गादी उत्पादन उद्योगात 18 वर्षे काम करत असलेल्या, सादिक हुसेनने त्यांच्या समवयस्कांना प्रगती करताना आणि पुढे जाताना पाहिले आणि त्यांना स्वतःसाठी तेच करण्याची ओढ लागली. स्वतःचे नशीब घडवण्याचा निर्धार करून त्यांनी त्यांच्याकडे असलेली भरपूर कौशल्ये आणि अनुभवाच्या मदतीने व्यवसायाची सुरुवात केली. आज, हा फ्लिपकार्ट समर्थ विक्रेता एक फायदेशीर व्यवसाय चालवतो आणि त्याला त्याच्या प्रवासाचा अभिमान आहे. त्याची हृदयस्पर्शी कथा वाचा आणि प्रेरणा घ्या.
माझे नाव सादिक हुसेन आहे. मी #Sellfmade फ्लिपकार्ट समर्थ विक्रेता आहे. मी जयपूरमध्ये कम्फर्ट झोन नावाची एक गादी निर्मिती कंपनी चालवतो.
मी माझा व्यवसाय ऑफलाइन विक्रीने सुरू केला आणि 18 वर्षांपासून या उद्योगात आहे. मला दररोज चार ते पाच ऑर्डर मिळत होत्या आणि तेव्हा मी ही उत्पादने स्वतः बनवत होतो. मी माझा व्यवसाय वाढवण्यासाठी घेत असलेले कठोर परिश्रम माझ्या मुलाने पाहिले – मी या गाद्या विकण्यासाठी या दुकानातून त्या दुकानात जायचो. एके दिवशी माझ्या मुलाने माझी कंपनी ऑनलाइन नेण्याचा विचार केला.
जेव्हा मी ऑनलाईन विक्री सुरू केली तेव्हा माझी विक्री वाढली. सुरुवातीला दररोज आठ ते नऊ नगांपर्यंत माझी विक्री गेली आणि आज मी दररोज सुमारे 40 नग विकत आहे. माझा सुमारे 80% व्यवसाय फ्लिपकार्ट वरून येतो.
फ्लिपकार्टच्या द बिग बिलियन डेज सेलर इव्हेंटच्या वेळेस मी फ्लिपकार्ट टीमला समोरासमोर भेटलो. तिथे त्यांना माझ्या अपंगत्वाची माहिती मिळाली.
मी ऑनलाईन विक्रीला सुरुवात करण्याचे एक मुख्य कारण म्हणजे याचा अर्थ असा होता की, माझ्या ऑफलाईन व्यवसायाप्रमाणे मला वेगवेगळ्या दुकानांमध्ये घरोघरी जाणे, जिने चढणे वगैरे करावे लागले नाही. मला त्यामुळे थोडा त्रासच होत असे.
फ्लिपकार्ट टीमने मला त्यांच्या फ्लिपकार्ट समर्थ कार्यक्रमाबद्दल सांगितले, ज्यामध्ये मला समजले की तो एक असा कार्यक्रम होता ज्यामुळे महिला, अपंग व्यक्ती, कारागीर आणि विणकर यांच्या मालकीचे व्यवसाय अधिक सक्षम झाले. मी माझी कागदपत्रे शेअर केली आणि लवकरच फ्लिपकार्टच्या प्रतिनिधीने मला फोन केला आणि सांगितले की फ्लिपकार्ट समर्थ विक्रेता म्हणून माझे नाव यादीत घेतले गेले आहे.
माझ्या उत्पादनांवर लवकरच फ्लिपकार्ट समर्थचा टॅग लागला, ज्यामुळे मला जास्तीत जास्त दृश्यमान राहायला मदत झाली. माझे कमिशन शुल्कसुद्धा कमी केले गेले, ज्यामुळे माझी विक्री वाढण्यास आणखी मदत झाली.
आता माझ्या उत्पादनांची मागणी जास्त आहे म्हणून मला या गाद्या तयार करण्यासाठी आणि माझ्या ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी टीमची गरज आहे. मला मदत करण्यासाठी मी 12-13 कर्मचारी सदस्य ठेवले आहेत. मला या गोष्टीचा अभिमान आहे की मी बसून राहिलो नाही आणि सगळे काम त्यांच्यावर सोडले नाही. मी त्यांच्याबरोबर काम वाटून घेतो आणि मला अजूनही काही उत्पादने स्वतःच्या हाताने तयार करताना आनंद मिळतो.
माझ्या अनुभवानुसार, व्यवसाय आणि आयुष्य सोबत वाटचाल करतात. जर व्यवसाय चांगला असेल तर आयुष्य चांगले आहे. आणि फ्लिपकार्टवर, प्रगतीवर आणि दृश्यमानतेला कसलीही मर्यादा नाही.
फ्लिपकार्टचा अश्युअर्ड प्रोग्राम इथे खूप मदत करतो. आम्ही जर फ्लिपकार्ड अशुअर्डच्या गुणवत्ता मापदंडांची पूर्तता केली तर आमच्या उत्पादनांना वेबसाइटवर सूचीबद्ध केल्यावर “फ्लिपकार्ट अशुअर्ड” लेबल असेल. जास्तीत जास्त ग्राहक लेबल पाहतात तेव्हा त्यांना माहीत असते की ही उत्पादने फ्लिपकार्टच्या गुणवत्तेच्या सर्वोच्च मापदंडांची पूर्तता करतात. त्यामुळे उत्पादनांची मागणी वाढते आणि त्याची चांगली विक्री होते. विक्रेत्यांसाठी फ्लिपकार्टच्या सर्वोत्तम फायद्यांपैकी हा एक आहे.
मी माझ्या उत्पादनांमध्येही वैविध्य आणले आहे – माझी बेस्टसेलर तीन-घडींच्या गादीसह! आज आम्ही सोफा- कम- बेडदेखील विकतो. आणि वेगवेगळ्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मी विविध आकारांच्या गाद्या बनवतो.
मी ऑनलाईन कामास सुरुवात करण्यापूर्वी, मला फक्त जयपूरच्या स्थानिक बाजारपेठांमध्ये शिरकाव मिळू शकला होता. आज मी संपूर्ण भारतातील बाजारपेठेत विक्री करत आहे. खरं तर, माझ्या बहुतेक ऑर्डर्स आता दक्षिण भारतातून येतात.
फ्लिपकार्ट ब्रँड विश्वास निर्माण करतो आणि तो विश्वास कायम ठेवणे हे माझ्यासारख्या विक्रेत्यांचे काम आहे. फ्लिपकार्ट समर्थ विक्रेता म्हणून काम करत राहण्याचा आणि त्यांच्यासोबत प्रगती करत राहण्याचा माझा हेतू आहे.
फ्लिपकार्ट कुटुंबाचा एक भाग म्हणून स्वीकारण्यात आल्यामुळे मला अभिमान वाटतो. फ्लिपकार्टसोबत काम केल्याने माझे आयुष्य बदलले. मी एका साध्या कुटुंबातून आलो आहे आणि आता माझी परिस्थिती चांगली असल्याने मला समाजात आदर मिळत आहे असे वाटते. माझ्यासाठी फ्लिपकार्ट खूप जवळचे आहे.