राजकोट खुणावते आहे: फ्लिपकार्टची विक्रेता रश्मी वागेराह यशासाठी तिचा कुठलेही कष्ट करण्याचा दृष्टीकोन प्रकट करते

Read this article in English | ಕನ್ನಡ | বাংলা

द बिग बिलियन डेज 2021 च्या अगदी आधी, राजकोटस्थित रश्मी वागेराह कुठलेही कष्ट करण्याच्या मोडमध्ये आहे. तिच्यासारख्या फ्लिपकार्ट विक्रेत्यांना सक्षम करण्यासाठी तयार केलेल्या फ्लिपकार्टच्या प्रगतीकारक साधनांमुळे निर्माण झालेल्या यशाच्या तिच्या रेसिपीवर एक नजर टाकुया.

Gujarat

णासुदीच्या उत्साहाचे प्रतीक म्हणून नुकतेच तळलेल्या गरम आणि ताज्या फरसाणसारखे काहीही नाही. मग ती रतलामची शेव असो, भावनगरची गाठिया, तामिळनाडूचे मुरुक्कू किंवा गुजरातमधील चकली असो, आनंद आणि एकत्र येण्याचे प्रतीक असलेले हे मसालेदार, खारट, कुरकुरीत स्नॅक्स सणासुदीच्या काळात देशभरातील घरगुती लोकांना आवडतात. हा असाही काळ आहे ज्यावेळेस फ्लिपकार्ट विक्रेत्यांची प्रचंड लगबग सुरू असते, बिग बिलियन डेज ज्यासाठी ओळखले जाते ती वाढीव मागणी पूर्ण करण्याची पूर्वतयारी करण्यात ते व्यग्र असतात.

स्नॅकिंग आणि उत्सवाची तयारी एकत्र करता तेव्हा भारतातील एका राज्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही ते म्हणजे गुजरात. 35,000 पेक्षा अधिक फ्लिपकार्ट विक्रेत्यांचे घर असलेल्या आणि पश्चिम भारताचे आभूषण ठरलेल्या या राज्यात उत्सवाच्या काळात प्रचंड उलथापालथ पाहायला मिळते. गुजरातमधील सौराष्ट्र प्रदेशाच्या मध्यभागी वसलेल्या एकट्या राजकोटमधून, फ्लिपकार्टच्या गृहश्रेणीमध्ये जवळजवळ 42% फ्लिपकार्ट विक्रेते आहेत. शहराच्या MSME उद्योगाचे नेतृत्व करणाऱ्या उद्योजकांच्या उद्यमशील स्वभावामुळे काळाच्या ओघात या विभागाने अमाप वाढ पाहिलेली आहे.

अशीच एक फ्लिपकार्ट विक्रेता तिच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी ई-कॉमर्सचा जास्तीत जास्त वापर करते ती म्हणजे रश्मी मनोजभाई वगेराह. आनंदाने आस्वाद घेतले जाणारे उत्सवकाळातील स्नॅक्स तयार करण्यासाठी भारतीय स्वयंपाकघरांना मदत करणाऱ्या उपकरणांच्या मदतीने ही राजकोटची रहिवासी तिच्याकडे लक्ष वेधून घेते. तिची कंपनी, सारा बिझनेस ग्रुप ज्यासाठी ओळखली जाते ते सर्वांत लोकप्रिय उत्पादनांपैकी एक म्हणजे किचन प्रेस, ज्याला शेवेचे मशीन असेही म्हणतात. द बिग बिलियन डेज 2021 ची तयारी करत असताना, रश्मीदेखील तिची मायभूमी गुजरातसह संपूर्ण भारतभरातील संभाव्य खरेदीदारांची मागणी पूर्ण करण्यासाठी तिच्याकडून सर्वोत्तम ते देण्यासाठी सज्ज झाली आहे.

प्रगती जी स्वतःविषयी बोलते

Gujarat

2018 मध्येच रश्मीने तिचा ऑनलाइन व्यवसाय सुरू केला. जेमतेम तीन वर्षांत, तिच्या कंपनीने स्वयंपाकाची भांडी, घरगुती उपकरणे, सजावट, फिटिंग्ज आणि बऱ्याच वस्तूंची निर्मिती आणि संपादन करून स्वतःचे नाव कमावले आहे. संधी वाया जाऊ न देणारी, रश्मी एक फ्लिपकार्ट विक्रेता आहे जी B2B आणि B2C दोन्ही क्षेत्रात कार्यरत आहे.

सुरुवातीला आम्ही फक्त ऑनलाइन घाऊक विक्रेत्यांशी व्यवहार करत होतो आणि आमची उत्पादने त्यांना विकत होतो. मात्र, आम्ही लवकरच आमचे स्वतःचे फ्लिपकार्ट स्टोअर सुरू केले आणि थेट ग्राहकांपर्यंत पोहोचू लागलो. आम्ही दोन चॅनेलच्या माध्यमातून अविरतपणे काम करत आहोत आणि दररोज मोठ्या प्रमाणावर ऑर्डर्सवर प्रक्रिया करत आहोत,”ती म्हणते.

रश्मीच्या प्रामाणिक प्रयत्नांना तितकेच आकर्षक परिणाम मिळाले. “फ्लिपकार्टसोबत व्यवसाय चांगला होतो,” ती विशेष नम्रपणाने सांगते. “गेल्या तीन वर्षांत विक्रीत सुमारे 1000% वाढ झाली आहे.”

ऑनलाईन व्यापाराची साधने

ग्राहकांच्या प्रतिक्रियांमधून तिला प्राप्त झालेले अभिप्राय आणि फ्लिपकार्टचे अकाउंट मॅनेजर्स जे नियमित कामकाजात मदत करतात आणि व्यवसाय समुपदेशन देतात त्यांच्याकडून मिळालेली माहिती एकत्र करून, रश्मी वेगाने कृती करते. “आम्ही उत्पादनांच्या रेटिंगवर लक्ष ठेवतो आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा आमची उत्पादने किंवा पॅकेजिंग सुधारतो. जेव्हा आमच्या लक्षात आले की आमच्या बेस्ट सेलिंग शेव मेकरमधील काही अटॅचमेंट्स ऑनलाइन ग्राहकांसाठी उपयुक्त नाहीत, तेव्हा आम्ही ते काढून टाकले आणि मागणी असलेले इतर अटॅचमेंट्स देऊ केले.”

तिच्या कुठल्याही सीमा नाहीत या दृष्टिकोनाचे फळ मिळाले आहे. आज, रश्मीच्या उद्योगात 15 लोकांना रोजगार मिळालेला आहे. कोविड -19 साथीच्या आजारामुळे ऑनलाईन शॉपिंगमध्ये मागणी वाढली आणि घरगुती स्वयंपाकामध्ये नव्याने रुची निर्माण झाल्याने तिला वाढीचा लाभ घेण्यासाठी योग्य स्थिती निर्माण केली. “आम्हाला दररोज मिळालेल्या ऑर्डरची संख्या कोविड-19 नंतर झपाट्याने वाढली आहे. साथीच्या आजारापूर्वी, आमच्या ऑर्डर्स दिवसाला सरासरी 50 होत्या आणि त्यानंतर दररोज 800 ऑर्डर्स झाल्या, ”ती म्हणते.

गेल्या वर्षभरापासून रश्मीने बाजारपेठ म्हणून फ्लिपकार्टवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. “मला येथे अधिक ग्राहक मिळतात आणि मला प्रश्न पडतो तेव्हा मी माझ्या समस्येचे निराकरण करण्यासाठी थेट कोणाशी संपर्क साधू शकतो,” ती स्पष्ट करते.

द फ्लिपकार्ट बूस्ट

रश्मीसारख्या फ्लिपकार्ट विक्रेत्यांना पाठिंबा देण्यासाठी, नेक्स्ट-डे पेमेंट कार्यक्रमासारखी प्रगतीकारक साधने महत्त्वाची भूमिका बजावतात.

ग्रोथ कॅपिटल सेलर फायनान्सिंग प्रोग्राम चा भाग म्हणून, फ्लिपकार्ट विक्रेत्यांना व्यावसायिक अंदाजांच्या आधारे वित्तपुरवठाधारकांकडून सानुकूल प्रस्ताव मिळविण्यास मदत करते. बिग बिलियन डेज सारख्या कार्यक्रमांच्या दरम्यान गगनाला भिडणारी मागणी पूर्ण करण्यासाठी निधीची ही उपलब्धता सूक्ष्म उद्योगांना त्यांचा पुरवठा वाढवण्यासाठी मदत करते. फ्लिपकार्टच्या गुजरातमधील वेअरहाऊस सुविधेच्या विस्ताराबरोबरच चार नवीन पुरवठा साखळी सुविधांमुळे व्यवसायांना आणखी मदत होते.

रश्मीसुद्धा पुढे जाण्यासाठी आणि मागील सर्व विक्रम मोडण्यासाठी सज्ज आहे. “द बिग बिलियन डेज” च्या आधीच्या काळात मी स्टॉक उपलब्ध असेल हे सुनिश्चित करण्यासाठी उत्पादने उपलब्ध करून घ्यायलाही सुरुवात केली आहे आणि सणासुदीच्या काळात यावर्षी सुमारे 4,000 ऑर्डर्स मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.


अधिक प्रेरणादायक #Sellfmade कथा इथेवाचा.

 

Enjoy shopping on Flipkart