#सेल्फमेड: दिवसाला 5 ऑर्डरपासून ते 700 ऑर्डरपर्यंत, ही महिला उद्योजक म्हणते की फ्लिपकार्ट हा सर्वोत्तम व्यावसायिक निर्णय होता!

Read this article in हिन्दी | English | ગુજરાતી | ಕನ್ನಡ | বাংলা | தமிழ்

तिच्या स्वतःच्या वेबसाईटवर तिचा इलेक्ट्रॉनिक व्यवसाय वेग घेत नव्हता तेव्हा, चित्रा व्यास तिच्या व्यवसायाची विक्री सुधारण्यासाठी फ्लिपकार्टकडे वळली. त्यानंतर लवकरच, तिच्या व्यवसायाने ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद अनुभवला. अगदी जेव्हा कोविड-19 चा हल्ला झाला तेव्हाहीती जुळवून घेऊ शकली आणि भरभराट करू शकली. या महत्वाकांक्षी विक्रेतीने, थोडक्यातून सुरुवात करून, “सर्वोत्तम उद्योजिका” पुरस्कार जिंकण्यापर्यंत कशी मजल मारली ते जाणण्यासाठी वाचा

entrepreneur

माझे नाव चित्रा व्यास आहे. मी 5 वर्षांपूर्वी फ्लिपकार्ट विक्रेती बनले. मी माझा प्रवास इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू विकणारी एक उद्योजिका म्हणून सुरू केला. माझ्या पतींनी पूर्वी ई-कॉमर्स उद्योगामध्ये काम केल्यामुळे आम्हाला ऑन-लाइन विक्री करावीशी वाटत होती यात शंका नाही.

आम्हाला गुंतवणूकदाराची गरज होती आणि आम्हाला शोधण्यासाठी फार दूर जावे लागले नाही. माझ्या काकांनी व्यवसायात गुंतवणूक केली आणि लवकरच,आमची उत्पादने विकण्यासाठी आमची स्वतःची वेबसाईट होती. पण आमची उत्पादने बाजारपेठेत योग्यप्रकारे पाहिली जावी यासाठी आमच्याकडे योग्य मार्गदर्शन उपलब्ध नव्हते. त्याचवेळी आम्ही फ्लिपकार्ट कडे वळलो. आम्हाला आशा होती की आमचे सर्व स्रोत एकत्र केल्यावर आम्हाला चांगले परिणाम पाहण्यास मिळतील.

entrepreneur

जोडले गेल्यानंतर लगेचच Flipkart, आम्हाला विक्रीमध्ये प्रचंड लाट आलेली दिसली. एका आठवड्याच्या आत, आम्हाला 100 ऑर्डर्स मिळाल्या! फ्लिपकार्टने आम्हाला आमच्या ग्राहकांचा पाया विस्तारण्यासाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन केले. आम्हाला व्यवसायाबद्दल सल्ला देण्यासाठी एका अकाउंट मॅनेजरची नियुक्ती केली गेली होती. आणि त्यांनी आम्हाला आमच्या सूचीमध्ये अधिक श्रेणींचा समावेश करण्यास सुरूवात करण्याचा सल्ला दिला. त्याच वेळी आम्ही फॅशन श्रेणीमध्ये आमच्या संधी शोधण्यास सुरूवात करण्याचा निर्णय घेतला.

आमचे अकाउंट व्यवस्थापक परिपूर्ण होते- त्यांनी आम्हाला बिग बिलीयन डे विक्रीसाठी तयार केले आणि फ्लिपकार्ट ग्राहकांनीनोंदविलेल्या ऑर्डरच्या वर्षावास पुरे पडण्यासाठी विक्रीसाठीचा माल पुन्हा कसा भरावा हे दाखविले. अगदी जेव्हा कोविड-19 च्या साथीमुळे आमच्या व्यवसायाचे नुकसान झाले त्यानंतर, आम्हाला आमची विक्री परत मार्गावर आणावयाची होती तेव्हा त्यांनी त्यात प्रत्यक्ष सक्रिय सहभाघ घेतला. फ्लिपकार्टमधील अकाउंट व्यवस्थापक हे अतिशय मदत करणारे आणि फ्लिपकार्टवर विक्री करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पैलू आहेतृ आम्ही कुठे अडकलो किंवा काही समस्या निर्माण झाली तर, आम्ही फक्त त्यांना निरोप पाठवतो आणि ते आमच्या मदतीसाठी हजर असतात.

During the कोविड-19 लॉक डाउन च्या काळात, फ्लिपकार्टने आम्हाला हमी दिली. त्यावेळी पादत्राणे ही आमची प्रमुख श्रेणी होती आणि अऩ्न व पौष्टिक विभागात आम्ही सुकामेवा विकण्यास नुकतीच सुरूवात केली होती.

लॉकडाउन पूर्वी, सुक्यामेव्यासाठी आम्हाला 20-30 ऑर्डर्स मिळत होत्या, त्याचवेळी आमची बहुतांश विक्री पादत्रांणामधून होत होती. मात्र कोविड-19 नंतर त्यात बदल झाला – आम्हाला आमच्या पादत्राणे श्रेणीबद्दल आणि आमच्या व्यवसाय कसा टिकून राहिल याबद्दल काळजी वाटत होती. मात्र फ्लिपकार्टने आम्हाला सुकामेवा आणि शिधा श्रेणीविषयी माहिती दिली. लॉकडाउननंतरच्या पहिल्या दिवशी आम्हाला सुक्यामेव्यासाठी 400-500 ऑर्डर्स मिळाल्या!

आता आम्ही पॅकेजिंग देखील करतो आणि सुका मेव्याचा स्वतःचा ब्रॅण्ड देखील सॉफ्ट आर्ट नावाने सुरू केला आहे. हे फ्लिपकार्टने आम्हाला देऊ केलेल्या अनेक संधीपैकी फक्त एक उदाहरण होते! अगदी जेव्हा लॉकडाउनच्या बंधनांमुळे फ्लिपकार्ट लॉजिस्टिक्सकडे आमची उत्पादने पाठवण्यात अडथळे आले तेव्हाही त्यांनी चाकोरीबाहेर जाऊन आमच्या घरून ती पिकअप केली.

entrepreneur

मागील 6 महिन्यात, अगदी आमच्या कुटुंबातील सदस्य ज्यांनी कधीही ऑनलाइन शॉपिंग केले नव्हते त्यांनी जीवनावश्यक वस्तू आणि अन्य उत्पादने ई-कॉमर्सच्या मदतीने खरेदी करण्यास सुरूवात केली. ऑनलाइन शॉपिंग हा आता व्यवसाय आणि ग्राहक या दोघांसाठी सारख्याच प्रकारे सर्वांत सुरक्षित पर्याय आहे.

मी म्हणेन की आताच्या सारख्या काळात कोणत्याही होतकरू उद्योजकाला, फक्त योग्य मार्गदर्शनाची गरज असते, जसे आम्हाला फ्लिपकार्टकडून मिळाले आणि आम्ही एक ऑनलाइन विक्रेते म्हणून झपाट्याने वाढू लागलो!

मी कधीही कल्पना केली नव्हती की मी अशी यशस्वी उद्योजिका बनू शकेन. दोन वर्षांपूर्वी मला फ्लिपकार्टच्या महिला विक्रेत्यांमधील एक awarded “सर्वोत्तम उद्योजिका” म्हणून पुरस्कार दिला गेला. तुमची सुरुवात पाच ऑर्डर्सने होते आणि आता तुम्हाला दररोज 700 ऑर्डर्स मिळतात तेव्हा खूप छान वाटते. आम्ही अगदी थोडक्यातून सुरुवात केली आणि आता आमचे एक संपूर्ण ऑफिस आहे, आमचा प्रवास अजूनही आनंदाने सुरू आहे.

जिष्णू मुरलीयांना सांगितले तसे, पल्लवी सुधारक यांनी पुरविलेल्या अतिरीक्त माहितीसह.

Enjoy shopping on Flipkart