
माझे नाव मीत वीज आहे. मी चेरी एंटरप्रायझेसचा मालक आहे आणि फ्लिपकार्ट वर मोबाईल श्रेणी मध्ये विक्री करतो. बीग बिलीयन डे सेल चा भाग असण्याचा तो माझा पहिला अनुभव होता आणि तो आमच्यासाठी खरोखर चांगला होता. आमच्या सामान्य ऑर्डर्सच्या तुलनेत, सेलच्या काळातील आमच्या उत्पादनांची विक्री पाच पट अधिक होती! आमच्या ग्राहकांकडून मिळालेल्या प्रतिसादाने आमच्या येथील प्रत्येकजण भारावलेला होता. आतापर्यंत आम्ही फक्त दि बिग बिलीयन डे बद्दलच्या कथाच ऐकत होतो 一 विक्रेत्यांच्या कथा ज्यांनी तो मोठा केला, विक्रीच्या उदात्ततेबद्दलच्या कथा, आणि या वेळेच्या दरम्यान ग्राहकांनी केलेल्या खरेदीच्या प्रमाणाबद्दलच्या कथा ऐकत होतो! ते आमच्या कुठल्याही अपेक्षांच्या पलीकडचे होते.
असा एक क्षण होता जेव्हा आम्हाला समस्येला सामोरे जावे लागले आणि आमचे खाते होल्डवर ठेवण्यात आले. पण लवकरच आम्हाला समजले की, काळजी करण्याची काही गरज नव्हती. आम्ही फ्लिपकार्ट विक्रेता मदत पथकाची भेट घेतल्यावर लवकरच, त्यांनी समस्येवर काम केले आणि फक्त दोन तासांच्या आत ती समस्या सोडविली. त्यासाठी मी फ्लिपकार्टचे आभार मानतो!
दि बिग बिलीयन डे चा हा आमचा पहिला अनुभव होता म्हणून आम्ही तयारीत नव्हतो असे नाही. ग्राहकांच्या कशा प्रकारच्या मागण्या आम्हाला अपेक्षित असू शकतात आणि आम्ही त्या कशा पूर्ण करण्याची अपेक्षा असू शकते याविषयीची आम्हाला आवश्यक असलेली सगळी माहिती फ्लिपकार्टने आम्हाला सेल सुरू होण्यापूर्वी फ्लिपकार्टने खूप आधीच दिलेली होती. त्यामुळे जे घडेल त्यासाठी आम्ही सज्ज आहोत हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही आमचा साठा तयार ठेवला आणि आमच्या कामांची व्यवस्था केली. आमची तयारी झालेली असल्यामुळे संपूर्ण अनुभव सकारात्मक होता! माझे कर्मचारी आणि फ्लिपकार्टच्या मदतीमुळे, या काळात आम्ही नवीन शिखरे पादक्रांत केली, ज्यामुळे आम्ही फ्लिपकार्ट विक्रेत्यांपैकी प्रथम विक्री करणाऱ्यापहिल्या 3 प्रथम विक्रेत्यांमध्ये जाऊन बसलो! आमच्या उत्पादनांची जाहिरात करताना फ्लिपकार्टने आम्हाला मोठ्या प्रमाणात सहाय्य केले. त्यांच्या सहाय्याने आमच्या ब्रॅण्डला दृश्यमानता मिळाली आणि आम्ही फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळवू शकलो.
फ्लिपकार्ट प्रत्येक विक्रेत्याचा विचार करते आणि ते सदैव मदतीला तयार असतात! या बीबीडीचा भाग असल्याचा अतिशय आनंद झाला आणि आगामी काळातील अशा अनेक बीबीडीविषयी मी आशावादी आहे.
जिष्णू मुरली यांना सांगितले तसे, पल्लवी सुधारक यांनी पुरविलेल्या अतिरीक्त माहितीसह