एकत्रित सशक्त – या पतीपत्नीच्या जोडीने फ्लिपकार्ट विक्रेते म्हणून त्यांचा सर्वोत्तम मैलाचा दगड साध्य केला!

Read this article in हिन्दी | English | বাংলা | தமிழ் | ಕನ್ನಡ | ગુજરાતી

#सेल्फमेड फ्लिपकार्ट विक्रेते रितेश आणि त्यांची पत्नी यांनी त्यांच्या आर्थिक प्रगतीची सूत्रे हातात ठेवण्यासाठी उद्योजक म्हणून आणि व्यावसायिक भागीदारभागीदार म्हणून सुरुवात केली. ऑफलाइन विक्री करताना, त्यांचा व्यवसाय त्यांनी जसे स्वप्न बघितले होते त्याप्रमाणे वाढत नव्हता. लवकरच, त्यांनी ई-कॉमर्सचे फायदे आणि सहजता कवेत घेतली आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही! दी बिग बिलीयन डे 2020 च्या दरम्यान, या डायनामिक जोडीने त्याची विक्रीने शिखर गाठल्याचे पाहिले! त्यांची प्रोत्साहित करणारी कथा वाचा आणि त्यांना त्यांचा खरा व्यवसाय फ्लिपकार्टवर कसा मिळाला ते पहा

Flipkart sellers

या कथेमध्ये: या पतीपत्नीच्या जोडीने व्यवसाय भागीदारभागीदार कसे बनले आणि #सेल्फमेड फ्लिपकार्ट विक्रेते म्हणून व्यवसाय कसा मिळाला ते पहा.


माझे नाव रितेश कुमार शर्माआहे. माझी पार्श्वभूमी लष्करी आहे — माझे वडील सशस्त्र दलामध्ये होते — आणि कुटुंबामध्ये व्यवसाय सुरू करणारा मी पहिला होतो. मी एलआर रिटेल नावाची कंपनी चालवतो आणि फ्लिपकार्ट वर आमचा ब्रॅण्ड मोक्षी असा आहे. मी एक फ्लिपकार्ट विक्रेता जानेवारी 2016 पासून बनलेला आहे.

एक उद्योजक बनणण्यापूर्वी, मी सेवा सेक्टरमध्ये काम करत होतो, मात्र लवकरच मला समजले की मला माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करावयाचा आहे. मला आधीच माहीत होते की माझा व्यावसायिक भागीदार कोण असेल ー माझी पत्नी, जी आता एलआर रिटेलची मालक आहे

मी आणि माझ्या पत्नीने आमचा व्यवसाय ऑफलाइन विक्रीने सुरू केला आणि त्यापासून भरपूर काही शिकलो. एकदा का आम्हाला जाणवले की आम्ही अधिक ग्राहकांपर्यंत पोहचू शकतो आणि आम्ही ऑनलाइन विक्री केल्यास आमचा व्यवसाय वाढवू शकतो, आम्ही #सेल्फमेड फ्लिपकार्ट विक्रेते म्हणून नोंदणी केली. जेव्हा आम्ही आमचा ग्राहक पाया पाहिला ज्यांना आम्ही विक्री करत आहोत तेव्हा आम्हाला जाणवले की आम्ही योग्य निवड केलेली आहे. एकदा का आम्ही ऑनबोर्ड झालो, आम्हा प्रत्येक दिवसाला 10-20 ऑर्डर मिळत होत्या आणि लवकरच ती संख्या वाढण्यास सुरूवात झाली. आम्हाला 35-40 ऑर्डर दिवसाला मिळण्यास सुरूवात झाली आणि आज आम्हाला दिवसाला कमीत कमी 100 ऑर्डर्स प्राप्त होत आहेत.

आतापर्यंतचा अनुभव अतिशय चांगला होता. आता आमचे सर्व लक्ष आणि प्रयत्न हे फ्लिपकार्ट कडून येणाऱ्या ग्राहकांवर केंद्रित आहेत आणि त्यानंतर आम्ही कधीच मागे वळून पाहिले नाही. फ्लिपकार्ट बरोबर भागिदारी केल्यापासून झालेला प्रभाव अविस्मरणीय आहे!

या वर्षाच्यादि बिग बिलीयन सेल डे विक्रीच्या पूर्वी आम्ही प्रत्येक गोष्ट तपशीलवार योजले होते — आमच्या ग्राहकांसाठी ऑफर्स, सूचीबद्ध करावयाची उत्पादने, पॅकिंग साहित्याची खरेदी, वेअरहाऊसचे जागा व्यवस्थापन आणि ग्रहाकांच्या मागणीला पुरे पडणे. वेअरहाऊसची जागा, लॉजिस्टिक, आणि फ्लिपकार्ट विक्रेते संघाचे सर्व सहाय्य यांचा आम्हाला खरोखर फायदा झाला.

या प्रयत्नाचा परिणाम म्हणून, आम्ही यशस्वीरित्या आमचे लक्ष्य गाठले होते. या वर्षाच्या सेल मध्ये आम्ही दररोज जवळपास 70,000 उत्पादने विकत होतो.

या वर्षी सुरूवातीला, कोविड-19 च्या साथरोगाच्या लॉकडाउन मध्ये, प्रत्येक गोष्ट बंद होती. आम्हाला वाटले होते की आमचा व्यवसाय परत सुरळीत होऊ शकणार नाही. पण त्यावेळी आम्हाला फ्लिपकार्ट कडून कॉल आला आणि आम्ही पु्न्हा ऑनलाइन विक्री करण्यास सुरूवात करू शकू असे सांगितले गेले. आम्ही सॅनिटायझेशनच्या बाबतीत सरकारचे सर्व निर्देश पाळले आणि आम्ही आमच्या कर्मचाऱ्याची सर्वाधिक काळजी घेतली.

आमच्या कर्मचाऱ्यांनी व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू करण्यास प्रत्येक पावलावर मदत केली. आमचे फ्लिपकार्टमधील अकाउंट मॅनेजर देखील नियमितपणे संपर्कामध्ये होते आणि त्यांच्या सूचनांनुसार आमची व्यवसाय कार्यामध्ये सुधारणा केली.

फ्लिपकार्ट आमच्या सारख्या विक्रेत्यासाठी सहाय्यकारी आहे. ऑनबोर्डिग हे अतिशय सोपे आणि त्याचा पत्रव्यवहार अतिशय पारदर्शक आहे. उत्पादने सूचीबद्ध करण्यापूर्वी सर्व गोष्टीची चर्चा केली आणि मला असे निदर्शनास आले की आमच्या अकाउंट मॅनेजरच्या सूचनांचे पालन करण्याने आमचे यश सुनिश्चित झाले!

जिष्णू मुरली यांना सांगितले तसे, पल्लवी सुधारक यांनी पुरविलेल्या अतिरीक्त माहितीसह


Loved this story? या मजेशीर, आंतरक्रियीत नकाशावर भारत भरातील फ्लिपकार्ट विक्रेत्यांच्या अधिक गोष्टी ऐकण्यासाठी नॅव्हिगेट करा!

Enjoy shopping on Flipkart