#सेल्फमेड -या फ्लिपकार्ट विक्रेतीने तिचा छंद यशस्वी ऑनलाइन व्यवसायामध्ये रूपांतरीत केला!

Read this article in বাংলা | English | हिन्दी | தமிழ் | ಕನ್ನಡ | ગુજરાતી

मायक्रोबायोलॉजी पदवीधर सृष्टीसृष्टी मिश्रा लग्नांनंतर मुंबईला आली, तेव्हा युट्यूब व्हिडीओ पाहताना तिला ज्वेलरी तयार करण्यामध्ये स्वारस्य निर्माण झाले. लवकरच तिने ते छंद म्हणून शिकून घेतले आणि त्यातून कमाई करण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी तिने #सेल्फमेड - फ्लिपकार्ट विक्रेती म्हणून साइन अप करून घेतले. तिची प्रेरणादायी कथा वाचा

successful online business

माझे नाव सृष्टी मिश्राआहे. मी डेहराडूनची आहे आणि मी एक यशस्वी ऑनलाइन व्यवसाय चालवत आहे. मी मायक्रोबायोलॉजीची पदव्युत्तर पदवीधारक असून, माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी मी एका प्रयोगशाळेत काम करत होते. लग्नानंतर मी मुंबईला आले. एके दिवशी, मी जेव्हा काही यूट्युब व्हिडीओंचा आनंद घेत होते, मला वाटले की मी देखील ज्वेलरी बनवायला शिकले तर काय होईल. मला हवे असलेले व्हिडिओ सापडले आणि मी एक छंद म्हणून आपले आपणच ज्वेलरी तयार करायला शिकू लागले.

मी कानातली आणि बांगड्या बनवल्या, डिझाईन तयार करताना मी बऱ्याच कच्च्या मालाचा वापर केला. मी ते फारच लवकर शिकले आणि लवकरच मी त्यामध्ये पारंगत झाले. त्यानंतर एके दिवशी, एका मॉल मध्ये काही ज्वेलरी विक्रीच्या ठिकाणी ब्राऊझिंग करत असताना, मला माझ्या डिझाईन सारखी काही डिझाईन दिसली. आणि मला असे दिसून आले की अन्य ग्राहक तीच डिझाइन घेण्यास अतिशय उत्सुक होते. तेव्हाच मी तयार करत असलेली ज्वेलरी ऑनलाइन विकण्याचे ठरवले. मी जेबीएनफॅशन ज्वेलरी कंपनी सुरूवात केली आणि वर्ष 2017 मध्ये फ्लिपकार्टवर विक्री करण्यास सुरूवात केली.

मला माझ्या भागात माझी ज्वेलरी स्टोअरमध्ये किंवा दुकानामध्ये विकण्यात कधीही स्वारस्य नव्हते. मला आधीपासूनच माहीत होते की ऑनलाइन उद्योगामुळे व्यावसायिकाला मोठ्या प्रमाणात ग्राहक मिळतात. त्याशिवाय, जर तुम्ही ऑनलाइन विकत असाल तर, तुम्ही ऑफलाइन व्यवसाय चालवताना असलेल्या काळजीच्या तुलनेमध्ये कमी काळजीमध्ये असता. मी माझ्या सोयीने माझ्या घरातून चालवत होते. आज सर्व काही डिजीटल झाले आहे आणि प्रत्येकजण ऑनलाइन खरेदी करत आहे. तुम्ही एक यशस्वी ऑनलाइन व्यवसाय चालवत असताना, तुम्ही ग्राहकांच्या डेटाचा अभ्यास करू शकता आणि चालू असलेल्या ट्रेण्डचे पालन करू शकता

फ्लिपकार्टने मला माझ्या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात मदत केली. ते तुमच्या प्रगतीवर लक्ष ठेवून असतात आणि तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी मदत करण्यास तुमच्याकडे डेटासह येतात. माझ्या बाबतीत, मी ऑनलाइन सूचीबद्ध करत असलेल्या ज्वेलरीचे वैविध्य वाढविण्याची गरज होती आणि त्यांनी अन्य कोणत्या श्रेणीमध्ये मी सूचीबद्ध करू शकते ते ओळखण्यासाठी मला मदत केली.

जेव्हा मी व्यवसाय सुरू केला तेव्हा, मी 5,000 गुंतवले होते. आता मी प्रत्येक महिन्याला ₹10,000 कमावते. माझा मागील बिग बिलीयन डे च्या विक्रीचा अऩुभव अतिशय सुरेख होता. मी महिलांसाठीच्या अॅक्सेसेरीजमध्ये हॅण्डबॅग, पर्स, वॉलेट इ. सारख्या अधिक श्रेणी जोडण्याचा विचार करत आहे. माझ्या कुटुंबाचा मला अधिक सहाय्य मिळत आहे, त्यांना माझा अभिमान वाटतो कारण व्यवसाय चालवणारी मी कुटुंबातील पहिली आहे.

जसे जिष्णू मुरलीला सांगितले तसे

सृष्टी सारख्या अधिक कथा वाचायच्या आहेत ? क्लिक करा here.

Enjoy shopping on Flipkart