1. Home
  2. Marathi
  3. ओडिसामध्ये, वीणकर समुदायाच्या 100-वर्ष जुन्या कलेची फ्लिपकार्टसह भरभराट झाली

ओडिसामध्ये, वीणकर समुदायाच्या 100-वर्ष जुन्या कलेची फ्लिपकार्टसह भरभराट झाली

0
Read this article in हिन्दी | English | বাংলা | தமிழ் | ಕನ್ನಡ | ગુજરાતી

फ्लिपकार्ट आणि ई-कॉमर्स यांच्यासह, या ओडिसातील विणकरांच्या समुदायाने त्यांची प्रख्यात टेक्सस्टाईल हस्तकला आणि हातमाग कौशल्ये देशभर पोहचवली. या कथेमध्ये, तरूण चित्रांगण पाल त्यांच्या समुदायाला एक फ्लिपकार्ट विक्रेता म्हणून सादर करतात आणि हे काम त्यांच्या संस्कृतीचा एक अंगभूत घटक कसा आहे याबद्दल बोलतात. तसेच, बदलत्या काळात, परंपरेमध्ये देखील काहीतरी चांगले घडून येण्यासाठी उत्क्रांती झाली.

ओडिसामध्ये, वीणकर समुदायाच्या 100-वर्ष जुन्या कलेची फ्लिपकार्टसह भरभराट झाली
0

माझे नाव चिंत्रागण पाल आहे आणि मी 22 वर्षाचा आहे. मी 2019 मध्ये फ्लिपकार्ट विक्रेता बनलो. मी ओरिसाच्या कटक येथील आहे.

मी विणकरांच्या समाजाचा भाग आहे. आम्ही संबलपुरी साड्या हाताने विणतो आणि विकतो ज्या कटान आणि इकट रेशमापासून बनवतात. हे आमचे 100 वर्षापासून पूर्वीपासूनचे काम आणि परंपरा आहे. आम्ही हातमागावरील साड्या , ड्रेस मटेरीयल, स्टोल, दुपट्टा, टेबल लिनन आणि किचन लिनन यांची विक्री करतो. आमच्याकडे सर्व वयोगटाच्या लोकांसाठी हॅ़डलूमच्या कपड्यांची रेंज आहे.

जेव्हा आम्ही ऑनलाइन विक्री करण्यास सुरूवात केली तेव्हा फ्लिपकार्ट ने आम्हाला आमच्या 200 पेक्षा जास्त साड्या सूचीबद्ध करण्यास मदत केली. मला अभिमान आहे की ओरिसा राज्यातील उत्पादनांना दृश्यमानता मिळत आहे. फ्लिपकार्ट ने आम्हाला आमची उत्पादने देशभर विकण्यासाठी देखील मदत केली. फ्लिपकार्टला जॉईन होण्यापूर्वी, आम्ही आमची उत्पादने आमच्या गावामध्ये किंवा राज्यामध्ये विकत होतो, मात्र आता आमची उत्पादने ही देशभरातील ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत.

आम्ही 1000 विणकर आणि 200 डिझाइनर्सचा समुदाय आहोत. याचाच अर्थ 1,000 कुटुंबे ही या हॅण्डलूम साड्या तयार करण्यासाठी एकत्रित काम करत आहेत. आम्ही जेव्हा रेशीम आणि कापूस यासारखा कच्चा माल खरेदी करतो, तेव्हा तो आम्ही आमच्या विणकरांच्या समुदायात वितरीत करतो. एकदा डिझाईनच्या आवश्यकता त्यांना सांगितल्या, की ते हॅण्डलूम साड्या त्यांच्या घरी बनवतात.

handloom sarees

फ्लिपकार्टपूर्वी, आम्ही सुमारे 40 वर्षे परंपरागत साडी विक्रेते होतो आणि आम्ही त्याच डिझाइन सह काम करत होतोय आमचे ग्राहक देखील ओरिसा आणि कोलकातापुरते मर्यादित होते आणि अऩेक राज्यांना आमच्या परंपरागत हस्तकला आणि कौशल्ये याबद्दल माहिती नव्हती. आमचे नफ्याचे प्रमाण फार अधिक नव्हते आणि आमची डिझाईन ही जुन्या फॅशनचीच राहिली.

ऑनलाइन विक्री करताना आम्हाला अभ्यास करण्यास आणि बाजारातील ट्रेण्डला आणि स्थानावर आधारित विक्रीला समजावून घेण्यास मदत झाली. आता आम्हाला वेगवेगळ्या साड्या आणि डिझाइन यासाठी मागणी कोठे जास्त आहे ते माहित आहे. आमची अऩेक उत्पादने बंगलुरू आणि अऩ्य दक्षिणेतील शहरापर्यंत पोहचत आहेत. आमचे अनेक ग्राहक आहेत जे महानगरामध्ये रेशीम उत्पादने खरेदी करत आहेत आणि जवळपासच्या शहरामध्ये कॉटन उत्पादनांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

फ्लिपकार्टवर विक्री करताना, आमचे फायद्याचे प्रमाण देखील लक्षणीय रितीने वाढलेले आहे. आमच्या उत्पादनासाठी मागणीमध्ये वाढ म्हणजे माझ्या माणसांसाठी अधिक काम आणि सन्मानाने त्यांची उपजीविका कमावण्याची त्यांच्यासाठी अधिक संधी आहे

जिष्णू मुरली यांना सांगितले तसे, पल्लवी सुधारक यांनी पुरविलेल्या अतिरीक्त माहितीसह


हे देखील वाचा: Dreams Uninterrupted – A Surat Family Business Navigates Uncertainty Through E-commerce

Dreams uninterrupted: A Surat family business navigates uncertainty through e-commerce

Enjoy shopping on Flipkart

About the Author

Jishnu Murali

जिष्णू मुरली फ्लिपकार्ट स्टोरीज सह लेखक आहेत. पाककृती, इतिहास आणि परंपरेद्वारे वेगवेगळ्या संस्कृतींचा अनुभव घेणे त्याला आवडते. संगीत आणि गडद विनोद त्याला जिवंत ठेवतात.

jQuery('.more').click(function(e) { e.preventDefault(); jQuery(this).text(function(i, t) { return t == 'close' ? 'Read More' : 'close'; }).prev('.more-cont').slideToggle() });