साथीच्या रोगामुळे लागलेल्या लॉकडाऊनच्या काळात गीता शर्मा आणि त्यांचे पती दोघांनीही नोकरी गमावल्यानंतर, त्यांच्याकडे फक्त एकच ध्येय होते - त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे. फ्लिपकार्ट महिला विशमास्टर्सची नेमणूक करत आहे असे त्यांनी ऐकले, तेव्हा त्या पटकन नवी दिल्लीतील एका केंद्रात सहभागी झाल्या. आज, त्यांना अभिमान वाटतो की त्या आपल्या कुटुंबाला कठीण काळात मदत करू शकल्या आणि त्यांना त्यांच्यासारख्या आणखी महिलांसाठी रोल मॉडेलही बनायचे आहे. वाचा त्यांची कथा.
साथीच्या रोगाच्या आधी, मी मुंबईतील फिल्म इंडस्ट्रीमध्ये सहाय्यक उत्पादन व्यवस्थापक म्हणून काम करत असे. मी शहराच्या प्रेमात होते – समुद्र, हवा, काहीतरी होते तिथल्या हवेत. मला आठवते की काम संपल्यावर मी समुद्राजवळ जाऊन बसायचे. पण साथीचा रोग सुरू झाला आणि माझ्याकडे काम उरले नाही. चित्रपटाचे चित्रीकरण थांबले आणि नंतर शक्य झाल्यावर लगेच मी दिल्लीतील माझ्या कुटुंबाकडे परत गेले.
माझे कुटुंब म्हणजे माझे पती आणि दोन मुले नेहमीच दिल्लीत असायचे. माझे पती मार्शल आर्ट स्टुडिओ चालवतात, पण त्यांनाही साथीच्या आजारामुळे त्यांचे काम बंद करावे लागले. मला पटकन जाणवले की माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू ठेवण्यासाठी मला नोकरी शोधावी लागणार आहे.
त्या काळात, दिल्लीतही नोकरी मिळणे खूप कठीण होते, पण फ्लिपकार्टमध्ये डिलिव्हरी कर्मचारी किंवा इथे आम्हाला म्हणतात तसे विशमास्टर्सची भरती केली जात आहे अशी मला माहिती मिळाली. मी मुलाखतीसाठी आले आणि प्रशिक्षणही पूर्ण केले ज्यामुळे नोकरीसाठी माझी तयारी झाली.
मी नेहरू प्लेस हबमध्ये काम करते, जे माझ्या राहत्या घरापासून अगदी जवळ आहे. मी स्कूटरवरून कामासाठी ये-जा करते आणि माझ्या परिसरात दररोज सुमारे 70 ऑर्डर वितरीत करण्यासाठीही स्कूटरवरून जाते.
मी महिला ग्राहकांना डिलिव्हरी देते तेव्हा प्रत्येकवेळी, त्यांना फ्लिपकार्ट विशमास्टर म्हणून माझ्या नोकरीबद्दल अधिक जाणून घेण्यात नेहमीच स्वारस्य असते. त्या मला प्रोत्साहित करतात आणि त्यातून मला माझे काम करण्यासाठी प्रेरणा मिळते. याउलट, मी त्यांना असेही सांगते की स्त्री करू शकत नाही असे काहीही नाही. मला माहीत आहे की यामुळे त्यांनाही अभिमान वाटतो.
फ्लिपकार्टमध्ये , मी मुक्त मनाने आणि कोणत्याही तणावाशिवाय काम करू शकते. विशमास्टर म्हणून इथे काम करत आता दीड वर्ष झाले आहे आणि मला माहित आहे की माझे वरिष्ठ नेहमीच मला काम देण्यास उत्सुक असतात. कामाच्या ठिकाणी उपाययोजना आणि प्रोटोकॉल आहेत आणि ते बघून मला सुरक्षित वाटते. मी नेहमी माझ्या वरिष्ठांना आणि सहकाऱ्यांना कोणत्याही गोष्टीसाठी फोन करू शकते.
माझा असे वाटते की कुठलेही काम तुम्ही अभिमानाने आणि प्रामाणिकपणे केले तर कमीपणाचे नसते नाही. एकेकाळी, माझे स्वतःचे मोबाईल दुरुस्तीचेही दुकान होते. मला मोबाईल फोनची प्रत्येक गोष्ट माहिती होती. मी फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स कसे दुरुस्त करायचे ते शिकून घेतले आणि मला त्यात आनंद मिळत होता, पण त्या व्यवसायात मला यश मिळाले नाही.
आज, मी माझ्या मुलाकडे आणि माझ्या मुलीकडे पाहते, तेव्हा मला अभिमान वाटतो की मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास सक्षम आहे. मी घरी जाते तेव्हा कसलाच ताण नसतो. माझे पती खूप मदत करतात – संध्याकाळी काम संपवून मी घरी येते तेव्हा आम्हा सर्वांसाठी रात्रीचा स्वयंपाक ते करतील हे ते सुनिश्चित करतात. आम्ही घरात कामे वाटून घेतो आणि तसे करताना एकमेकांना मदत करतो.
फ्लिपकार्ट विशमास्टर म्हणून माझी ही पहिली नोकरी आहे आणि मला माहीत आहे की बर्याच स्त्रियांना या कामाविषयी उत्सुकता वाटते. मी त्यांना सांगू इच्छिते की स्त्रियांना जे काम मनापासून करावेसे वाटते असे कुठलेही काम त्या करू शकतात. आपल्याला याचा अभिमान वाटला पाहिजे.
हेही वाचा: या बिग बिलियन डेज च्या काळात लवचिकतेची भावना साजरी करा
#HumansOfBBD बरोबर