आम्हीच खरे फ्लिपकार्ट आहोत असे भासवणाऱ्या बनावट वेबसाईटवर जर तुम्ही खरेदी किली तर तुम्ही तुमचे पैसे आणि डेटा घालवून बसण्याचे ते कारण होऊ शकते. पण आधीच योग्य खबरदारी घेतली तर तुम्ही हा सायबर घोटाळा वेळीच थांबवू शकता. खोटारड्या वेबसाईट व अॅप ओळखण्याचे येथे काही सोपे मार्ग सांगितले आहेत. त्यांचा वापर करून तुम्ही तुमची खरेदी निर्धास्तपाने करू शकता.
हु[/dropcapबेबुब फ्लिपकार्ट वेबसाईट वाटावी अशा वेब साईटवर क्लिक केल्यावर नेहमीच अंत:प्रेरणेतून एक त्रासदायक फीलिंग येत राहते की काही चुकते आहे का? खर आहे. ती सलणारी भावना एक चांगले सूचक आहे. पण काही वेळा तुमची ही सहज प्रवृत्ती तुम्हाला चुकाविते. येथे काही सोपे प्रकार सांगितले आहेत ज्यामुळे तुम्हाला बनावट वेबसाईट किंवा अॅपचा वारा सुध्दा खरेदी करताना लागणार नाही. तुम्हाला तुमचा व्यक्तिगत आणि आर्थिक डेटा सुरक्षित ठेवायचा असेल आणि कोणतीही काळजी न करता खरेदी सुरु ठेवायची असेल तर हे वाचा!
बनावट वेबसाईट कशी ओळखावी
दिसते तर तशीच, पण त्याच्या कार्यक्षेत्राचे (डोमेन) नाव चुकीचे आहे
जेव्हा सायबर गुन्हेगार बनावट वेबसाईट तयार करतात तेव्हा ती तंतोतंत फ्लिपकार्ट सारखीच दिसेल याची ते काळजी घेतात. तुम्हाला त्या बनावट वेबसाईटवर फ्लिपकार्टचा लोगो, अधिकृत नेटवर्क आणि बिग बिलिअन डे सारखे ट्रेडमार्क्स दिसतील. अशा वेळी तुम्ही दोन गोष्टी करू शकता:
फोटोशॉपड इमेजेस शोधा: उदा. तुम्हाला चुकीच्या सेलडेट्स आढळतील, लिखाणाचा फाँट वेगळा असेल, त्यामध्ये ‘लाईट’ (एलआयटीइ) सारखे जास्तीचे शब्द घातले गेले असतील किंवा आकृत्या अस्पष्ट, धूसर, डागाळलेल्या असतील.
युआरएल तपासा: फक्त फ्लिपकार्टची ‘flipkart.com’ या कार्यक्षेत्रावर मालकी आहे. बनावट इकॉमार्स साइट्स फ्लिपकार्ट सारख्याच दिसणारे युआरएलस् उदा:
- Flipkart.dhamaka-offers.com/
- Flipkart-bigbillion-sale.com/
- http://flipkart.hikhop.com/
किंवा वेबसाईटला ‘.कॉम’ ऐवजी वेगळेच काहीतरी, उदा:
- Flipkart.biz
- Flipkart.org
- Flipkart.info
कधी कधी, फ्लिपकार्टची बनावट वेबसाईट तशीच दिसेल, पण युआरएल पूर्णपणे वेगळे आणि संदर्भहीन असेल. उदाहानार्थ:
- 60dukan.xyz
- Offernoffer.xyz
- big-saving-days.xyz
२. अविश्वसनीय ऑफर्स किंवा डिसकाउंट्स
दुकानदारांना मोहित करण्यासाठी बनावट वेबसाईट त्यांना अकल्पनीय डील्स ऑफर करतात जसे की:
- सॅमसंग नोट८ वर ९८% सूट
- सॅमसंग गॅलक्सी १०+ ला रु. २,४९९
- आयफोन1१ फक्त रु. १०,०००
अशा असंभवनीय किंमती केवळ हास्यस्पदच नव्हे तर अनैतिक आणि बेकायदेशीर आहेत. अशा वेबसाईट पासून आणि ऑफर्स पासून दूर रहा.
३. ‘आता अड्रेसबारमध्ये
फ्लिपकार्टची अधिकृत वेबसाईट तपासलेली आणि सुरक्षित आहे. त्याचे युआरएल ‘https://’ ने सुरु होते. त्यातील ‘s’ वेबसाईटची सुरक्षितता दाखवितो आणि ‘https’ तुमचा डेटा ट्रान्स्फर इंक्रीप्ट केल्याचे दर्शवितो. तुमचा ब्राऊझर तुम्हाला दाखवत असेल की वेबसाईट लोकल सिम्बॉलने सुरक्षित आहे!. हे लक्षात ठेवा की बनावट वेबसाईट ‘असुरक्षित’ असे प्रथम दिसू लागले तरी पेमेंट स्टेपच्या वेळी ‘सुरक्षित’ असे दिसु लागते. याचे कारण पेमेंट गेटवे त्यांनी सुरक्षित वापरलेले असते. परंतु, अधिकृत फ्लिपकार्ट वेबसाईट प्रथमपासून शेवटपर्यंत सुरक्षित गेटवेच वापरते.
४. वेबसाईट अपेक्षेप्रमाणे काम करीत नाही
बनावट फ्लिपकार्ट वेबसाईटला पुढील पैकी कोणतेही किंवा सर्व एलेमेंट्स असू शकतात:
- कार्ट क्लीकेबल नाही पण प्री-लोडेड
- सही करण्यास तत्पर नाही
- काही लिंक्स सक्रीय नसतात
- हम्बुर्गर मेनू सक्रीय नाही
- तुम्ही चुकीची किंवा अर्धवट माहिती लिहू शकता आणि पुढे जा/span>
बनावट फ्लिपकार्ट अॅप कसे टिपायचे
अॅपचे नाव काळजीपूर्वक वाचा
अॅप चे नाव संशयित किंवा त्याचे स्पेलिंग चुकीचे असेल. उदाहरणार्थ: एफके साठी एलआयटीइ – ऑनलाईन शॉपिंग अॅप. हे अॅप फ्लिपकार्ट शब्द वापरण्याचे टाळतात पण अशी समजून करून देतात की ते ओरिजिनल आहे
लोगो तपासा
फ्लिपकार्ट ऑनलाईन अॅप आणि इतर अधिकृत अॅप्स जसे की फ्लिपकार्ट सेलर हब. याशिवाय फ्लिपकार्टचे बनावट अॅप्स फ्लिपकार्टच्या ब्रँडिंगची नक्कल करण्याचा प्रयत्न करतात. पण त्यातील फरक ओळखणे सोपे असते.
डेव्हलपर तपासा
फ्लिपकार्टने अधिकृत फ्लिपकार्ट अॅप डेव्हलप केले आहे आणि डेव्हलपर विभागाखाली तुम्ही अधिकृत वेबसाईटसाठी एक लिंक आणि तुमच्या अभिप्रायासाठी ईमेल आयडी, जिचा शेवट @flipkart.com ने होतो.
संशयास्पद प्रॅक्टिसेस पासून सावध रहा
बनावट वेबसाईट बाबत यावर लक्ष ठेवा:
- प्रचंड, अवास्तव डील्स
- निष्क्रिय लिंक्स
- खोटे रिव्ह्यूज्
फ्लिपकार्टवर सुरक्षितपणे खरेदी कशी करावी
बनावट फ्लिपकार्ट वेबसाईट किंवा अॅप टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे फ्लिपकार्टच्या अधिकृत प्लॅटफॉर्म्सवर खरेदी करा. तुम्ही वापरण्याचा हा एक मार्ग येथे देत आहोत:
तुम्ही फालो करू शकताहे गाईड हे अॅप तुमच्या मोबाईलवर कसे डाऊनलोड करायचे त्याबाबतच्या सूचना
जर तुम्हाला ऑनलाईन खरेदी करताना फसवणुकीच्या क्रिया सुरु असल्याचा संशय आला तर नी:संकोचपणे येथे फोन करा फ्लिपकार्ट कस्टमर सपोर्ट टोल फ्री नंबर १८०० २०८ ९८९८. हे लक्षात ठेवा की फ्लिपकार्टचे अधिकृत प्रतिनिधी कधीही तुमची संवेदनशील माहिती जसे की तुमचा पासवर्डस्, ओटीपी, आणि पिन मागत नाहीत .
बनावट फ्लिपकार्ट वेबसाईट किंवा अॅप कशी शोधायची या माहितीच्या बळावर तुम्ही शांतपणे खरेदी करू शकता, कारण तुम्हाला माहित आहे की तुमचीअद्गुजारपत्रे सुरक्षित आहेत आणि तुम्ही ऑर्डर केलेल्या सर्व वस्तू तुमच्या दरवाज्यापाशी अजिबात विलंब न करता येणार आहेत
सायबर सुरक्षेच्या पूर्व-सुचनांच्या अधिक माहितीसाठी, आमचे मास्टर गाईड वाचा.