#सेलफमेड – टेबलवरील कामापासून ते “आवडत्या” कामा पर्यंत, या फ्लिपकार्ट विक्रेतीने थोड्याशा प्रेमाने आणि धारणेने ते केले

Read this article in हिन्दी | English | বাংলা | தமிழ் | ಕನ್ನಡ | ગુજરાતી

आम्ही ओळख करून देणार आहोत, यश दवे, गुजरात मधील फ्लिपकार्ट विक्रेत्याचे, ज्याने विश्वासाने उडी घेतली आणि त्याचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगल्या पगाराची नोकरी सोडली . तो कशाने प्रेरित झाला? त्याच्या प्रेमळ पत्नीचे समर्थन आणि त्याचा स्वतःवरील विश्वास. त्याची ह्रदयस्पर्शी कथा वाचा.

Flipkart seller

जसे जिष्णू मुरलीला सांगितले तसे

यश दवे, नदीद, गुजरात मधील फ्लिपकार्ट विक्रेता

मी एप्रिल 2016 मध्ये फ्लिपकार्ट विक्रेता बनलो आणि मागील 3 वर्षासाठी माझी उत्पादने ऑनलाइन विकत आहे. मी उद्योजक बनणे ठरवण्यापूर्वी माझी कॉर्पोरेट नोकरी होती, मी एअरक्राफ्ट इंजिनिअरिंगमधला पदवी धारक आणि मी माझे एमबीए त्यानंतर लगेचच पूर्ण केले होते.

मी जस्टडायल मध्ये व्यवस्थापक प्रोफाईलवर काम करण्यास सुरूवात केली होती. सुरूवातीला नोकरी ही मला जे काही हवे होते ते सर्व होती, मात्र हळूहळू ती, एकसुरी बनली. मला काम व वैयक्तिक आयुष्य यादरम्यान संतुलन राखता येत नव्हते.

कामाच्या ठिकाणी वाढत असलेल्या तणावामुळे, मी अधिक काळ घरापासून दूर घालवत होतो आणि मी माझ्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नव्हतो आणि अतिशय असमाधानी होतो. त्याचवेळी मला एक फ्लिपकार्ट विक्रेता बनण्याबद्दलची संधी मिळाली.

माझ्या कुटुंबात माझे आईवडील आणि माझी पत्नी आहेत. माझ्या कुटुंबातील सदस्य हे एकतर कॉर्पोरेट नोकरी मध्ये आहेत किंवा उच्च पगार देणाऱ्या सरकारी नोकरी मध्ये आहेत. म्हणून मी जेव्हा त्याच्यासोबत माझी व्यवसाय सुरू करण्याची इच्छा सांगितली, तेव्हा एका चांगल्या पगाराची नोकरी सोडून देण्याच्या कल्पनेचे कोणीही स्वागत केले नाही.

व्यवसाय चालवण्यामधील अनिश्चितता आणि जोखमी यांचा विचार करता, माझ्या कुटुंबाने मला चांगल्या पगाराची नोकरी सोडून देण्यापासून रोखले. मात्र माझा माझ्य़ावर पूर्ण विश्वास होता की माझे यश हे अन्यत्र आहे आणि त्यावर विश्वास ठेवण्यापासून मी कधीही थांबलो नव्हतो. मला फक्त माझ्या पत्नीकडून समर्थन होते. तिने मला प्रेरीत केले आणि माझी स्वप्ने कधीही सोडून न देण्यास सांगितले. तिने मला व्यवसायातील कामे जसे की पॅकिंग, याला देखील मदत केली.

थोड्याफार प्रमाणात संशोधन केल्यानंतर ,माझा असा समज झाला की ऑफलाईन व्यवसाय करण्यापेक्षा ऑनलाईन व्यवसाय करणे अधिक सोईस्कर आहे कारण माझे ग्राहक हे एकाच ठिकाणाहून येतील. आणि मला माझी उत्पादने संपूर्ण देशाला विकायची होती.

मी पहिल्यांदा मोबाईल अॅक्सेसरीज – हेडसेट, विकण्यास सुरूवात केली, कारण त्या दिवसामध्ये स्मार्टफोनची मागणी अतिशय जास्त होती. मी सुरूवात शून्यापासून केली होती आणि मोबाईल अॅक्सेसरीजची यादी करण्यास कमी गुंतवणूक लागत होती, आज मी फ्लिपकार्टवर 17 पेक्षा जास्त श्रेणीमध्ये विक्री करतो – मोबाईल अॅक्सेसरीज, कॉम्प्युटर अॅक्सेसरीज,बाथ इसेन्शिअल्स, हॅण्डबॅग, महिलांची वस्त्रे, होम फर्निशिंग अन्य श्रेणी मध्ये आहेत.

मी जशी जशी विक्री करत होतो, देशभरातील भारतीयांद्वारे उत्पादने खरेदी केली जात असल्याने माझ्यामध्ये आत्मविश्वास अधिक वाढला.

आतापर्यंतचा प्रवास हा अतिशय चांगला होता. मी बरेच काही शिकु शकलो आणि अद्याप मी शिकत आहे. जसा मी सुरूवातीला उल्लेख केला होता, मी व्यावसायिक कुटुंबातून नाही, त्यामुळे व्यवसाय सेट करणे हा एक मोठा टास्क होता- उत्पादने खरेदी करणे, योग्य विक्रेता शोधणे, पोर्टलला समजावून घेणे, उत्पादन कसे विकावे, आणि जीएसटी भरणे- या सर्वानी माझ्या एक उद्योजक म्हणून केलेल्या प्रवासामध्ये आव्हाने भरली होती.

मात्र जाणाऱ्या प्रत्येक दिवसाला, गोष्टी अधिक सोप्या होत होत्या. माझी उत्पादने अन्य शॉपिंग साईटवर देखील सूचीबद्ध केलेली आहेत. मात्र मला फ्लिपकार्ट कडून मिळालेले समर्थन अविश्वसनीय होते. त्याच्या समर्थनामुळे सर्व काही अतिशय सोपे बनले होते.

दि बिग बिलीयन डेज सेल हा नेहमी माझ्यासाठी विक्री आणि फायदा या दोन्ही दृष्टीने नेहमी चांगला असतो. मागील वर्षी मला नेहमी मिळतात त्यापेक्षा चारपट अधिक आर्डर मिळाल्या होत्या. मी मला मदत करण्यासाठी तीन लोकांना कामावर ठेवले आहे, मात्र सेल च्या दिवसामध्ये मला अधिकाधिक लोकांना पॅकिंग आणि ऑर्डरची वेळेवर प्रक्रिया करण्यासाठी कामावर ठेवावे लागते. यावर्षी, मला अधिक चांगल्या अनुभवाची अपेक्षा आहे!

हे देखील वाचा:#सेलफमेड: रॉकेट सिंगद्वारे प्रेरित! बालवाडी शिक्षिका ते ऑनलाइन उद्योजक!

Enjoy shopping on Flipkart