तयार रहा, खरेदी! फ्लिपकार्ट ईजीव्हीज् किंवा गिफ्ट कार्ड्स

Read this article in हिन्दी | English | বাংলা | தமிழ் | ಕನ್ನಡ | ગુજરાતી | తెలుగు

तुम्हाला तुमच्या प्रेमळ व्यक्तीने फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक गिफ्ट वाऊचर भेट दिले किंवा तुम्हीच ते फ्लिपकार्टवर चेक-औट सोपे जावे म्हणून विकत घेतले किंवा तुम्ही ते अनेक स्पर्धेत भाग घेऊन जिंकले असेल तर तुम्हाला अधिक वस्तू खरेदी करता येऊ शकतात! याशिवाय तुम्ही आता फ्लिपकार्ट इजीव्हीज् आपल्या देशभर विखुरलेल्या फ्लिपकार्ट पार्टनर दुकानातून खरेदी करू शकता. तुम्हाला तुमच्या गिफ्ट कार्डचा चांगला वापर करायचा आहे का? येथे तुम्हाला फ्लिपकार्ट इजीव्ही वापरासाठी लागणारी आवश्यक ती माहिती दिली आहे.

Flipkart EGVs

तुम्ही खूप खेळला फ्लिपकार्ट स्पर्धाआणि जिंकला किंवा प्रेमळ व्यक्तीने बहुधा खूप उदार मनाने, तुम्हाला दिले एक फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक गिफ्ट वाऊचर (किंवा दोन) खरेदीसाठी दिले. तुम्हाला ते कसे वापरायचे प्रश्न पडला? त्यासाठी इथे तुम्हाला फ्लिपकार्ट इजीव्हीज् चा वापर करण्यासाठी आवश्यक माहिती दिलेली आहे.

फ्लिपकार्ट इजीव्हीज् इतके रोमांचक कशामुळे बनले आहे?

थोडक्यात, इजीव्हीज् किंवा फ्लिपकार्ट गिफ्ट कार्ड्स ही वौचर्स असतात जी तुम्ही दुकानात पैशासारखी वापरू शकता. उदा. तुम्ही जर रु. ५००/- चे वाउचर जिंकले असेल तर तुम्ही रु. ५००/- चे शॉपिंग करून फ्लिपकार्ट इजीव्हीज् ने त्याचे पेमेंट करू शकता.

फ्लिपकार्ट गिफ्ट कार्ड हे म्हणजे त्या किमतीचे प्रीपेड स्टोर अकौंट असून फ्लिपकार्ट मध्ये जाऊन तेवढ्या किमतीच्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. तुम्ही हेच वाऊचर एखाद्या विशेष समारंभात अथवा तुमचे प्रेम व प्रशंसा याचे द्योतक म्हुणुन गिफ्ट म्हणून सुध्दा देऊ शकता.

याशिवाय, तुम्हाला वाटले तर तुम्ही त्याचा पाकीटासारखा उपयोग करून पटकन व सोप्या पध्दतीने चेक-औट करू शकता.

मी फ्लिपकार्ट गिफ्ट कार्ड्स कसे विकत घेऊ शकते/शकतो?

फ्लिपकार्ट इजीव्ही जिंकणे किंवा गिफ्ट म्हणून मिळणे याशिवाय तुम्ही फ्लिपकार्ट गिफ्ट कार्ड दुकानाला ऑनलाईन किंवा देशाच्या सर्व भागात विखुरलेल्या ९०००+ फिजिकल पार्टनर दुकानांपैकी एखाद्या दुकानाला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील शेल्फवरुन प्रत्यक्ष खरेदी करू शकता.

तुमच्या सोयीसाठी आणि अधिक वापरासाठी फ्लिपकार्ट गिफ्ट कार्ड्स किंवा इजीव्हीज् आता डायनॅमिक डिनॉमिनेशन्स मध्येही उपलब्ध आहेत. याचाच अर्थ गिऱ्हाइकांना आता इजीव्हीज पूर्वनिर्धारित बरोबरच हव्या त्या लहान-मोठ्या डिनॉमिनेशनमध्ये उपलब्ध आहेत. त्यांची रेंज रु. २५/- पासून रु. १०,०००/- अशी आहे.

गिफ्टकार्ड दुकानात वेगवेगळ्या प्रसंगी वापरता येतील अशा फ्लिपकार्ट गिफ्ट कार्ड्सचे वेगवेगळे प्रकार असतात. ते तुम्ही दुकानातून प्रत्यक्ष खरेदी करू शकता किंवा डिजिटल प्रकारात निरनिराळ्या प्रसंगासाठी म्हणजे व्हॅलेंटाइन डे, फादरज् दे, विवाह-दिन, वाढदिवस आणि असे खूप काही.

फ्लिपकार्ट गिफ्ट कार्ड दुकानामध्ये इतर प्रमुख ब्रँडस् आणि स्टोर्सची १२० पेक्षा जास्त प्रकारची तुमच्या डिनॉमिनेशन व निवडीप्रमाणे गिफ्ट कार्ड्स मांडून ठेवलेली असतात.

विजेता सर्व घेणार – तुम्ही फ्लिपकार्ट गिफ्टकार्ट गिफ्ट कार्ड्स कसे वापरणार

तुमचे फ्लिपकार्ट इजीव्हीज् चांगल्याप्रकारे कसे वापरावे हा विचार तुम्हाला सतावत असेल तर ते अगदी सोपे आहे. तुम्हाला एव्हढेच करायचे आहे की फ्लिपकार्ट वर लॉग-ऑन व्हा, तुम्हाला खरेदी करण्याच्या वस्तू निवडा आणि त्या तुमच्या कार्टमध्ये घाला. त्यानंतर तुम्ही नेहमी करत असणार तसे ‘पैसे भरण्यासाठी पुढे चला’ (‘प्रोसिड टू पेमेंट’) वर क्लिक करा. आता कॅश ऑन डिलिव्हरी किंवा नेट बँकिंग ऐवजी ‘पे बाय गिफ्ट कार्ड’ वर क्लिक करा. फ्लिपकार्ट इजीव्हीज् ला डेबिट/क्रेडीट कार्डाप्रमाणे १६ डिजीट नंबर असतो. कार्ड नंबर आणि ६ डिजीट पिन असतो. हे नंबर तुम्हाला इजीव्हीच्या माहितीसह इमेलवर मिळतील. ते तुम्ही जसेच्या तसे तुमच्या ऑर्डरचे पेमेंटसाठी फक्त एन्टर करा

Flipkart EGVs

Flipkart EGVs

जर तुमची टोटल फ्लिपकार्ट इजीव्हीज् च्या संख्येपेक्षा जास्त असेल तर उरलेली रक्कम तुम्ही तुमच्या नेहमीच्या निवडीप्रमाणे भरू शकता. हे इतके सोपे आहे

खूप फ्लिपकार्ट इजीव्हीज् जमा झाल्यात? त्यांचा ट्रॅक कसा ठेवायचा ते पहा

तर तुम्ही नशीबवान आणि अखेरीस मल्टीपल फ्लिपकार्ट इजीव्हीज् घेऊन आलात! खूप छान बातमी आहे. जर तुम्हाला मल्टीपल वाऊचर्स वापरून एखादी मोठी खरेदी करायची असेल तर ती तुम्ही नक्कीच करू शकता.

जर तुम्हाला तुमचे सर्व फ्लिपकार्ट इजीव्हीज् वापरायचे असतील तर फक्त वरील डावा मेनू, वर क्लिक करा,क्लिक माझे अकौंट, खाली स्क्रोल करा व क्लिकमाझे कार्ड्स &एएमपी वर क्लिक करा; वॅलेट आणि फ्लिपकार्ट गिफ्ट कार्ड तुमचे फ्लिपकार्ट इजीव्हीज् इमेल यासाठी चेक करा गिफ्टकार्डपिन डीटेल्स लिहा, क्लिक अप्लाय आणि तुमचे काम झाले!

आता तुम्ही तुमचे वॅलेट तुमच्या गिफ्ट कार्डशी जोडलेले आहे, मग पुढील वेळी हीच पेमेंट पध्दत फ्लिपकार्ट वर काही खरेदी करताना अशीच वापरा.

एक फ्लिपकार्ट इजीव्हीज अनेक वेळी खरेदीसाठी वापरा

जर तुमच्याकडे रु. ५००/- च्या फ्लिपकार्ट इजीव्हीज् आहेत आणि तुम्हाला समजा रु. ३००/- चा परफ्युम घ्यायचा आहे, तर काळजी करू नका. तुम्हाला तुमचे फ्लिपकार्ट इजीव्हीज् एकाच खरेदीत संपवायचे आहेत असे नसते. तुमचे उरलेले रु. २००/- पूर्णपणे सुरक्षित आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही ऑर्डर दिली आणि नंतर रद्द केली तरी तुमची रक्कम सरळ तुमच्या फ्लिपकार्ट गिफ्ट कार्डवर परत जमा होते.

तुमच्या फ्लिपकार्ट इजीव्हीजचा बॅलन्स चेक करा

पुढील पध्दत वापरून तुम्ही तुमचा गिफ्ट कार्ड बॅलन्स चेक करू शकता:
जर गिफ्ट कार्ड्स आधीच वॅलेटशी जोडलेली असतील:
मायअकौंटवर जा > माय कार्ड्स& Wallet > डिटेल्स पहा
२) गिफ्ट कार्ड्स अजून वॅलेटशी जोडलेली नसतील:
येथे क्लिक करा ‘flipkart.com/rv/egv‘ -> ‘फ्लिपकार्ट गिफ्ट कार्ड हवे’ येथे जा -> तुमचा कार्ड नंबर व पिन टाका .

आता तुम्हला खर्च करण्यासाठी शिल्लक असलेली रक्कम दिसू शकते.

तुम्हाला अधिक खरेदी करण्यासाठी कार्ट मदतनीस देण्यासाठी फ्लिपकार्ट गिफ्ट कार्ड्स दिल्यापासून तुम्हाला १२ महिन्यापर्यंत वापरायची आहेत. म्हणून फ्लिपकार्टला लॉग ऑन करा आणि अपराधी वाटू न देता मनसोक्त खरेदी करा!


नेहमी विचारले जाणारे प्रश्न वाचा फ्लिपकार्टवर इलेक्ट्रॉनिक गिफ्टवौचार्र्स

Enjoy shopping on Flipkart