गुणवत्ता? तपासा! फ्लिपकार्टच्या 2GUD ने नूतनीकृत (रिफर्बिश) वस्तूंच्या खरेदीवरचा विश्वास पुन्हा निर्माण केला आहे.

Read this article in हिन्दी | English | বাংলা | தமிழ் | ಕನ್ನಡ | ગુજરાતી

तुम्हाला जर तुमचा स्मार्टफोन नेहमी अपग्रेड करायला आवडत असेल, तुमचा लॅपटॉप वारंवार बदलत असाल किंवा अगदी एखादा चांगला व्यवहार सोडवत नसेल तर 2GUD हा फ्लिपकार्टचा नवीन इ-कॉमर्स प्लॅटफॉर्म निश्चितच तुमच्यासाठी आहे. 2GUDच्या नूतनीकरण केलेल्या (रिफर्बिश) वस्तू ह्या जवळजवळ नव्यासारख्याच असतात – अर्थातच त्यांचे बारकाईने परीक्षण केलेले असते व त्यांना स्वत:ची वॉरंटीही असते. उत्सुक आहात? 2GUD चे संकेतस्थळ तुमच्या फोनवर बुकमार्क करण्यासारखे का आहे ते आत्ताच पाहूया.

2gud

नूतनीकरण केलेल्या वस्तूंची खरेदी ही नेहमीच ताणतणावपूर्ण असते – गुणवत्तेविषयी नेहमीच शंका असते, तुम्ही त्याकरिता जास्त पैसे देत आहात किंवा ज्या प्रॉडक्टबद्दल शंका आहे त्याचा सौदा खरच बरोबर आहे का, अशा प्रकारचे विचार मनात येतात. पण जर तुम्हाला या सर्व गोष्टींची खात्री असेल तरच तुम्ही खरोखर आरामशीर बसून तुमच्या आवडीच्या वस्तू खरेदी करण्याचा आनंद उपभोगू शकाल, आणि ते ही अविश्वसनीय किमतीत. 2GUD खरोखरच खरं आहे?

2gud

बरं, नूतनीकरण केलेल्या वस्तूंच्या शॉपिंगला फ्लिपकार्टच्या 2GUD ने पुढील स्तरावर नेऊन ठेवले आहे. वेबसाईटवर सूचीबध्द करण्यापूर्वी प्रत्येक वस्तू काळजीपूर्वक नवीनतम आणि पहिल्यासारखी केली जाते जेणेकरून अगदी उत्कृष्ट नाही तरी नव्यासारखीच असलेल्या वस्तूचा आनंद तुम्ही घेऊ शकता. कोणतीही निराशा नाही, कोणतेही दोष नाहीत. फक्त परवडणारी आणि उच्च प्रतीच्या उत्पादनांमधून निवडण्यासाठी उच्च गुणवत्तेची उत्पादने तुम्हाला सहज घेता येण्याजोगी असतात. इतकेच नाही तर, 2GUD हा फ्लिपकार्टचा उपक्रम आहे ज्याचा अर्थ असा की तुम्हाला त्यावर विश्वास ठेवता येईल आणि तुमच्यासाठी ते सोयीस्कर असल्याबाबत निश्चिंत राहता येईल.

तुमची उत्कंठा जर आताच वाढली असेल तर, तुम्ही जाणून घ्यायला हवी अशी माहिती इथे आहे.

 

2GUD वर कशाची ऑफर आहे?

प्रथम म्हणजे, 2GUD तुमच्यासाठी नूतनीकरण केलेले वेगवेगळे स्मार्टफोन्स, लॅपटॉप्स आणि इतर अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सादर करते. लवकरच ते तुमच्यासाठी टेलिव्हिजन, टॅब्लेटस् आणि उपकरणेसुध्दा उपलब्ध करून देतील. एकंदरीत, तुम्हाला 400 पेक्षा जास्त प्रकारांतून नूतनीकृत उत्पादने शोधता येतील.

2gud

सर्वोत्कृष्ट किमतीत योग्य दर्जा

तुम्हाला जर वापरलेली वस्तू खरेदी करताना फसवणूक होईल अशी भीती असेल तर आता अजिबात घाबरू नका. 2GUD मधील प्रत्येक उत्पादन अगदी अचूकपणे काम करते आणि दिसतेही उत्तम. ह्या उत्पादनांचे नूतनीकरण फ्लिपकार्टच्या एफ1 इन्फओ सोल्यूशन्स या अंतर्गत विभागात केले जाते आणि प्रत्येक उत्पादनाची अतिशय कठोर गुणवत्ता तपासणी केली जाते ज्यात तब्बल 40 वेगवेगळ्या बाबींचा शोध घेण्याचा समावेश असतो.

विचार करा की तुम्हाला स्मार्टफोन विकत घ्यायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही 2GUD ला भेट देता. तुम्हाला हवे असलेले मॉडेलही तुम्हाला मिळाले आहे पण तुमच्या कार्टमध्ये ते टाकायचे किंवा नाही याबद्दल तुमची द्विधा मन:स्थिती होत आहे. तुमचा संकोच दूर करण्यासाठी इथे काही गोष्टींची तुम्हाला मदत होईल : स्मार्टफोनचे 40 पैलू जसे कॅमेरा, स्क्रीन, बॅटरी परफॉर्मन्स तसेच फिंगरप्रिंट स्कॅनर सुध्दा हे फ्लिपकार्टच्या अतिशय उच्च दर्जाच्या तज्ञांनी तपासलेले असतात!

म्हणून, जी उत्पादने सर्व निकषांवर खरी उतरली आहेत तीच तुमच्या स्क्रीनवर दिसतात. त्याहूनही मह्त्त्वाचे म्हणजे 2GUD वर खरेदी केल्याने तुमच्या पैशाचे योग्य मोल झाले याची हमी मिळते. तुम्हाला आढळेल की जी उत्पादने बॉक्स मधून बाहेर काढली आहेत पण अजिबात वापरलेली नाहीत अशांवर मिळालेले डिस्काऊंटही विशेष महत्त्वाचे आहे!

गुणवत्तेला प्रथम प्राधान्य आहे

2GUDवर असलेले प्रत्येक उत्पादन नेमके कसे आहे आहे ते तुम्हाला स्मार्ट ग्रेडिंग पध्दतीमुळे समजेल. उत्पादनांचे विभाजन अशाप्रकारे केले जाते.

2gud

Like New: ही नवीकोरी उत्पादने आहेत फक्त त्यांना बॉक्समधून बाहेर काढले आहे. ज्या उत्पादनाला Like New दर्जा मिळाला आहे ते पूर्वी कधीही वापरलेले नाही, ते पूर्णपणे कार्यान्वित आहे आणि तज्ज्ञांनी त्याची पडताळणी केलेली आहे.

2gud

Superb: हे रेटिंग आपल्याला सांगते की उत्पादन खूप कमी वेळ वापरले गेले आहे. त्याच्यासोबत ब्रँड वॉरंटी मिळते. त्याची कार्यक्षमता प्रमाणित असते, त्यावर कुठलेही ओरखडे नसतात. ब्रँडकडून त्याला 3 महिन्याची वॉरंटी मिळालेली असते आणि ते ईझी रिटर्नसाठी पात्र ठरते!

2gud

Very Good: हे रेटिंग दर्शविते की वस्तू कमीतकमी वापरली आहे, त्याची कामगिरी प्रमाणित आहे आणि त्यावर नगण्य ओरखडे आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याची कामगिरी पूर्णपणे पुर्न:स्थापित केली गेली आहे आणि प्रॉडक्टची कसून तपासणीही झाली आहे.

फ्लिपकार्टच्या चांगुलपणाने भरलेले

तुम्हाला फक्त इतकेच करायचे आहे की तुमच्या फ्लिपकार्ट लॉग-इन, पासवर्डसह साइन इन करायचे किंवा जर तुमचे अकाऊंट नसेल तर 2GUD वर नवीन अकाउंट बनवायचे. त्यानंतर सगळे अगदीच सोपे आहे. तुम्हाला पाहिजे असलेली उत्पादने शोधा. प्रत्येक उत्पादनासाठी त्याचे ग्रेडिंग, वॉरंटी, त्याच्या विशेषता, पाठविण्यास लागणारा वेळ, पेमेंटचे पर्याय आणि इतर गोष्टी तुम्ही पाहू शकता. त्याशिवाय, फ्लिपकार्टवरून तुम्हाला हवे असलेल्या उत्पादनाची खरेदी किंमत तुम्हाला नवीन उत्पादनाच्या किंमतीशी पडताळून पाहता येईल. एकदा तुम्ही तुमची कार्ट उत्पादनांनी भरली की तुम्ही बाहेर पडून जसे तुम्हाला पाहिजे तसे पेमेंट करू शकता. आपण EMI टूलद्वारे देय देऊ शकता!

2GUDच्या गुणवत्तेची हमी

केवळ नूतनीकरण केलेली उत्पादने आहेत म्हणून त्यांना राजेशाही वागणूक मिळू शकत नाही असे नाही. फ्लिपकार्ट हे जाणून आहे आणि त्यासाठी त्यांच्याकडे तज्ज्ञांचा गट आहे जो अगदी प्रत्येक उत्पादनाची पडताळणी करतो. इतकंच नाही तर, प्रॉडक्टच्या ग्रेडिंगविषयी ते पूर्णपणे पारदर्शक आहेत ज्यामुळे तुम्हाला हे समजते की तुम्हाला एक दर्जेदार उत्पादन मिळाले आहे. यांस बळकटी देण्यासाठी, फ्लिपकार्ट अशा उत्पादनांसाठी वॉरंटीसुध्दा देते, ज्यांच्यासोबत ब्रँडची वॉरंटी नसते. देशभरातील सेवाकेंद्राच्या विस्तारलेल्या नेटवर्कद्वारे तुम्ही संपर्क करून तुम्हाला आलेल्या समस्येविषयी तात्काळ व्यवहार करू शकता.

शॉपिंगला सुरूवात, स्टार्ट!

2gud

2GUD मधील चांगले लोक आपल्याबरोबर लूट वाटून घेण्यास प्रतीक्षा करू शकत नसल्यामुळे, त्यांनी आपल्या मोबाइलवर प्रवेश करू शकणारी ई-कॉमर्स वेबसाइट सुरू केली आहे. लवकरच, आपण अँड्रॉइड आणि IOS डिव्हाइसवर आणि आपल्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर देखील अॅपद्वारे खरेदी करण्यास सक्षम व्हाल .
नूतनीकृत उत्पादनांची खरेदी करताना छोट्या जाहिराती चाळून पहायच्या किंवा चांगल्या किंमतीसाठी मालकाशी घासाघीस करायची या गोष्टी तुम्हाला विसरता येतील. 2GUD वर, किंमत योग्य आहे आणि गुणवत्तेवर फ्लिपकार्टच्या मान्यतेची मोहोर आहे. मग ते तुम्ही शोधत असलेले ब्ल्यूटूथ बोस स्पीकर्स असोत अथवा सॅमसंग गॅलेक्सी S8+ असो. तुमच्या स्मार्टफोनला कामाला लावा आणि शॉपिंगला सुरूवात करा!


Also Read: ‘रिफर्बिश्ड’ची शिफारस करा – 2GUD ची गोष्ट

 

Enjoy shopping on Flipkart