फ्लिपकार्ट प्रोडक्ट्स परत करण्याची प्रक्रिया – हे कसे काम करते आणि तुम्ही काय मनात ठेवले पाहिजे.

Read this article in हिन्दी | English | বাংলা | தமிழ் | ಕನ್ನಡ | ગુજરાતી | తెలుగు

तुम्हाला फ्लिपकार्ट प्रोडक्ट्स परत करण्याच्या पॉलिसीबाबत काही प्रश्न आहेत का? हे सोपे गाईड फ्लिपकार्ट प्रोडक्ट्स परत करण्याची प्रक्रिया कशी काम करते आणि तुमचा खरेदीचा आणि प्रोडक्ट्स परत करण्याचा अनुभव सोपा आणि सूटसुटीत कसा करते ते तुम्हाला समजावून सांगेल.

नलाईन खरेदी सोपी आणि जलद होते. तुम्हाला आवडणाऱ्या वस्तू थोड्या क्लिक्स किंवा टॅप्स करून विकत घेण्यातील समाधान आणि सोय तुम्हाला आनंददायी वाटतील. मात्र कधी कधी तुमची वस्तू तुमच्याकडे येते तेव्हा तुम्हाला समजते की ती तुमच्या अपेखेप्रमाणे नाही. ती हव्या त्या मोज-मापाची, रंगाची किंवा क्वचित् प्रसंगी सदोष किंवा नुकसान झालेलीही असू शकते. आता तुम्ही काय करणार? अशाच वेळी फ्लिपकार्ट प्रोडक्ट परत करण्याची प्रक्रिया तुमचे काम सोपे करते.


फ्लिपकार्ट प्रोडक्ट परतीची प्रक्रिया समजावून सांगितली

हे रेफरन्स गाईड तुम्हाला फ्लिपकार्ट प्रोडक्ट परतीची प्रक्रिया कशी काम करते ते समजून घेण्यास मदत करेल:
Flipkart product returns

 

येथे हे फ्लिपकार्ट प्रोडक्ट परत करण्याची प्रक्रिया काम कसे करते:

 1. फ्लिपकार्टला लॉग इन करा आणि तुमच्या ऑर्डर्स वर जाटॅप किंवा क्लिक ऑन रिटर्न टू अर्ज तयार करणे.
 2. तुमच्याशी संबंधित निवडा रिटर्नचे कारण — कोण्या बेसिसवर बदलण्याचा ऑप्शन, लागू होतो, दिसू लागेल. तीन ऑप्शन्स असतील:
  • बदलून मिळेल: तुमची ऑर्डर नव्या वेगळ्या मापाच्या किंवा रंगाच्या त्याच वस्तुसाठी बदलून मिळेल
  • बदला: जर तुमच्या ऑर्डरमधील वस्तूचे नुकसान (मोडलेली) अथवा खराब अथवा निकामी (सर्व फंक्शन्स चालत नाहीत) असे असेल तर ती तशाच नव्या वस्तूने बदलून मिळेल.
  • रिफंड: जर तुम्हाला बलून देण्यासाठी आमच्याकडे तीच वस्तू त्याच मापात अथवा रंगात, मॉडेल मध्ये उपलब्ध नसेल किंवा ती स्टॉकमध्ये नसेल तर तुम्ही निर्णय घेऊ शकता की तुम्हाला तुमचे पैसे परत पाहिजे आहेत. अशा प्रसंगी तुम्ही रिफंडचा पर्याय निवडू शकता (स्टेप ६ पहा)
 3. तुम्ही परत करू इच्छिणारी वस्तू कोणत्या प्रकारची असेल त्याप्रमाणे तुमचा रिटर्न अर्ज पडताळण्याच्या प्रक्रियेतून पाठविला जातो
 4. पडताळणी झाल्यावर, तुम्ही ऑर्डर केलेल्या वस्तूच्या वर्गवारीप्रमाणे तुम्हला तुमचा निर्णय द्यावा लागतो.
 5. रिटर्न प्रक्रिया सुलभ होण्यासाठी आवश्यक ते सर्व गोष्टी तयार ठेवा — त्यात इनव्हॉईस, मूळ वस्तूवरील किमतीचा टॅग, मोफत, अॅक्सेसरीज इत्यादी.
 6. एक्चेंज व बदलून द्यावयाच्या वस्तूंबाबत तुम्हाला तुमची ऑर्डर कधी घेऊन जायची आहे किंवा पोचविली जाणार आहे याची माहिती कळविण्यात येईल
 7. रिफंडची प्रक्रिया जरूर असल्यास सुरु केली जाईल
 8. फ्लिपकार्टच्या रिटर्न/बदलणे गॅरंटी प्रमाणे तुमच्या अर्जावर कृती केली जाईल

फ्लिपकार्टच्या रिटर्न्स प्रक्रियेला किती वेळा लागतो?

तुम्ही रिटर्न अर्ज दिल्याबरोबर तुम्हाला तुमच्या रजिस्टर केलेल्या इमेलच्या पत्त्यावर तुम्हाला एक इमेल आणि रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर एक संदेश येईल. तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर किंवा स्मार्ट फोनवर माय अकाउंट येथे जाऊन माय ऑर्डर्सवर क्लिक करून रिटर्नची सर्व प्रक्रिया ट्रॅक करू शकता. जर तुम्ही एक्चेंजची मागणी करणार असाल तर बहुतेक वेळी तुम्हाला बदलून द्यावयाची वस्तू तुम्हाला वस्तू पिक-अपच्या वेळीच दिली जाते. हे ठेवण्यास विसरू नका tracking your order.

येथे क्लिक करा फ्लिपकार्टप्रोडक्ट रिटर्न्सबाबत अधिक माहितीसाठी


वेगवेगळ्या प्रोडक्ट वर्गवारीच्या फ्लिपकार्टप्रोडक्ट रिटर्न्स पॉलिसीबाबत

या पॉलिसीतील नियमाप्रमाणे वस्तू रिटर्न्सची सुविधा याच्या थेट अधिकाराखाली येणाऱ्या सेलर्सना लागू असून त्याप्रमाणे वस्तू बदलून देणे आणि/किंवा रिफंड देणे हे पर्यात ते सेलर्स तुम्हाला देतात.
आमच्या पाठीशी असलेल्या एकनिष्ठ गिऱ्हाइकांचा विचार करून या रिटर्न्स पॉलिसीमध्ये आम्ही अनेक बदल करीत आलेले आहोत.
एक हलकासा इशारा, एकाच प्रकाराखाली यादीत असलेल्या सर्व प्रॉडक्ट्सना एकच रिटर्न्स पॉलिसी असेल असे नाही.

आमची रिटर्न पॉलिसी समजून घेण्यासाठी ४ बादल्या विचारात घ्या

 • ७ दिवस

सर्व इलेक्ट्रोनिक्स(मोठी साधने, मोबाईल्स, लॅपटॅप्स इत्यादी.) आणि लाइफस्टाइलमध्ये काही व्हर्टिकल्स वस्तूंसाठी तुम्ही बदलून घेण्यासाठी डिलिव्हरी नंतर जास्तीत जास्त ७ दिवसात अर्ज देऊ शकता. येथे क्लिक करा अधिक माहितीसाठी. काही ब्रँडेड वस्तू, त्यांच्या पॉलिसी प्रमाणे तुम्हाला नुकसान झालेल्या वस्तू त्यांच्या नजीकच्या अधिकृत सर्विस सेंटरमध्ये नेण्यास सांगण्याची शक्यता असते.

 • १० दिवस

मोठ्या व फर्निचर प्रकारच्या वस्तू बदलून देण्याचा अर्ज डिलिव्हरीनंतर फक्त १० दिवसात द्यावा लागतो. येथे क्लिक करा अधिक माहिती साठी.

सूचना: येथे ही सावधानता बाळगा की वरील दोन्ही बादल्यातील प्रॉडक्ट्ससाठी फ्लिपकार्ट रिटर्न्स पॉलिसी लागू होते जर त्या वस्तू तुम्ही वापरल्या नसतील, बिघडवल्या नसतील आणि त्यावरील सर्व टॅग्ज त्यावर असतील& पॅकेजिंग शाबूत असेल

कृपया याचीही नोंद घ्या, यशस्वी डिलिव्हरी दिल्यावर ओपन बॉक्स डीलिव्हरी, नुकसान/हरवले/मिसशिपमेंटबाबत तुमचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही. म्हणून अशा प्रोडक्टबाबत कृपया डिलिव्हरी स्वीकारताना सर्व गोष्टी पूर्णपणे चेक करून घ्या.

 • परत घेतले जाणार नाही

काही प्रोडक्ट्स परत घेतले हात नाहीत. ही यादी पहा येथे.


प्रोडक्ट रिटर्न्स – नेहमीचे प्रसंग

तुमची ऑर्डर प्रोडक्ट रिटर्न्स, एक्सचेंज, बदलाने किंवा रिफंड साठी केव्हा पात्र आहे?

फ्लिपकार्टवर माहितीपूर्ण पर्याय निवडण्यासाठी आणि मनाची शांतता कायम अनुभवण्यासाठी काही परिस्थितींचा आधीच अभ्यास करून अधिक माहिती समजून घ्या.

 • जेव्हा तुमची ऑर्डर डॅमेज्, सदोष किंवा छेडछाड केलेली

Flipkart product returns

प्रधाम तुम्ही ऑर्डर केलेल्या प्रोडक्टला डॅमेज आहे का ते तपासा. कधीकधी वरवर पाहता पॅकिंग ट्रान्सपोर्ट किंवा हाताळताना खराब झाल्यासारखे वाटते, पण आतील प्रोडक्ट चांगली असू शकते. तथापि, त्तुम्हाला असे दिसून आले की पॅकेजशी छेडछाड झाली आहे किंवा प्रॉडक्ट बॉक्समध्ये व्यवस्थित बंद केलेली नाही, तुम्ही ऑर्डर त्याच ठिकाणी नाकारू शकता. जर तुम्ही ऑर्डर स्वीकारली आणि त्यानंतर हे दोष पाहिले तर तुम्ही रिटर्नचा अर्ज देऊ शकता. त्यासाठी फ्लिपकार्ट मोबाईल अॅपवर ऑर्डर्स टॅबवर किंवा डेस्कटॉप साईट वर रिटर्न्स पर्यायावर क्लिक करा. याला ओप्ट करा आणि पुढील प्रक्रियेप्रमाणे येणाऱ्या स्टेप्सना फॉलो करा. फ्लिपकार्ट रिटर्न्स टीम तेथून पुढे सर्व काही करेल.

ज्या प्रकारची प्रोडक्ट ऑर्डर केली असेल त्याप्रमाणे तुम्ही बदली करणे, किंवा रिफंड साठी ओप्ट करा.

 • अनएक्स्पेक्टेड फिट, कलर किंवा स्टाइल

Flipkart product returns

तुम्ही पळण्याचे बूट ऑर्डर केले आणि ते तुम्हाला बसत नाहीत असे लक्षात आले तर काय करायचे? काळजी करू नका. तुमच्या फ्लिपकार्ट अकौंटवर लॉग ऑन करा. माझ्या ऑर्डर्स टॅबवर जा. रिटर्न वर क्लिक करा. ‘माप बसत नाही हा इश्यू’ हे कारण निवडा आणि रिटर्न्स हा पर्याय निवडा. जेव्हा मापात बसत नाही तेव्हा एक्सचेन्जेस हाच पर्याय तुम्हाला असतो. किंवा तुम्हाला प्रॉडक्टचा रंग आवडला नाही.

 • जर प्रॉडक्ट रिटर्न्स आणि बदलणे यामध्ये स्टॉक शिल्लक नाही

Flipkart product returns

तुम्ही एक टी-शर्ट ऑर्डर केला आणि तो फिट होत नाही हे लक्षात आल्यावर काय करायचे? जर त्या मापाचा शर्ट शिल्लक नसेल तर काय करायचे?

तुम्हाला त्याच माय ऑर्डर्स टॅब वरून तुमच्या टी-शर्टची पूर्ण रक्कम परत मिळते. खर म्हणजे तुम्ही ऑर्डर केलेली वस्तू लाइफस्टाइल प्रकारातील असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रॉडक्टची पूर्ण किंमत परत मिळते.
पण तुम्हाला तो टी-शर्ट खूपच आवडला असेल की तुमची तो स्टॉकमध्ये येईपर्यंत थांबायची तयारी असेल तर तुम्ही फक्त मला फिचर नोटीफाय करा वर क्लिक करा. तुमच्या आवडीचा टी-शर्ट जेव्हा स्टॉकमध्ये येईल तेव्हा तो फ्लिपकार्ट दुकानदार तुम्हाला तसे कळवेल. यामुळे तुम्हाला तुमच्या आवडीचा प्रॉडक्ट मिळण्याची दुसरी संधी मिळेल.

 • तुम्ही एक वस्तू ऑर्डर केली पण तुम्हाला दुसरीच काही वस्तू मिळाली

Flipkart product returns

जर तुम्ही कॅप्टन अमेरिका मोबाईल कव्हर तुमच्या मोटो जीसाठी ऑर्डर केले. पण जेव्हा प्रॉडक्ट आली तेव्हा तुम्हाला गोल्ड आयफोन कव्हर आले. हा काही नेहमी होणारा प्रकार नाही. या प्रसंगी तुम्हाला त्वरित सवड करून रिटर्न्स केले पाहिजे.
एकदा रिटर्न् साठी नोंद केली की आमची डिलिव्हरी करणारी व्यक्ती तुम्हाला दिलेली वस्तू परत नेईल आणि तुम्हाला बदलून तुमच्या ऑर्डर प्रमाणे बरोबर वस्तू आणून देईल. तुमच्या प्रॉडक्टचे वर्णन जेथे लिहिले आहे त्या ठिकाणी लिहिलेले रिटर्न पॉलिसी वाचण्याचे लक्षात ठेवा.
सर्व रिटर्न्स फ्लिपकार्ट रिप्लेसमेंट गॅरंटीखाली कव्हर होतात.

 • जर तुम्हाला रिफंड हवा असेल

Flipkart product returns

जर तुम्ही तुमच्या बदली दिलेल्या वस्तूबाबत असमाधानी असाल, किंवा स्पेसिफिक प्रॉडक्ट किंवा मॉडेल स्टोरमध्ये शिल्लक नसेल तर आमची ग्राहक सहाय्यक टीम तुम्हाला रिफंड घेण्याबाबत सल्ला देईल.

तुमच्या माय ऑर्डर पेजवरील माहिती भरून झाल्यावर रिक्वेस्ट रिटर्न पर्याय निवडा. तुमचा रिफंड देण्याची प्रक्रिया तुमच्या रिफंडला मान्यता मिळाल्यावर सुरु होईल. तुमचे पैसे तुमच्याकडे खालील पैकी एका मार्गाने जमा होतील:

 1. जर तुम्ही कॅश-ऑन-डिलिव्हरी पैसे भरले असतील तर आयएमपीएस मधून परत केले जातील.
 2. ज्या पध्दतीचा वापर करून तुम्ही ऑर्डरचे पैसे दिले असतील त्याच सोर्समधून ( याला बॅक टू सोर्स) उदाहरणार्थ, जर तुम्ही एचडीएफसी डेबिट कार्डने पैसे भरले असतील तर तुमचा रिफंड त्याच खात्यात जमा होईल.
 3. तुमचे पैसे तुम्ही निर्देशिलेल्या बँक अकौंटमध्ये जे तुम्ही रिटर्नसाठी जमा करताना आयएमपीएस मार्फत चा पर्याय, निवडला असेल तर रिफंड बॅक टू सोर्स न जाता ती रक्कम तुमच्या बँकेत जमा होईल. (हा पर्याय डेबिट कार्ड व नेट बँकिंग फॉरवर्ड पेमेंटसाठी उपलब्ध आहे.).
 4. पात्र ट्रान्सफर साठी तुम्ही तुमचे पैसे असेही ट्रान्सफर करू शकता Flipkart EGVs.
 • फ्लिपकार्ट मधून खरेदी केलेली वस्तू तिच्या वारंटी काळात निकामी झाली/b>

विक्रेत्याच्या रिटर्न पॉलिसी प्रमाणे आणि प्रॉडक्टच्या वर्गवारी प्रमाणे फ्लिपकार्ट बदलून देण्याची गॅरंटी लागू आहे. वस्तूवरील कागदावर रिप्लेसमेंट गॅरंटी पिरिएड वाचून मगच रिटर्न मागावे.

जर काही कारणामुळे तुम्ही ऑर्डर केलेला प्रॉडक्ट काही कारणामुळे गॅरंटी काळानंतर नीट काम करीत नसेल किंवा कामच करीत नसेल, तर तुमच्या शहरातील त्या ब्रँडच्या वस्तूचे ऑथराझड सर्व्हिस सेंटर तुम्हाला गॅरंटी नंतरची सर्व्हिस, जशी इतर कोणत्याही ऑफलाईन परचेसला मिळते तशी तुमच्या वस्तूला मिळेल.

आम्ही अशी आशा करतो की ही माहिती वाचून प्रॉडक्ट रिटर्न ऑन फ्लिपकार्ट बाबत तुम्हाला अधिक सोयीचे, सोपे वाटत असेल. तुम्हाला अजून काही शंका असतील तर आम्ही तुम्हाला ही माहिती अधिक काळजीपूर्वक वाचण्यास प्रोत्साहित करतो संपूर्ण एफएक्यू ऑन फ्लिपकार्ट प्रॉडक्ट रिटर्न्स अँड एक्स्चेंजेस


अजून प्रश्न आहेत का? येथे क्लिक करा अधिक माहितीसाठी फ्लिपकार्टशी संपर्क कसा साधायचा हे शोधण्यासाठी

इन्फोग्राफिक लेखिका साधना प्रसाद | फ्लिपकार्टच्या गोष्टी

Enjoy shopping on Flipkart