चला, तयार व्हा, खरेदीला! फ्लिपकार्ट EGVs अथवा गिफ्ट कार्डस् कसे वापरायचे याविषयी तुमच्याकरिता मार्गदर्शक सूचना

Read this article in हिन्दी | English | বাংলা | தமிழ் | ಕನ್ನಡ | ગુજરાતી

जर तुमच्या प्रियजनांनी तुम्हाला फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक गिफ्ट व्हाउचर भेट म्हणून दिले असेल, अथवा जर तुम्ही ते अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन ते जिंकले असेल तर नक्कीच आणखी शॉपिंग करणे बाकी आहे ! तुमच्या भव्य विजयाचा उत्कृष्ठपणे वापर कसा करता येईल या विचाराने त्रस्त आहात का ? फ्लिपकार्ट EGV बदद्ल तुम्हाला जी काही माहिती असणे गरजेचे आहे ती येथे दिली आहे.

Flipkart EGVs

र तुम्ही बर्‍याच फ्लिपकार्ट स्पर्धांत भाग घेतला असेल आणि जिंकलाही असाल किंवा प्रियजनांपैकी कोणीतरी अधिक औदार्य दाखविले असेल तर त्यामुळे कदाचित तुमच्याकडे खर्च करण्यासाठी फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक गिफ्ट व्हाउचर (किंवा दोन्हीही!) असू शकेल तुम्ही त्याचा विनियोग कसा करायचा याचा विचार करीत आहात ? फ्लिपकार्ट EGVs बदद्ल तुम्हाला जी काही माहिती असणे गरजेचे आहे ती इथे दिली आहे.

फ्लिपकार्ट EGVs कशामुळे इतके चित्तवेधक आहे?

थोडक्यात, EGVs अथवा फ्लिपकार्ट गिफ्ट कार्डस् ही इतर कोणत्याही व्हाउचर्ससारखीच आहेत ज्याचा तुम्ही स्टोअरमध्ये विनियोग करता. उदाहरणार्थ, जर तुम्ही ₹500 चे गिफ्ट कार्ड जिंकला असाल तर तुम्ही ₹500 ची खरेदी करू शकता आणि ते पैसे देण्यासाठी फ्लिपकार्ट EGVs वापरू शकता.

विजेत्याला सर्व काही मिळते – फ्लिपकार्ट गिफ्ट कार्डस् तुम्ही कसे वापरू शकता

जर तुमच्याकडे फ्लिपकार्ट EGVs असेल आणि याचा जास्तीत जास्त चांगला उपयोग कसा करता येईल असा तुम्ही विचार करत असाल ते अतिशय सोपे आहे. तुम्हाला फक्त फ्लिपकार्टवर लॉग-ऑन करून ज्या वस्तू खरेदी करायच्या आहेत त्या निवडून त्यांना तुमच्या कार्टमध्ये घालून ठेवायचे आहे. नंतर आपण नेहमी करता त्याप्रमाणे ‘Proceed to Pay’’ वर क्लिक करा. कॅश ऑन डिलिव्हरी अथवा नेट बँकिंग यांना तुमच्या पेमेंटचा पर्याय म्हणून निवडण्याऐवजी ‘Pay by Gift Card’ वर क्लिक करा. फ्लिपकार्ट EGVs तुमच्या नेहमीच्या डेबिट/क्रेडिट कार्डप्रमाणेच 16 अंकी कार्ड नंबर आणि 6-अंकी पिन असतो. तुम्हाला EGV तपशीलांसह ई-मेलमध्ये हे दोन्हीही क्रमांक मिळतील. तुमच्या ऑर्डरचे पैसे भरण्यासाठी केवळ ते एन्टर करा.

Flipkart EGVs

जर तुमची एकूण देय रक्कम जर फ्लिपकार्ट EGVs च्या किमतीपेक्षा अधिक असेल तर बाकी रक्कम तुमच्या पसंतीच्या पेमेंट पध्दतीमार्फत भरा. हे इतके सोपे आहे.

तुमच्याकडे बरेच फ्लिपकार्ट EGVs आहेत? त्यांचा ट्रॅक कसा ठेवायचा हे पुढे दिले आहे

म्हणजे तुम्ही भाग्यवान ठरलात आणि तुम्हाला अनेक फ्लिपकार्ट EGVs मिळाले आहेत! ही तर छानच बातमी आहे. जर तुम्हाला एकाहून अधिक व्हाउचर्स वापरून एक मोठी खरेदी करायची असेल तर तुम्ही निश्चितच ती करू शकता.

जर तुम्हाला तुमचे सर्व फ्लिपकार्ट EGVs वापरण्याची इच्छा असेल तर स्क्रीनच्या वरच्या डाव्या बाजूला असलेल्या ड्रॉप डाउन मेनूवर केवळ क्लिक करा -> क्लिक ऑन Gift Card -> स्क्रॉल डाउन आणि क्लिक करा Add Gift Card To Wallet. Gift card number आणि Gift Card PIN यासाठी तुमचा फ्लिपकार्ट EGV’s ई-मेल तपासा -> तपशील एन्टर करा -> क्लिक Apply , आणि झाले इतकेच!

Flipkart EGVs

आता तुम्ही तुमचे गिफ्ट कार्ड तुमच्या वॉलेटमध्ये जमा केल्यावर पुढच्या वेळी फिल्पकार्टवर काहीही खरेदी करताना केवळ ही पेमेंट पध्दत वापरा.

एकापेक्षा अधिक गोष्टींच्या खरेदीसाठी एक फ्लिपकार्ट EGVs वापरा

जर तुमचे फ्लिपकार्ट EGV ₹500 चे असेल आणि उदाहरणादाखल जर तुम्ही फक्त ₹300 किमतीचा परफ्यूम खरेदी करू इच्छित असाल तर चिडू नका. तुम्ही एकाच वेळेस पूर्ण रक्कम खर्च करण्याची आवश्यकता नाही. तुमचे शिल्लक ₹200 सुखरूप आणि सुरक्षित आहेत. त्याचप्रमाणे, जर तुम्ही ऑर्डर देऊन ती रद्द केलीत तरी ती रक्कम थेट तुमच्या फ्लिपकार्ट गिफ्ट कार्डमध्ये परत जाते.

तुमच्या फ्लिपकार्ट EGV मधील शिल्लक रक्कम तपासा

फ्लिपकार्टच्या तुमच्या अकाउंटमध्ये लॉग-इन करून तुम्ही तुमच्या गिफ्ट कार्डवरील शिल्लक रक्कम कधीही तपासून पाहू शकता. स्क्रीनच्या वरच्या बाजूस डावीकडे असलेल्या ड्रॉप डाउन मेनूमधून ‘Gift Cards’ वर क्लिक करा. नंतर ‘Check Gift Card Balance’ यावर क्लिक करा. फ्लिपकार्टच्या गिफ्ट कार्डचा नंबर आणि PIN एन्टर करा आणि झालं! तुम्ही किती रक्कम खर्च करू शकता याकरिता शिल्लक रक्कम तुम्हाला पाहाता येईल.

तुम्हाला तुमच्या कार्टमध्ये तुमच्या पसंतीच्या गोष्टी घालण्यासाठी आणि आणखी काही खरेदी करण्यासाठी फ्लिपकार्ट गिफ्ट कार्डस् मिळाल्यापासून तुमच्याकडे 12 महिन्यांचा कालावधी आहे. म्हणून फ्लिपकार्टवर लॉग ऑन करा आणि संकोच न करता अगदी मनसोक्त खरेदी करा!


अपडेट केलेले एफएक्यू वाचा फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक गिफ्ट व्हाउचर्सविषयी

Enjoy shopping on Flipkart