
निती वैष्णव, जयपूर येथील फ्लिपकार्ट विक्रेती
जसे जिष्णू मुरलीला सांगितले
2015 मध्ये मी प्रथम फ्लिपकार्ट वर एक विक्रेती म्हणून आले. मात्र त्यावेळी मी गरोदर होते, म्हणून मी माझ्या बाळावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले. 2018 नोव्हेंबर मध्ये, मी फ्लिपकार्ट वर पुन्हा माझी उत्पादने सूचीबद्ध करण्याचे ठरवले.
मी महिलांचे कपडे विकत होते आणि माझी विशेषता एथनिक वेअर होती.नोकरीची सुरक्षितता लक्षात ठेवून, मी काम करणे पुढे सुरू ठेवले. मात्र जेव्हा मी माझ्या दुसऱ्या बाळासाठी गरोदर राहिेले, तेव्हा मी खूप व्यस्त झाले. एक उद्योजक बनण्याचे माझे जुने स्वप्न होते. मात्र माझ्यासाठी, पूर्ण वेळ काम हे शक्य नव्हते. घरातून ऑनलाईन काम करण्याने मला माझ्या करियरच्या मागे लागता आले, आणि त्याचवेळी मी माझ्या मुलांची देखील काळजी घेत होते.
माझा फ्लिपकार्टचा प्रवास हा एक रोलक-कोस्टर प्रमाणे होता. मी जेव्हा सुरूवात केली, तेव्हा मी विक्रीसाठी फक्त एका श्रेणीचे कपडे ठेवले. पायजम्याची जोडी. त्या आठवड्यामध्ये, मला भरपूर ऑर्डर मिळाल्या आणि मला माझा स्टॉक पुन्हा भरावा लागला. मला त्याची अपेक्षा नव्हती. प्रेरित होऊऩ मी कुर्ती आणि अऩ्य महिलांची प्रावरणे यासारख्या अनेक उत्पादनांची यादी करण्यास सुरूवात केली. या अनुभवाने मला आणखी पुढे जाण्याची संधी मिळाली.
माझ्याकडे मदतीचे हात होते — 3-4 महिलांची टिम, ज्या माझ्या प्रमाणेच, नोकरीला पूर्ण वेळ देऊ शकत नव्हत्या. प्रगतीचा अनूभव घेत, माझे सहकारी देखील प्रेरित झाले आणि आपण किती पूढे जाऊ शकतो हे पाहण्याचे ठरवले, त्यांनी जेव्हा माझ्याबरोबर काम सुरू केले, तेव्हा त्यांना देखील ई-कॉमर्सचा अऩुभव नव्हता. मात्र संघासोबत काही काळ काम केल्याने, त्यांनी ते देखील शिकून घेतले. आता जेव्हा मागणी वाढायला लागली, तेव्हा कोणते उत्पादन विकले जात आहे ते पाहण्यास आणि मागणी कशी पूर्ण केली जाऊ शकते ते पाहण्यास त्या उत्सुक आहेत. त्यांनी त्यांच्या या करियरच्या मार्गावर विश्वास ठेवयला सुरूवात केली. त्यांच्यापैकी काहीजणी आमच्यापासून दूर गेल्या आणि त्यांनी त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला. मला वाटते याने शिकणे, निर्धार करणे आणि सर्वात महत्वाचे ,स्वतःवरील विश्वास दाखविला.
मी फॅशन डिझाइनिंग मध्ये प्रशिक्षण घेतले होते. आणि मी महिलांच्या कपड्यांकडे अधिक झुकलेली होती कारण मला त्यामध्ये अधिकाधिक क्रिएटिव्ह संधी दिसत होत्या. मला माझी कौशल्ये वापरावयाची होती. ऑनलाइन विक्रीने मला प्रादेशिक एथनिक पोशाख संपूर्ण भारतातील ग्राहकांना विकण्याची संधी देऊ केली. आता प्रत्येकजण अधिक वैश्विक होत आहे – मला वाटते की प्रादेशिक ट्रेंड हा ऑनलाइन विक्री करताना थोडेफार मदत करतो. तो वयानूसार आणि ऑनलाइऩ खरेदी करणा-याच्या आदर्शवादाला जास्त भावतो. चेन्नई मधील कोणाला तरी दिल्लीमध्ये खरेदी करणाऱ्या कोणासारखे तरी आवडते. फ्लिपकार्ट भारतभर पोहचल्यामूळे, ग्राहकाचे राहण्याचे ठिकाण हे अगदी कमी महत्वाचे ठरते.
मला हे सुरुवातीपासून स्पष्ट होते की फ्लिपकार्ट हाच पुढे जाण्याचा मार्ग आहे. 2015 मध्ये सुरूवातीला, जेव्हा मी ऑनलाइन विक्री करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मी फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि स्नॅपडील सारख्या एकाधिक प्लॅटफॉर्मवर विक्री करण्याचा प्रयत्न केला, मला फ्लिपकार्टवर मिळालेला प्रतिसाद अविश्वसनीय होता आणि तो इतर सर्व प्लॅटफॉर्मपेक्षा अधिक चांगला होता.
त्यावेळी, मी मात्र ऑनलाईन गोष्टी कशा काम करतात याबद्दल अनभिज्ञ होते. डॅशबोर्डवर काम कसे करावे? माझ्या उत्पादनांची ऑनलाइन विक्री कशी करावी आणि ग्राहकांची मागणी कशी पूर्ण करावी? फ्लिपकार्टने माझ्यासाठी या सर्व गोष्टी समजावून घेणे सोपे केले त्यामूळे माझा कल पुढे जाण्यात होता आणि माझे फ्लिपकार्टबरोबरचे संबंध आणि त्यांच्यामार्फत, माझ्या ग्राहकांसोबतचे संबंधही वाढत राहीले.
फ्लिपकार्टचा डॅशबोर्ड माझ्या सारख्या विक्रेत्यांसाठी एक चांगली मदत आहे. तो तुमच्यासाठी बरेचसे काम करतो. असे वाटते की माझ्या व्यवसायावर लक्ष ठेवण्यासाठी फ्लिपकार्ट कडून एखादा माणूस नियुक्त करण्यात आलेला आहे. माझ्या कोणत्या उत्पादनांची विक्री होत आहेत आणि कोणत्या नाही यांची यादी तयार करतो आणि तो माझ्या कमतरताकडे निर्देश करतो ज्यावर मला सुधारणा करण्यासाठी काम करावे लागते. तो मला माझ्या व्यवसायाचे विश्लेषण करण्यास मदत करतो आणि कोणतिही समस्या सोडवू शकतो.
डॅशबोर्ड मला माझ्या ग्राहकांना ते ऑनलाइन शॉपिंग करताना काय हवे आहे आणि ते कशाचा शोध घेत आहेत हे समजावून घेण्यासाठी मदत करतो. पूर्वी, मी जर 20 कुर्ती तयार केल्यातर, मला पहिला प्रश्न पडायचा “त्या विकल्या जातील?” काही प्रमाणात अऩिश्चितता होती. मात्र आता मला माहित आहे ,मी जर नवीन डिझाईन विकण्याचे ठरवल्यास, मी डिझाईन तयार करते त्याच्या 50कुर्ती तयार करते आणि मला माहित असते त्या विकल्या जातील.
सणावाराच्या वेळी माझी विक्री वाढते. ते अलिकडेच रमजानच्या वेळी घडले, जेव्हा मला एका विशिष्ट उत्पादनासाठी दुप्पट ऑर्डरी मिळाल्या. वास्तविक, जेव्हा उत्सव येतो, मला विक्री मध्ये 200% वाढीची अपेक्षा असते. जे मला उत्पादनाच्या नवीन डिझाइनवर काम करण्यास प्रेरीत करते आणि मी माझा वेळ ऑनलाइन ट्रेण्ड शिकण्यामध्ये देते.
माझे कुटुंब माझ्या फ्लिपकार्ट विक्रेती असण्यावर पूर्णपणे विश्वास ठेवते! माझी प्रगती आणि स्वतंत्रता पाहून, ते अधिकाधिक समर्थन देऊ लागले आहेत. सुरूवातीला, माझे कुटुंब आणि माझे पती मी काम करण्याच्या विरूद्ध होते. त्याचा असा विश्वास होता की मी माझ्या नवजात बालकावर जास्त लक्ष द्यावे. आजचे चित्र असे आहे की, माझा नवरा माझ्यासाठी अगदी पॅकेज टाकतो आणि मला शक्य त्या प्रकारे मदत करतो. माझी ताकद ओळखण्यात माझी मदत करण्यात तो अतिशय तत्पर असतो.
फ्लिफकार्ट ही संपूर्ण देशासाठी खिडकी आहे, जरी तुम्ही एका ठिकाणी बसलेला असला तरी देखील.
हे देखील वाचा: विक्रेत्यांच्या यशोगाथा: प्रत्येक दिवशी भारतीयाचा विजय