
माझे नाव धवल पटेलआहे. मी नवरंग हॅन्डीक्राफ्ट चालवतो, आणि मी फ्लिपकार्टचा #सेल्फमेड समर्थ विक्रेता आहे. मी गुजरात येथील राजकोट आणि वीरपूर येथे स्थायिक आहे. आम्ही सुकामेवा बॉक्सेस, लेटर बॉक्सेस, लाकडी स्टूल, माऊथ फ्रेशनर्स साठी बॉक्सेस, लाकडू स्टॅण्ड आणि अऩ्य भेटीच्या वस्तू यासारख्या हस्तकलेच्या वस्तू विकतो. या वस्तूंशिवाय, आम्ही टॉवेल देखील विकतो.
मी फ्लिपकार्ट समर्थ विक्रेता बनण्यापूर्वी, मी ही उत्पादने स्थानिक बाजारात विकत होतो. नंतर मी यूट्यूब वर अऩेक फ्लिपकार्ट व्हिडिओ पाहण्यास सुरूवात केली आणि मी ऑनलाइन विक्री करण्याचे फायदे शिकलो. म्हणून 2018 मध्ये, मी फ्लिपकार्ट सोबत भागिदारी केली आणि आतापर्यंतचा प्रवास हा अभूतपूर्व असा आहे.
सुरुवातीला, आम्हाला दररोज सुमारे 20-25 ऑर्डर मिळत होत्या, मात्र आता, ती संख्या प्रत्येक दिवसाला 80 ऑर्डरपर्यंत गेली आहे. आम्हाला अशा शहरातून ऑर्डर मिळत आहेत ज्यांची नावे आम्ही कधीही ऐकली देखील नव्हती! आमची उत्पादने देशभरातील नवीन ग्राहकांपर्यंत पोहचत आहेत ー जे माझ्या मते माझ्या सारख्या विक्रेत्यांना ई-कॉमर्स देऊ शकत असलेली सर्वोत्तम गोष्ट आहे. मी आता सिल्व्हर विक्रेता आहे आणि मी खरोखर अतिशय आनंदी आहे.
आता ई-कॉमर्सच्यामदतीने, माझ्या कंपनीने आमच्या सभोवतालच्या कारागिरांच्या समुदायांसाठी काही चांगले काम देखील केले आहे. आमच्या भागातील काही खेड्यामधील महिला कारागीर सुंदर हस्तकलेच्या वस्तू बनवतात. माझ्या हाताखाली सुमारे 35-40 कामगार नोकरीला आहेत. त्यांच्यापैकी 15 हे माझ्या वर्कशॉपमध्ये काम करत आहेत आणि अऩ्य त्यांच्या घरून काम करतात.
आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे, डिझाइनचे पॅटर्न समजावून दिले आहेत, आणि गुणवत्ता लक्षात घेऊन प्रत्येक उत्पादन योग्य प्रकारे तयार करण्यासाठी आमच्याकडे असेब्लिंग युनिट आहे. मला त्यांना आर्थिक संधी उपलब्ध करून द्यावयाच्या आहेत आणि त्यांनी हाताने तयार केलेली उत्पादने विकून समुदायाची प्रगती करावयाची आहे. त्यांच्याकडे कलेतील उत्तम कौशल्ये आहेत, त्यामुळे मी त्यांना सबल करण्यासाठी उपक्रम हाती घेतला आहे. मी माझे नशीब फ्लिपकार्टवर एक समर्थ विक्रेता म्हणून आजमावून पाहिले आणि ते यशस्वी झाले.
फ्लिपकार्ट हा स्विकारण्यास अतिशय सोपा प्लॅटफॉर्म आहे. फ्लिपकार्ट येथील विक्रेता संघ तेथील ऑन-बोर्डिंग अतिशय सोपे करतो आणि आम्हाला त्यांच्यासह विक्री करणे पुढे सुरू ठेवायचे आहे. प्लॅटफॉर्मची रेटिंग सिस्टम आम्हाला व्यवसाय चालवण्यामधील आमचे स्टँडर्डनुसार सुधारण्यास देखील मदत करते. माझे रेटिंग 5 वर 4.5 आहे. याचा अर्थ असा आहे की आमच्या ग्राहकांना आमची उत्पादने खरोखर आवडली आहेत! या उत्पादनाकरता प्रचंड मागणी आहे आणि हा व्यवसाय येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आमच्याकडे गुणवत्तापूर्ण उत्पादने आहेत आणि फ्लिपकार्टच्या मदतीने भारतभरातील प्रत्येकापर्यंत आम्ही अवश्य पोहचू!
मी आमच्या ग्राहकांचे आमची उत्पादने खरेदी केल्याबद्दल आणि भारतीय हस्तकलेला प्रोत्साहन दिल्याबद्दल आभारी आहे.
जिष्णू मुरली यांना सांगितले तसे, पल्लवी सुधारक यांनी पुरविलेल्या अतिरीक्त माहितीसह