#सेलफमेड: गृहिणी ते कर्तुत्ववान उद्योजिका — या फ्लिपकार्ट विक्रेतीने तिचे स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रतिकूलतेवर मात केली

Read this article in हिन्दी | English | বাংলা | தமிழ் | ಕನ್ನಡ | ગુજરાતી

अनेकांसाठी, ऑनलाइन विक्री करणे म्हणजे संपूर्ण भारतीय लोकांपर्यंत पोहोचणे. तर अन्य थोड्या जणांसाठी, तो पिढीमधील एकतर्फी विचार मोडण्याचा आणि स्वतंत्रतेच्या दिशेने एक दृढ पाऊल उचलण्याचा मार्ग आहे. आमच्या #सेलफमेड श्रृंखलेतील दुसऱ्या कथेमध्ये, फ्लिपकार्ट विक्रेती मोनिका सैनी, दिल्लीतील एमपी मेगा स्टोअरची मालकीण, हिने तिच्या कुटुंबाच्या महिलांनी फक्त घराचीच काळजी घ्यावी या जुन्या रूढीला मोडीत काढली, फ्लिपकार्टवरील ती एक मु्ख्य ऑनलाईऩ उद्योजक बनली.

Flipkart seller

मोनिका सैनी, दिल्लीतील फ्लिपकार्ट विक्रेती

जसे जिष्णू मुरलीला सांगितले तसे


व्यवसाय सुरू करणे हे माझे पहिले स्वतंत्र पाऊल होते. ती माझ्यासाठी मोठी उडी होती. माझे पतीचे मित्र मोबाईल फोन आणि अॅक्सेसरीज विक्रीचा ऑनलाइन व्यवसाय करत होते. मला देखील माझी स्वतः ची उपजिविका कमावायची होती, परंतु मला तसे करण्यापासून परावृत्त केले होते. माझे कुटुंब कामासाठी मी घरातून बाहेर पडण्याच्या विरूद्ध होते.

मी मध्य प्रदेशातील माधवगड नावाच्या लहान खेडातून आलेली आहे. भारतातील खेड्यामध्ये अद्याप अशी भावना आहे की मुलींना कमाई करण्यासाठी बाहेर पाठवले जाऊ नये. माझे पती हे दिल्लीतील असून मी तिथे गेल्यानंतर देखील, परिस्थिती मला नोकरी मिळवून देण्याच्या आड आली. माझ्या सासूबाईंना मी कामासाठी घराच्या बाहेर पडावे लागणे बरोबर वाटत नव्हते, मात्र त्यांची मी घरातून काम करण्याच्या कल्पनेला मान्यता होती. त्यामुळेच मी माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले.

माझ्या जवळपासच्या भागामध्ये अनेक शाळा होत्या. आणि येथील शाळेत शिकविण्यासाठी फळा वापरतात. म्हणून मी शाळांना फळे आणि व्हाईटबोर्ड विकण्याच्या कल्पनेने व्यवसाय सुरू केला. आणि माझ्या ग्राहकांना लक्षात ठेवून मी खडू आणि मार्कर देखील फळ्यांसोबत विकण्यास सुरूवात केली. मी वर्ष 2018 मध्ये फ्लिपकार्ट वर विक्री करण्यास सुरूवात केली. ही माझ्या पतीची सूचना होती — की मी जे काही करत आहे त्यावर त्यांनादेखील विश्वास बसू लागला आणि फ्लिपकार्ट हा पुढे प्रगतीचा मार्ग आहे असे वाटू लागले.

मी जेव्हा आरंभ केला तेव्हा मला काही आव्हानांचा सामना करावा लागला. मी साहित्य कोठून खरेदी करावे हे ठरवू शकत नव्हते.
सुरूवातीला, मी माझी उत्पादने वेगवेगळ्या विक्रेत्याकडून आणत असे. मात्र आता, मी ती एकाच विक्रेत्याकडून मिळवते. ऑनलाइन विक्री करण्याने मला व्यवसाय कसा चालवावा याबद्दल बरेच काही शिकवले.

माझ्या आत्ता पर्यंतच्या प्रवासात मी बरेच काही शिकले, मी तंत्रज्ञानाबरोबर कंफरटेबल आहे- जेव्हा मी सुरूवात केली होती, मी संगणकावर काहीच करू शकत नव्हते आणि माझे पती मला मदत करायचे. मात्र आता, मी माझा संपूर्ण व्यवसाय एकटीच चालवते. आणि माझ्या व्यवसायाच्या वाढीसाठी मला वेगाने शिकावे लागत होते. मी जेव्हा ऑनलाईन विक्री करण्यास सुरूवात केली तेव्हा मला दररोज 1 किंवा 2 ऑर्डर प्राप्त होत होत्या, मात्र आता मला दिवसाला जवळजवळ 22 ऑर्डर पूर्ण कराव्यात लागतात! माझ्या प्रगतीने माझ्या सासूबाईंना देखील प्रेरीत केले. त्या आता माझ्या बाळाची काळजी घेतात जेव्हा मी माझ्या व्यवसायाच्या वृध्दीकडे लक्ष देत असते.


हे देखील वाचा: #सेलफमेड – फ्लिपकार्टने या विक्रेतीला तिची स्वप्नपूर्ती करण्यास मदत केली. आता, ती तिच्या सारख्या अऩ्य महिलांना मदत करत आहे

Enjoy shopping on Flipkart