लखनौजवळच्या एका दूरच्या खेड्यामध्ये 35 वर्षांपूर्वी मेघदूत हर्बलची स्थापना झाली, तेव्हा जवळपास राहणाऱ्यांना काम मिळवून देणे हा त्याचा उद्देश होता. 2020 च्या सुरूवातीला, एका जागतिक साथीच्या रोगामुळे त्याच्या अस्तित्वाच्या उद्देशावरच गदा आणली तेव्हा एक पारंपरिक कौटुंबिक मालकीचा व्यवसाय आणि आता एक फ्लिपकार्ट समर्थ भागीदार असलेल्या या व्यवसायाने संकटाशी जुळवून घेतले आणि या अवघड काळावर मात करण्यासाठी ई-कॉमर्सला चालना दिली. उत्तर प्रदेश सरकारबरोबर केलेल्या एमओयुच्या छत्राखालील फ्लिपकार्ट समर्थ कार्यक्रमाच्या आधाराने, विपुल शुक्लाच्या कौटुंबिक व्यवसायाने त्यांच्यासारख्या उद्योगांसाठी मार्ग तयार केला आणि मुसंडी मारली आणि यश प्राप्त केले. त्यांची अतुलनीय कथा वाचा.
1985 मध्ये, विपुल शुक्लांच्या आजोबांनी त्यांची सर्व बचत आर्युवेदिक उत्पादने तयार करण्याचा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी वापरली उत्तर प्रदेशमधील, लखनौजवळच्या, त्याकाळच्या दुर्गम खेड्यामध्ये. त्यावेळी मेघदूत हर्बलचा पसारा छोटासा होता – त्यामध्ये एक ऑफिस आणि एक उत्पादन प्रकल्प, जो जवळपास राहणाऱ्या लोकांना रोजगार देण्याच्या उद्देशाने तयार केलेला होता. लवकरच त्याची नोंदणी युपी खादी आणि ग्रामोद्योग मंडळाकडे (युपीरेव्हिआयबी) करण्यात आली.
कंपनी आणि तिची अनेक वनौषधींची मिश्रणेही आता गावाचा आणि कुटुंबाचा तीन पिढ्यांपासून भाग बनलेला आहे, ज्याची जबाबदारी आजोबांकडून वडिलांकडे आणि आता दैनंदिन व्यवसाय चालवणाऱ्या विपुल आणि त्यांचे बंधू विकास, यांच्याकडे आली आहे.
ई-कॉमर्सविषय़ी ज्याला ते अनेक प्रकारचे दडपण म्हणतात ते त्यांना जाणवत असले तरी विपुलच होते ज्यांनी पारंपारिक कौटुंबिक व्यवसाय, ज्यामध्ये वनौषधी आणि इतर नैसर्गिक उत्पादने व आयुर्वेदिक औषधे बनवली जातात, तो काळाच्या ओघात ऑनलाईन नेला. मेघदूत हर्बल हा एक वर्षापेक्षा काही काळ आधीच फ्लिपकार्ट समर्थ भागीदार बनला.
फ्लिपकार्टने समर्थ जुलै 2019 मध्ये एक कार्यक्रम सादर केला, भारतातील कारागीर, विणकर, आणि हस्तकला उत्पादने तयार करणाऱ्यांना ई-कॉमर्समध्ये आणण्यासाठी, ऑनलाईन व्यवसाय स्थापित करण्याचा आणि चालविण्याचा खर्च कमी करणारे योजनाबद्ध लाभ देत त्यांचा प्रवेश सोपा करून. फ्लिपकार्ट समर्थने त्यांनंतर प्रसिद्ध एनजीओ, सरकारी संस्था आणि उपजिविका अभियानाने यांच्यासोबत जवळून काम करणे पुढे सुरू ठेवले आहे, ग्रामीण उद्योजक, महिलांनी चालवलेले उद्योग, भिन्न क्षमता असलेले उद्योजक, कारागीर आणि विणकर यांचा समावेश असलेल्या अशा समूहांना ओळखण्यासाठी आणि सोबत घेण्यासाठी.
Delighted to sign an MoU with @UPGovt @UP_KVIB on the occasion of #GandhiJayanti to support Khadi industry in UP. Sincere thanks to Hon'ble CM @myogiadityanath , Pr. Secy @navneetsehgal3 for the support to @Flipkart as we bring khadi weavers & artisans online. #खादी_महोत्सव2019 pic.twitter.com/7ZWYcumNU1
— Rajneesh Kumar (@rajneeeshkumar) October 2, 2019
देशातील ग्रामीण आणि वंचित समाजात क्षमता विकसित करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत, आज फ्लिपकार्ट समर्थ भारतातील सुमारे 500,000 पेक्षा जास्त कारागीर, विणकर आणि अतिलघु-उद्योगांना सहाय्य करत आहे.
दिनांक 2 ऑक्टोबर, 2019 रोजी फ्लिपकार्ट समूहाने एका एमओयूवर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उत्तर प्रदेश खादी आणि ग्रामोद्योग मंडळाबरोबर, , मंडळाबरोबर स्वाक्षरी केली, मंडळामध्ये नोंदणीकृत केलेल्या, राज्यातील विणकर आणि ग्रामोद्योगांना सक्षम करण्यासाठी.
“मी मान्य करेन की आमचे ऑनलाइन अभियान सुरू करण्यास आम्हाला उशीर झाला,” असे ऑनलाइन क्षेत्रात नवीन असलेले स्वयं-रोजगारीत विपुल म्हणतात, पुढे ते म्हणतात, “स्पष्टच सांगायचे तर, आम्हाला जे काही सहाय्य मिळू शकेल ते आम्हाला हवे आहे. आम्ही आताच मूलभूत गोष्टी शिकायला सुरुवात केली आहे.”
साथीच्या आजारात तग धरताना
विपुल स्पष्ट करून सांगतात, साधारणपणे जानेवारी 2020 ची अखेर होती, जेव्हा त्यांना कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराच्या गांभीर्याविषयी बातम्या ऐकू येऊ लागल्या. ग्राहक आणि व्यवसाय दोघांसाठीही,येऊ घातलेल्या आव्हानात्मक काळाची चाहूल जाणवून, पथकाने आतापर्यंत ज्याविषयी त्यांचे कोणतेही नियोजन नव्हते, अशी उत्पादने सादर करण्याचा निर्णय त्वरेने घेतला.
“आम्ही फेब्रुवारीच्या उत्तरार्धात एक उत्पादन म्हणून सॅन्टिटायझर्सचा समावेश केला. त्यावेळी आम्हाला सगळीकडून थोडा फार प्रतिसाद मिळाला, पण मार्चच्या सुरूवातीला कधीतरी मागणीमध्ये प्रचंड वाढ झाली,” अशी आठवण सांगत ते पुढे म्हणतात, ,” सॅनिटाझर्सच्या बाजारपेठेतही जागा रिकामी होती जी आम्ही भरून काढली.”
“मार्च मध्ये एका वळणावर, आमची एका दिवसाची विक्री इतकी होती, जितकी आम्ही संपूर्ण महिन्यातही करू शकलो नसतो,” असे ते म्हणतात आणि मान्य करतात कीखूप कमी सक्रिय व्यवसाय आणि ई-कॉमर्सने मोठ्या प्रमाणातील ग्राहकांपर्यंत पोहचण्याची संधी मिळवून दिली, ज्याच्या बदल्यात, त्यांच्या ब्रॅन्डची ओळख निर्माण झाली.
विक्रीला प्राधान्य असताना, कारण ते कोणत्याही व्यवसायात असते, जवळपासच्या लोकांसाठी रोजगाराच्या संधी तयार करणे हेदेखील मेघदूत हर्बलचे ध्येय होते.. त्यांच्या कारखान्यातील बहुतांश कामगारवर्ग हा 10 किमी त्रिज्येच्या परिसरात राहतो. त्यांच्या उत्पादन प्रकल्पात जवळपासचे 300 लोक काम करतात, ज्यांपैकी 40% महिला आहेत, ज्या पॅकेजिंग विभागात काम करतात. ज्यांच्याकडे एम.एस्सी. किंवा अन्य पदव्युत्तर पदवी आहे, ते प्रयोगशाळेत किंवा उत्पादन विभागात काम करतात.
“आमची उत्पादने ही हस्तनिर्मित आणि हाताने पॅक केलेली दोन्ही ही आहेत,” विपुल यांनी स्पष्ट केले.
पहिल्यांदा लॉकडाऊन जाहीर झाले तेव्हा, कर्मचारी उत्पादन प्रकल्पात येऊ शकत नव्हते. “ती आमच्यासाठी चिंतेची बाब होती. मात्र आम्ही स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकलो आणि त्यांच्यासाठी आवश्यक असलेले पास मिळवू शकलो. विपुल भर देत सांगतात,” आमचे कर्मचारी जेव्हा परत कामाला येऊ लागले तेव्हा आम्ही सुरक्षिततेविषयी कठोर खबरदारी घेतली जात आहे याकडे लक्ष दिले.”
साथीच्या रोगाच्या काळात नवीन सामान्य स्थितीचा स्वीकार करत, प्रकल्पात येण्यापूर्वी सर्व कर्मचाऱ्यांचे थर्मल स्कॅनिंग केले जाते आणि आता त्यांना दर दोन तासांनी सॅनिटाईज करून हात धुणे अऩिवार्य करण्यात आले आहे. “ग्राहक निश्चिंत राहू शकतात की आमची उत्पादने 100% सुरक्षित आहेत,” त्यांनी आग्रहपूर्वक सांगितले.
लॉकडाउनच्या काळातील हालचालीच्या प्रतिबंधामुळे, सर्व मेघदूत हर्बल उत्पादने ही भारतातील सर्व ग्राहकांना मेघदूतच्या लखनौ येथील कारखान्यामधून पॅक करून पाठविली जात होती. विपुल यांनी पुढे सांगितले की“ ई-कॉमर्सचा प्रभाव पाहून आमच्या सोबत काम करणारा प्रत्येकजण आनंदी होता.,”.
पारंपारिक कौटुंबिक व्यवसायाला नव्याने अर्थ देताना
त्यांच्या वनौषधींवरील उत्पादनांची लोकप्रियता स्पष्ट करताना, विपुल निदर्शनात आणून देतात की सर्दी आणि केस गळती यांसारख्या सामान्य आजारांवर मात करण्यासाठी नैसर्गिक आणि पारंपारिक औषधोपचारांकडे वळण्याची भारतीय घरांची वृत्ती जुनी आहे.
“या पारंपारिक विश्वासामुळे ग्राहक आमच्या उत्पादनांकडे वळले. आणि त्यांनी एकदा परिणाम पाहिल्यावर त्यांचा विश्वास बसला, ते त्यांचे निरीक्षण मांडतात आणि पुढे म्हणतात की ई-कॉमर्सने नेसर्गिक उत्पादनाच्या बाजारपेठेतील एका पूर्णपणे नवीन विभागात पोचण्यास त्यांना मदत केली आहे.
“सुरूवातीला, ऑफलाइन व्यवसायात, आमची उत्पादने मुख्यत्वे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील हिंदी भाषेच्या पट्ट्यामध्ये विकली जात होती,” ते स्पष्ट करतात. कौटुंबिक व्यवसाय एकदा ऑनलाइन गेल्यानंतर, मेघदूत हर्बलला कर्नाटक, महाराष्ट्र आणि अगदी काश्मीर मधील ग्राहकांकडून देखील ऑर्डर्स मिळू लागल्या, “त्यामुळे खरेच खूप छान वाटले!” ते स्पष्ट करतात. “आता आम्हाला आमच्या उत्पादनासाठी संपूर्ण भारतातून ईमेल येतात.”
आयआयटी(बीएचयु) मधील पदवीधर असलेले विपुल जे पदवी प्राप्त झाल्यानंतर लगेच त्यांच्या कौटुंबिक व्यवसायाकडे परत आले, त्यांच्या कौटुंबिक व्यवसायासाठीचा योजना फार मोठ्या आहेत. “आयआयटीमध्ये जाण्याचे माझे एकमेव कारण हे मला दर्जेदार शिक्षण मिळावे हे होते. 9-5 ची नोकरी माझ्यासाठी कधीही नव्हती ,” असे ते म्हणतात, देशातील प्रमुख संस्थेत शिकण्याच्या कर्तृत्वाविषयी बोलणे टाळत आणि असे आग्रहाने सांगत की त्यापेक्षा मी घरी राहिन, जिथे माझे मन गुंतले आहे.
वाढणारी ग्राहकसंख्या आणि ई-कॉमर्समध्ये पहिले पाऊल, त्यांना खात्री आहे की, येत्या काही वर्षांत मेघदूत हर्बल आणखी चांगले काम करेल. “सुरूवातीला, आमच्यासारख्या उत्पादनांकडे आलेले लोक हे बहुतांशी 40 वर्षे आणि त्यापुढील वयाचे असायचे. पण आता, नैसर्गिक उत्पादनांच्या वाढत्या मागणीसह 20 वर्षांइतक्या कमी वयाचे लोकदेखील आता ते खरेदी करू लागले आहेत. ती एक चांगली खूण आहे -स्वीकारले गेल्याची खूण ”
लॉकडाउन कमी झाल्यानंतर, नियमित व्यवसायाला सुरूवात झाल्यानंतर, त्यांना बऱ्याच प्रमाणात आव्हांनाना सामोरे जावे लागले, मात्र विपुलने त्यांचा भागीदार फ्लिपकार्टला त्यांच्या त्वरीत उपाययोजना आणि लॉजिस्टिक सहाय्यासाठी श्रेय दिले.
“फ्लिपकार्टला शक्य त्या प्रत्येक मार्गाने ते मदत करत आहेत,” ते सांगतात. “ना खंत ना खेद. जे होईल ते चांगलेच होईल.”
For years, India’s #artisans have struggled to keep traditional art alive. With #FlipkartSamarth and its NGO partners, they now have access to a pan-India market for their incredible crafts. Read their stories of hope and hard work. @Flipkarthttps://t.co/CbhOLAGstX
— Flipkart Stories (@FlipkartStories) June 24, 2020
उत्तर प्रदेश सरकारच्या साहाय्याने, विपुल सारख्या आणखी लघु उद्योगांना, प्लॅटफॉर्मचे सामर्थ्य आणि भारतभरातील बाजारपेठात पोहोचण्यास सक्षम करून त्यांचे बळ वाढविण्याचे फ्लिपकार्ट समर्थ कार्यक्रमाचे ध्येय आहे.
“युपीकेव्हिआयबी आणि फ्लिपकार्ट यांच्यामध्ये झालेल्या एमओयु मुळे उत्तर प्रदेशातील खादी उद्योगांचा वाढलेला सहभाग आणि बाजार पेठेतील प्रवेशाच्या माध्यमातून फ्लिपकार्ट तळागाळात खऱ्या बदलास चालना देत आहे,” असे डॉ नवमीत सहगल म्हणाले, जे, आयएएस, अतिरिक्त मुख्य सचिव आहेत, एमएसएमई,निर्यात प्रोत्साहन, खादी आणि ग्रामोद्योग मंडळ, उत्तर प्रदेश सरकारमध्ये. “हे खरोखर उत्साहित करणारे आहे की खासकरून लखनौ येथील व्यावसायिक एवढ्या थोड्या कालावधीत फ्लिपकार्ट समर्थ कार्यक्रमाचा प्रमुख विक्रेता बनतो. त्याची यशोगाथा युपी सरकारच्या विविध उपक्रमांतर्गतई-कॉमर्स प्लॅटफॉर्ममवर भागीदार होण्यास प्रेरीत करेल याची खात्री आहे. आम्ही फ्लिपकार्टबरोबर अधिक निकटतेने भागीदारी करण्याकडे पाहत आहोत कारण राज्याच्या व्यवसायाचा मोठा भाग आणि असामान्य उत्पादने ऑन लाइन घेण्यास अथक प्रयत्न करता आहोत.”
फ्लिपकार्ट समर्थ कार्यक्रमाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी किंवा भागिदार बनणण्यासाठी, कृपया येथे क्लिक करा.
हे देखील वाचा: फ्लिपकार्टच्या समर्थ सह ई-कॉमर्सला कवेत घेताना, भारताचे परंपरागत कारागीर उज्वल भविष्याचे स्वागत करत आहेत