फ्लिपकार्ट विशमास्टर जॉय डेव्हिड हा फक्त एक महत्वाकांक्षी रॉकस्टार नाही, तर तो त्याच्या कामाच्या बाबतीतही रॉकस्टार आहे! तो त्याच्या समाजशास्त्रातील पदवीसाठी अभ्यास करत नव्हता, किंवा त्याच्या गिटारवर सूर छेडत नव्हता, तेव्हा तो अंदमान आणि निकोबार द्विपसमूहातील पोर्ट ब्लेअरचा परिसर पालथा घालून फ्लिपकार्टच्या उत्साही ग्राहकांना डिलिव्हरीज देत होता. त्याची कथा वाचा आणि त्याला कुठून प्रेरणा मिळते ते शोधा.
माझे नाव आहे जॉय डेव्हिड. मी 20 वर्षांचा आहे आणि मी फ्लिपकार्ट विशमास्टर आहे. मी अंदमान आणि निकोबार बेटांवरील पोर्ट ब्लेअर येथे राहतो. मी इथेच मोठा झालो, अभ्यास केला आणि माझं संपूर्ण आयुष्य इथेच जगलो. आता, मी समाजशास्त्रात पदवी घेत आहे आणि फ्लिपकार्ट ग्राहकांना उत्पादनेही वितरीत करीत आहे. मी माझे वडील आणि लहान बहिणीसोबत राहतो. माझे वडील भारतीय तटरक्षक दलात काम करतात आणि मी माझ्या नोकरीतून त्यांना मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो.
साथीचा रोग पसरला आणि माझे ऑनलाईन वर्ग घेतले जाऊ लागले आणि मी दिवसातील बहुतेक भाग घरीच होतो. मला निष्क्रिय बसण्याचा तिरस्कार आहे, म्हणूनच मी नोकरी शोधण्याचा आणि शक्य तितक्या लवकर स्वतंत्र होण्याचा निर्णय घेतला. माझा जवळचा मित्र आणि शेजारी नुकताच फ्लिपकार्ट विशमास्टर बनला होता आणि त्याच्या दैनंदिन जीवनाबद्दल त्याच्याशी बोलल्यानंतर मी ठरवले की ही नोकरी माझ्यासाठी फायदेशीर ठरू शकते. म्हणून मी त्याच्या हबवर गेलो, त्याच्या टीम लीडरला भेटलो आणि माझ्या मुलाखतीनंतर, मीसुद्धा ग्राहकांना डिलिव्हरी करण्यासाठीही सगळीकडे फिरत होतो.
सुव्यवस्थित असल्यामुळे मला माझा अभ्यास आणि ही नोकरी सांभाळणे खूप सोपे वाटते. मला एक समतोल साधणे शक्य झाले आहे, जिथे मी विशमास्टर म्हणून माझे लक्ष्य पूर्ण करू शकतो आणि माझ्या अभ्यासावर परिणाम होणार नाही याची खात्री करू शकतो. माझ्या वडिलांना माझ्या कामाच्या बाबतीत थोडी भीती होती. रस्त्यावर दुचाकी चालवताना माझ्या सुरक्षिततेबद्दल त्यांना चिंता वाटते, पण मला असे वाटते की मी कितीही मोठा झालो तरी त्यांना माझ्या सुरक्षिततेची काळजी वाटतच राहिल. माझा वेळ मला उत्पादकपणे वापरावासा वाटला आणि स्वतंत्र व्हावेसे वाटले त्याचा त्यांना अभिमान आहे हे मी पाहू शकतो.
मी घरी परतण्याआधी आणि माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यापूर्वी मी एका दिवसात सुमारे 40-50 डिलिव्हरीज वेगाने आणि शक्य तितक्या सुरक्षितपणे पूर्ण करतो. हबमध्ये, प्रत्येकजण खूप मदत करतो. आमचे टीम लीड्स आमच्याशी आदराने संवाद साधतात आणि आमचे लक्ष्य साध्य करण्यासाठी त्यांना शक्य असेल तसे हरप्रकारे मदत करतात. मला फ्लिपकार्ट विशमास्टर म्हणून काम करायला आवडते.
फ्लिपकार्ट आता अंदमान आणि निकोबार बेटांवर एक लोकप्रिय ई-कॉमर्स व्यवसाय बनला आहे.
लोक दररोज एक ऑनलाइन उत्पादन खरेदी करत आहेत. फ्लिपकार्टनेही येथील तरुणांसाठी संधी खुल्या केल्या आहेत.
द बिग बिलियन डेज येत आहेत आणि इतक्या प्रमाणात फ्लिपकार्टचे ग्राहकांसाठीचे वचन पूर्ण करण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. मी खूप उत्साहित आहे. मी स्वतःला आजमावून पाहण्यासाठी अधीर झालो आहे.
मला विशमास्टर बनणे आवडते पण माझे स्वप्न आहे रॉकस्टार होण्याचे! मी गिटार वादक आहे, आणि मी लीड, बास, ताल, सर्व काही खरोखरच वाजवतो. मी अरिजीत सिंग आणि जस्टीन बीबर यांच्याकडून प्रेरणा मिळते आणि मला आशा आहे की एक दिवस मी त्यांच्यासारखा प्रसिद्ध संगीतकार होईन.
#HumansOfBBD मालिकेतील इतर प्रेरणादायक कथा वाचा इथे
.