साध्या आनंदाच्या प्रसंगांनी फ्लिपकार्ट विशमास्टर अभिजित आर के ला त्याचे #OneInABillion चे क्षण मिळवून दिले.

Read this article in हिन्दी | English | বাংলা | தமிழ் | ಕನ್ನಡ | ગુજરાતી | తెలుగు

केरळ प्रांतात कोलम भागातील इडलिक शहरात, फ्लिपकार्ट विशमास्टर अभिजित आर. के. त्याचे स्वत:चे आनंदी आणि अर्थपूर्ण विश्व निर्माण करतो आहे. आपल्या कुटुंबीयांसमवेत आनंदात वेळ घालवणे आणि परीपल्लीतील हबमधील मित्रांबरोबर मैत्रीचे घट्ट धागे जोडताना अभिजित कामाला प्रथम प्राधान्य देतो आणि आपल्या जीवलगांसाठी क्वालिटी टाईम देऊन दोन्ही बाजूत समतोल साधतो. या विशमास्टरची #OneInABillion च्या वर्तमानात राहण्याची गोष्ट वाचा.

One In A Billion

कोलम ही मोठे होण्यासाठी रमणीय जागा आहे – आमचे घर परीपल्लीत आहे जे कादापूरम (सी-साईड) पासून फार दूर नाही. या ठिकाणी राहण्यात मोठा फायदा असा आहे की आ,म्हाला येथे नेहमीच ताजे सी-फूड मिळते. रोज सकाळी येथे राहणारे कोळी लोक आम्हाला त्यांनी पकडलेली मासळी आणून देतात. याशिवाय मी नेहमी बीचवर जाऊन आणखी काही आणतो. ताज्या सी-फूड डिशेसची मजा काही वेगळीच असते!

मी व माझे आई-वडील, माझा जुळा भाऊ व आम्हा दोघांच्या जीवनसाथी येथे राहतो. माझे आई-वडील दोघेही एलआयसी चे एजंट्स आहेत आणि माझी पत्नी अकौंटंट आहे. ती पब्लिक सर्व्हिस कमिशन (पीएससी) परीक्षेसाठीसाठी अभ्यास करीत आहे आणि मला तिच्या यशाबद्दल खुप आशा आहेत.

मी दहावीची परीक्षा पास झाल्यानंतर मेकॅनिकलमध्ये डिप्लोमाचा कोर्स केला, मी कोलममधील एका कंपनीत सुपरवायझरचे काम केले आणि नंतर चांगल्या जॉबच्या संधीमुळे दोन वर्षांसाठी कुवेतला गेलो. दुर्दैवाने पॅण्डेनिकमध्ये माझा जॉब गेला व मला परत यावे लागले.

लॉकडाऊनच्या काळात मी फ्लिपकार्टच्या विशमास्टरच्या जॉबचे ऑनलाईन पोस्टर सोशल मेडियावर पाहिले. त्यावेळी माझा भाऊ सुद्धा जॉब शोधत होता. म्हणून आम्ही दोघांनी अर्ज केला व तो जॉब मिळविला.

One In A Billion

मी फ्लिपकार्ट विशमास्टर म्हणून आता २.५ वर्षे काम करतो आहे.

मी कोलामच्या मुख्य हबमध्ये काम करीत असे आणि नंतर पारीपल्ली हबला गेलो. तेथील वातावरण अतिशय पॉझीटीव्ह आणि फ्रेंडली होते आणि मी तेथे इतर विशमास्टर्स आणि टीम मेम्बर्स बरोबर घट्ट मैत्री केली.

प्रत्येक आठवड्यात, जेव्हा आमचे काम संपते तेव्हा आम्ही एक ससोयीचा दिवस पाहून आम्ही फुटबॉल किंवा क्रिकेटघेलात असेहा आम्हाला एकत्र बांधणारा मजेचा दुवा होता. आम्ही दुपारी जेवायलासुद्धा एकत्र जात होतो.

आम्ही टीम म्हणून चांगले काम करीत होतो, विशेषत: बिग बिलिअन डेज (बीबीडी) विक्रीच्या वेळी. तेव्हा आम्ही आमच्या टीम मेम्बर्सना डिलिव्हरी एरियाप्रमाणे ग्रुप्समध्ये विभागत होतो. प्रत्येक ग्रुप जास्तीत जास्त डिलिव्हरीज पूर्ण करण्याच्या उद्देशाने प्रयत्न करीत असे. मात्र त्या प्रयत्नात स्वत:ची व पॅकेजेसची सुरक्षा घेण्याचे उद्दिष्ट मनात ठेवलेले असे. माझ्या टीमने ओळीने गेली दोन वर्षे पहिला क्रमांक पटकाविला आहे. या कामगिरीमुळे प्रत्येकाचे मोराल खूप वाढते. याशिवाय, वेळेवर डिलिव्हरीज देणे व त्या बिझी दिवसात काम करण्यात मजा येत असे.

कामातील मजा वाढविण्यासाठी आणि कामाची जागा सर्वसमावेशक आणि माहितीपूर्ण ठेवण्यासाठी आम्ही आमच्या नाविन्यपूर्ण कल्पना सुद्धा आपापसात शेअर करतो. उदा. गेल्या वर्षीच्या बीबीडी च्या थोडे आधी, सर्व विशमास्टर्सच्या मनातील सेफ्टी मेजर्सना अधिक मजबुती मिळावी म्हणून आम्ही हेल्मेट सेफ्टीवर व्हिडिओ बनविला. त्यात खूप मोठे यश मिळाले.

माझ्या सुट्टीच्या काळात मी माझा क्वालिटी टाईम माझ्या कुटुंबियांसाठी देतो. मी नेहमी आई-वडिल व पत्नीच्याबरोबर मंदिरे पाहण्यास जातो. जेव्हा शक्य होईल तेव्हा पत्नीच्या आई-वडिलांच्या भेटीला जातो.

मी जीवनातील साधा आनंद मिळविण्यास महत्त्व देतो – त्यात माझ्या माझ्या निकटवर्तियांच्या दैनंदिन जीवनातील आठवणी किंवा अगदी छान जेवणाचे समाधान असू शकते.


याशिवाय वाचा: जयपूरमधील एक उद्योजक फ्लिपकार्ट समर्थमुळे आपला कौटुंबिक उद्योग पुन्हा नव्याने सुरु करतो

Enjoy shopping on Flipkart