आपली आवडती फ्लिपकार्ट प्लस नाणी आता फ्लिपकार्ट सुपरकॉइन आहेत! काय बदलले आहे हे जाणून घेण्यासाठी आणि फ्लिपकार्ट सुपरकॉइन्ससह आपण घेऊ शकत असलेल्या सर्व फायद्यांसाठी पुढे वाचा.
फ्लिपकार्ट सुपरकॉइन्स एक अशा प्रकारचे पहिलेच व्यवसाय इकोसिस्टिम आहे जे फ्लिपकार्टच्या लाखो ग्राहकांना लाभ प्रदान करण्यासाठी तयार केले गेले आहे. ग्राहकांना आता त्यांना आवडत असलेली प्रत्येक गोष्ट करण्यासाठी रिवॉर्ड दिले जाईल, ज्यामध्ये निवड करण्यासाठी मोठ्या संख्येने रिवॉर्ड पार्टनर्स आहेत आणि हे सर्व एकाच व्यासपीठावर व्यवस्थापित केले जाईल. फॅशन उत्पादने खरेदी करणे, औषधे खरेदी करणे, हॉटेल रूम किंवा फ्लाइट बुक करणे यासह अनेक गरजांसाठी फ्लिपकार्ट आपले वन-स्टॉप डेस्टिनेशन बनेल!
या अनोख्या रिवॉर्ड्स इकोसिस्टम बद्दल आपल्याला माहीत असणे आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी हे आहे आपले मार्गदर्शक::
सुपरकॉइन्स इतर रिवॉर्ड्स कार्यक्रमांपेक्षा वेगळे कसे आहेत?
पारंपारिक रिवॉर्ड्स कार्यक्रम त्यांच्या स्वत: च्या व्यवसाय इकोसिस्टिमपुरते मर्यादित असताना गुणांना रिवॉर्ड्समध्ये रूपांतरित करण्याच्या मर्यादित संधींमुळे त्यांची पूर्ण क्षमता साध्य करू शकले नाहीत. फ्लिपकार्टची सुपरकॉइन इकोसिस्टिम अन्न, प्रवास आणि करमणूक विभागातून अनेक भागीदार आणून अर्थपूर्ण पद्धतीने या आव्हानांवर मात करण्यासाठी सादर करण्यात आली आहे.
मी सुपरकॉइन्स कसे कमवू?
फ्लिपकार्टवर किंवा तुमच्या सर्व दैनंदिन गरजा भागवणाऱ्या सुपरकॉईन भागीदारांपैकी कोणत्याही एकावर खरेदी करून सुपर कॉइन्स मिळवता येऊ शकतात. फ्लिपकार्टवर खरेदी करण्याव्यतिरिक्त, आपण फोनपे, ओला, अर्बन क्लॅप, 1MG, ओयो व झूमकार यांसारख्या ब्रँन्ड पार्टनर्सचा वापर करून फ्लिपकार्टच्या माध्यमातून, आपल्या प्रत्येक खरेदीवर सुपरकॉइन्स प्राप्तकरू शकतात! सुपरकॉइन मिळविण्याची प्रक्रिया अत्यंत सरळ आणि सहज आहे. सुपरकॉईन्स इकोसिस्टम ग्राहकांनी निवडलेल्या पेमेंटच्या पद्धतीची पर्वा न करता देखील त्यांच्यासाठी खुली आहे. याचा अर्थ असा आहे की ग्राहक त्यांच्या केवळ रोख भरणा पद्धतीवरही सुपरकॉइन्स मिळवू शकतात!
फ्लिपकार्ट सुपरकॉइन्स मिळविणे सोयीचे आहे?
ग्राहकांची सोय लक्षात घेऊन सुपरकॉइन्स रिवॉर्ड्स कार्यक्रमात ग्राहकांकडून कोणत्याही अतिरिक्त प्रयत्नांची (नोंदणी सारख्या) आवश्यकता नसते. फ्लिपकार्टवरील कोणताही खरेदीदार सुपरकॉइन्स मिळविण्यास पात्र आहे आणि फ्लिपकार्ट प्लस सदस्य होण्यासाठी उत्तम काळ आहे, कारण आपण प्रत्येक व्यवहारावर 2 पट अधिक सुपरकॉइन्स मिळवाल.
फ्लिपकार्ट प्लस ग्राहकांना सुपरकॉइनचे काय फायदे आहेत?
- फ्लिपकार्ट प्लस सदस्यांना फ्लिपकार्ट प्लस नसलेल्या सदस्यांपेक्षा दुप्पट सुपरकॉइन्स मिळतात
- फ्लिपकार्ट प्लसचे सदस्य फ्लिपकार्टवर त्यांच्या खरेदीसाठी सुपरकॉइन्स त्यांच्या पसंतीच्या पेमेंट पद्धतीसह एकत्र करू शकतात
- फ्लिपकार्ट प्लस सदस्य सुपरकॉइन्ससह ‘प्लस एक्सक्लुझिव्ह’ पुरस्कारांची पूर्तता करू शकतात
सुपरकॉइन्ससह, फ्लिपकार्ट ग्राहकांच्या रिवॉर्ड्सच्या स्वरूपात बदल घडवून आणण्यासाठी आणि त्याचवेळी खरेदीविषयीच्या असंख्य गरजांकरिता वन-स्टॉप डेस्टिनेशन बनण्यासाठी सज्ज झाले आहे.