झुमा पॉलला रात्री उशिराच्या शिफ्ट करणे कठीण झाले, तेव्हा त्यांनी त्यांच्या कमाईला त्यांच्या दुकानातून जोड देण्याचा आणि फ्लिपकार्ट किराणा भागीदार बनण्याचा निर्णय घेतला. आज, त्यांच्या कामाच्या वेळेवर त्यांचे नियंत्रण आहे, ग्राहकांशी संवाद साधायला आवडते आणि त्या जे करतात त्याचा त्यांना अभिमान वाटतो. त्यांची कथा वाचा.
मी फ्लिपकार्ट किराणा भागीदार होण्याआधी, मला ते करता येणार नाही अशी काळजी वाटत होती. सुरुवातीला ते आव्हानात्मक होते, पण आता ते सोपे झाले आहे. ग्राहकांशी कसे बोलावे, पत्ते कसे शोधायचे, अभिप्राय विचारायचे हे आणि असे बरेच काही मला समजले आहे. मी जे करते ते करताना मला छान वाटते
मी 16 वर्षांची असताना माझ्या वडिलांचे निधन झाल्यानंतर माझे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मी संघर्ष केला. आम्हाला घरी खूप आर्थिक त्रास झाला आणि मला नोकरी शोधावी लागली. मी आता 26 वर्षांची आहे, आणि मी 10 वर्षांपासून माझ्या कुटुंबाला आधार देण्यासाठी काम करत आहे. माझी बहीण आणि मी दोघी काम करतो, आणि माझी आई आम्हाला प्रत्येक गोष्टीत साथ देते.
मला एका मित्राकडून या नोकरीबद्दल कळले. यापूर्वी, मी फूड डिलिव्हरी अॅप कंपनीमध्ये अर्धवेळ काम केले. तिथले काम खूप वेगळे होते. बहुतेक खाद्यपदार्थांची डिलीव्हरी रात्री उशिरा होते, त्यामुळे मला पूर्ण करण्यासाठी बरेच तास आणि रात्री उशिरा काम करावे लागले. माझ्या आईला माझी काळजी वाटायची, आणि मलाही.
फ्लिपकार्टमध्ये किराणा भागीदार म्हणून सामील झाल्यानंतर, मला बरेच लवचीकपणे काम करता येते. मी जवळच राहते आणि माझे दुकान फ्लिपकार्ट हबच्या अगदी जवळ आहे. मी दुपारच्या सुमारास इथे येते आणि संध्याकाळपर्यंत पॅकेजेस वितरीत करते आणि काम संपल्यावर घरी जाते. मी कामासाठी जे तास निवडले त्यावेळेस काम करण्याचे स्वातंत्र्य मला आहे आणि मला अधिक सुरक्षित वाटते.
काही आव्हानात्मक डिलिव्हरीज आहेत, पण बऱ्याच वेळा जेव्हा मी एखाद्या ग्राहकाला पॅकेज वितरीत करते, तेव्हा ते मला माझ्या कामाबद्दल विचारतात आणि मला चांगला अभिप्राय देतात. काही स्त्रिया माझ्याबरोबर एक छायाचित्र काढून घेण्यासाठीही विचारता कारण एक स्त्री हे काम करते याचा त्यांना अभिमान वाटतो. आजच, एका ग्राहकाने माझी विचारपूस केली, यामुळे मला खूप आनंद झाला. प्रत्येक वेळी असे घडते, मला वाटते की मी जे करते त्यामुळे मला अधिक आत्मविश्वास येतो.
मी साथीच्या काळात देखील डिलिव्हरीज केल्या, पण फ्लिपकार्ट हबमधील लोकांनी तसेच आमच्या ग्राहकांनी मला सुरक्षित राहण्यास आणि इतर सर्वांना सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व प्रोटोकॉलचे पालन करण्यास पाठिंबा दिला. त्यामुळे, मला खरोखर कधीच काळजी वाटली नाही.
मी डिसेंबर 2020 मध्ये काम सुरू केले, त्यामुळे बिग बिलियन डेजमध्ये फ्लिपकार्ट</a > किराणा भागीदार म्हणून हा माझा पहिला अनुभव आहे. मी ऐकले आहे की बऱ्याच शिपमेंट्स असतील डिलिव्हर करण्यासाठी आणि मी त्यासाठी तयार होत आहे. मी त्यावेळी अधिक कमाई करण्यासाठी आणि एक चांगले ग्राहक समाधान रेकॉर्ड राखण्यासाठी उत्सुक आहे.
उलुबारी हबमधील लोक खूप मदत करणारे आहेत आणि मला कर्मचाऱ्यांप्रमाणे वागणूक देतात. मला इथे यायला आवडते. भविष्यासाठी, मला माझ्या चालत्या दुकानाबरोबरच हे चालू ठेवायचे आहे. मला माहीत आहे की फ्लिपकार्ट मला पाठिंबा देत राहिल आणि त्याहूनही जास्त मला माहीत आहे की माझी बहीण आणि आई माझा उत्साह आणखी वाढवण्यासाठी आहेत.
हे देखील वाचा: या बिग बिलियन डेज च्या काळात लवचिकतेची भावना साजरी करा #HumansOfBBD बरोबर