नवीन व सोप्या पध्दतीसह, फ्लिपकार्टवर खरेदी करणे पूर्वीपेक्षा अधिकच आनंददायक बनते! तर मग आज तुमच्या wishlist मध्ये काय आहे?

Enjoy shopping on Flipkart