#सेलफमेड: बालवाडी शिक्षिका ते ऑनलाइन उद्योजक, रॉकेट,सिंगद्वारे प्रेरित!

Read this article in हिन्दी | English | বাংলা | தமிழ் | ಕನ್ನಡ | ગુજરાતી

सुमित कौरला तिची बालवाडी शिक्षिकेची नोकरी आवडत होती. तिने बॉलिवूड हिंदी चित्रपट रॉकेट सिंग: सेल्समन ऑफ द इयर, बघितला व तिच्या आय़ुष्यामध्ये खूप गोष्टी बदलल्या: सेल्समन ऑफ द इयर प्रेरित झालेल्या, तिने तिचा ऑनलाइन व्यवसाय सुरू केला. फ्लिपकार्टवर विक्री चालू केल्यानंतर, सूमितचे नशीब आकाशात झेप घेऊ लागले. आणि तिने कंपनीचे नाव काय ठेवले असेल अंदाज करा? रॉकेट सेल्स कॉर्प! या धमक आणि निर्धार यांच्या गोष्टीपासून प्रेरित झालेली.

Flipkart seller

सुमित कौर, दिल्लीतील फ्लिपकार्ट विक्रेती

जसे जिष्णू मुरलीला सांगितले तसे


मी 2013 मध्ये एक फ्लिपकार्ट विक्रेती बनली. आतापर्यंतचा प्रवास खूप चांगला आहे. मी सातत्याने माझा व्यवसाय विस्तारित करण्यावर काम करत आहे. लोक बहुदा ऑनलाईन व्यवसाय सुरू करतात आणि तेवढ्याच लवकर तो बंद देखील करतात. मात्र मी मागील सहा वर्षापासून काम करत आहे आणि मला असे वाटत नाही की मला याचा कंटाळा आला आहे. मी नवीन श्रेणी सुरू केल्या आहेत आणि नवीन उत्पादने जोडलेली आहेत — ऑनलाईन विक्री मला विभिन्न श्रेणीमध्ये विक्री करण्याचे स्वातंत्र्य देतो.

ऑफलाइन स्टोअर सुरू करणे ही खर्चिक गोष्ट असते. भाडे आणि साहित्याची किंमत ही एक लहान नशिबाएवढी असते. म्हणूनच ऑनलाइन विक्री करण्याची कल्पना माझ्या डोक्यात आली. कारण ऑनलाईन ग्राहक म्हणून प्रत्येक गोष्ट कशी काम करते याबद्दल मी खरोखर चौकस होते . मी अशा लोकांकडे गेले जे आधीपासूनच ऑनलाईन व्यवसाय चालवित आहेत आणि मी त्यांच्याकडून खूप काही शिकले. एक ऑफलाईन स्टोअर चालवण्याच्या तुलनेमध्ये ऑनलाईन विक्री हे विक्रेत्याकडून अतिशय कमी मागणी करते. मला खरोखर वाटते की संपूर्ण देशच माझी बाजारपेठ आहे.

मी सुरूवातीला सौंदर्य उत्पादने आणि डिओड्रन्टस् पासून प्रारंभ केला, जी उत्पादने मी सहजपणे आणि कमी किंमतीला खरेदी करू शकते. नंतर मी पर्फ्युम, कोलोन्स आणि नंतर आरोग्य व वेलनेस श्रेणीत विक्री करण्याकडे वळले कारण मला असे आढळून आले की उत्पादनातील अधिक विविधता थेट चांगल्या विक्री आकड्यांमध्ये प्रतिबिंबित होते. म्हणून मी फ्लिपकार्टवर अधिकाधिक उत्पादनांना सूचीबद्ध करू लागले. अलिकडेच मी होम अप्लायंसेस ची विक्री करण्यास सुरूवात केली.

मला जेव्हा जेव्हा समस्येचा सामना करावा लागला तेव्हा फ्लिपकार्ट नेहमीच मला मदत करण्यास तयार होता. मला माहित नसलेल्या विविध विषयांवरील ज्ञान मिळवण्यासाठी मी वेबिनारला हजर राहण्यास सुरूवात केली. जेव्हा पासून मी फ्लिपकार्टच्या विक्री टिप्स आणि श्रेणीबद्ध प्रणालीचे अनुसरण करण्यास सुरूवात केली तेव्हापासून मी गोल्ड विक्रेती झाली आहे. माझे कार्यालय प्रमाणपत्राने भरलेले आहे.

माझी इच्छा आहे की माझ्या उत्पादनाची विक्री रॉकेटप्रमाणे असावी, आणि आम्ही शीख समुदायातून असून, प्रामाणिक आणि कष्टाळू लोक आहोत. बॉलिवूडमधील चित्रपट ‘रॉकेट सिंग: ’ सेल्समन ऑफ द इयर” ज्यामध्ये एका शीख व्यक्तीने त्याची यशोगाथा शून्यातून उभी केली, त्याच्यापासून मी प्रेरणा घेतली आणि माझ्या कंपनीचे नाव रॉकेट सेल्स कॉर्प असे ठेवले,

एक फ्लिपकार्ट विक्रेती म्हणून माझी झालेली प्रगती अतुलनीय आहे. मी फक्त रू. 10,000 मध्ये सुरूवात केली आणि आता माझी उलाढाल करोडोमध्ये आहे.

आता माझी उत्पादने जवळपास सर्व ऑनलाईन प्लॅटफॉ़र्मवर सूचीबद्ध केलेले आहेत. मी फ्लिपकार्टवर आरंभ केला आणि ते माझ्या संपूर्ण ऑनलाईन उद्योजकतेच्या प्रवासामध्ये मला अतिशय सहयोग देणारे होते. ते माझ्या जागेवर देखील आले होते आणि मला माझा व्यवसाय सेट अप करण्यास मला मदत देखील केली.

माझ्या या वर्षाच्याद बिग बिलीयन डेज सेल साठी फार मोठ्या योजना आहेत. मी अलिकडे गृहोपयोगी उपकरणाच्या श्रेणीमध्ये विक्री करण्यास सुरूवात केली आणि आता मला शक्य आहेत तेवढी जास्त उत्पादने मी सूचीबद्ध करण्याची योजना करत आहे. यावर्षी माझे एक व्यावसायिक ध्येय आहे आणि ते आहे गृहोपयोगी उपकरणांच्या श्रेणीमध्ये विक्रीचा विस्तार करणे.

मी फ्लिपकार्ट मध्ये जे काही करत आहे त्यामध्ये माझ्या कुटुंबाने देखील सक्रिय स्वारस्य घेतलेले आहे. माझ्या पतीचा बांधकाम व्यवसाय आहे. मी जेव्हा माझा स्वतःचा व्यवसाय करण्याचे ठरवले तेव्हा त्यांनी मला संपूर्ण सहकार्य दिले. अगदी माझी मुले ही त्यांचे स्वतःचे छोटेसे योगदान देऊन मला मदत करतात. मी काम करत असताना विचलित होऊ नये याची ते खात्री करतात आणि ते आता स्वतःची थोडी अधिक काळजी घेऊ लागले आहेत, ज्यामुळे मी माझ्या स्वप्नांवर अधिक लक्ष केंद्रित करू शकते. काही कालावधीनंतर, माझ्या पतीने त्यांचा व्यवसाय गुंडाळला आणि मला पूर्ण वेळ मदत करण्यास सुरूवात केली. आता आमची इन्फिटी ग्रुप नावाची आणखी एक कंपनी आहे जी फ्लिपकार्टवर विक्री करत आहे.

शिक्षक असणे ही एक समाधानकारक नोकरी आहे. मात्र एक अशी वेळ आली की बालवाडीमध्ये शिकवण्याने माझ्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करणे शक्य होत नव्हते. म्हणून मी माझे स्वतःचे असे काहीतरी सुरू करण्याचे ठरवले आणि फ्लिपकार्ट विक्रेती ही मला सुचलेली सर्वोत्तम कल्पना आहे.


हे देखील वाचा: #सेलफमेड घरकाम ते कर्तुत्ववान उद्योजिका— या फ्लिपकार्ट विक्रेतीने तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीवर मात केली

Enjoy shopping on Flipkart