फ्लिपकार्ट किराणा कार्यक्रमात ग्रोथ आणि एक्सिसचे पालन पोषण समाविष्ट असते.

Read this article in हिन्दी | English | বাংলা | தமிழ் | ಕನ್ನಡ | ગુજરાતી | తెలుగు

भारतीय रिटेल सिस्टमचा किराणा स्टोर्स हे अनेक पिढ्यांसाठी पाठीचा कणा राहिलेला आहे. त्यांनी आजी-आजोबा सांगतात त्या गोष्टींमध्ये जागा मिळविली आहे. सुख-दु:खांनी भरलेल्या त्यांच्या आठवणीमध्ये पूर्वी महिन्याचा किराणा माल काही आण्यांना – त्यावेळचे प्रचलित चलन, जे आता काही थोड्या लोकांनाच माहिती असेल – उपलब्ध होत होता असे ते सांगतात. किरणा माल हा जसा भारताच्या इतिहासाचा भाग आहे तसाच तो वर्तमानाचासुध्दा भाग आहे, ज्यात किराणा मालाची दुकाने मोठ्यात मोठ्या मेट्रो शहरापासून ते लहानात लहान खेड्यापर्यंत पसरलेली आहेत. फ्लिपकार्ट किराणा कार्यक्रम दूरवर पसरलेल्या इंस्टीट्युशन्स आणि अद्यावत टेक्नोलॉजी या दोन्हीच्या बलस्थानांना जोडतो. आणि त्यात समाविष्ट असलेली वाढ दुकानदारांना आणि ग्राहकांना त्याचा अॅक्सिस देते. आम्ही भारतातील आमच्या चार किराणा पार्टनर्सच्या जीवनाची माहिती सांगणार आहोत ती आता वाचावी.

Flipkart Kirana Program Story

किराणा दुकाने कुटुंबाने स्थापन करून सुरु ठेवलेली आहेत आणि तो भारताच्या रिटेल प्रकाराचे एक अत्यंत विश्वासार्ह स्वरूप आहे. एक प्रकारे किराणा स्टोरचे मालक हे विश-लिस्ट्स आणि शॉपिंग कार्ट्स राखणारे ते ज्या समाजात ओपरेट करतात त्यामध्ये राहिलेच होते. त्याना त्यांच्या ग्राहकांची चांगली जाण होती आणि त्यांच्या गरजा ते ओळखत होते. त्याप्रमाणे त्याना लागणारा किराणा माल नेहमी स्टॉकमध्ये ठेवून ग्राहकाच्या मनात एक प्रकारे श्रद्धाच निर्माण करतात.
जसा भारतामध्ये इंटरनेटला प्रारंभ झाला तशा एक बिलिअन पेक्षा जास्त लोकसंख्येतील लोकांच्या खरेदीच्या सवयीसुध्दा बदलू लागल्या.
फ्लिपकार्ट किराणा कार्यक्रमाला २०१९ मध्ये सुरुवात झाली ती भारताच्या सर्वात जुन्या रिटेल स्वरूपाच्या मेम्बर्सना इ-कॉमर्सच्या पटावर आणण्यासाठी. जेव्हा त्यांची चालू दुकाने यशस्वीपणे सुरु राहिली ज्यामध्ये मॉम अँड पॉप स्टोर्स, टेलरिंग शॉप्स, बेकरीज, किराणा स्टोर्स आणि इतर प्रकारची दुकाने होती. त्याचबरोबर किराणा कार्यक्रमाने फ्लिपकार्ट किराणा पार्टनर्स म्हणून त्यांना पूरक इनकम मिळू लागले. या प्रोग्रामने फ्लिपकार्ट ग्राहकांना निरनिराळ्या प्रकारातील प्रोडक्ट्ससाठी सुरक्षित आणि सोयीस्कर एक्सिस उभा केला.

विश-लिस्ट फुलफील करण्यासाठी पर्वत हलविणे

समृद्धीत, हिरवेगार डेहराडून, उत्तराखंड, गौरव राही आणि फैझन सिद्दिकी दोघेही दोघेही फ्लिपकार्ट किराणा पार्टनर्स, त्यांना या गोष्टीचा अभिमान वाटतो की ते फ्लिपकार्टची टेक्नोलॉजी त्यांच्या कुटुंबियाना अधिक चांगले जीवन देते एव्हढेच नाही तर त्यांच्या सभोवतालच्या लोकांना एक्सिस सुध्दा मिळवून देते. ते म्हणतात की कस्टमर्स जेव्हा भारतातून कोठूनही मिळालेली पॅकेजेस पाहतो तेव्ह्या त्यांच्या चेहेऱ्यावरील आनंद पाहून यांना अत्यंत समाधान मिळते.

गौरव म्हणतो, “फ्लिपकार्ट किराणा मतलब सफलता का पहला कदम. (फ्लिपकार्ट किराणा सफलता की ओर पहला कदम है)”

Flipkart Kirana Program Story Gaurav

पदवीधर झाल्यावर, गौरवने अनेक जॉब्ससाठी अर्ज भरले. त्यांच्या भागात नोकरीच्या संधी खूप कमी असल्याने त्याने वडिलांचा टेलरिंगचा बिझनेस जॉईन केला. जेव्हा त्याला हे कळले की बिझनेसचे उत्पन्न त्यांच्या सात लोकांचे कुटुंबासाठी पुरेसे नाही, तेव्हा त्याने फ्लिपकार्ट किराणा जॉईन करण्याचा निर्णय घेतला.

आज तो त्याचा वेळ फ्लिपकार्टच्या डिलीव्हरीज, टेलरिंग आणि संध्याकाळी केवळ त्याच्या स्वत:साठी बाहेर पडण्यात व्यतीत करतो. त्याचे स्वप्न आहे की स्वत:चे घर असावे आणि त्याला विश्वास आहे की त्याचे फ्लिपकार्ट किराणा मधून मिळणारे उत्पन्न त्याला यासाठी सहाय्य करेल.

“आज, जरी मला काही जॉबच्या ऑफर्स मिळाल्या असल्या तरी मी हा बिझनेस सोडून जाण्याचा विचारसुध्दा करणार नाही. याचे कारण फ्लिपकार्ट महामारीच्या काळात आमच्या पाठीशी उभे राहिले आणि आम्हाला ग्रेट सपोर्ट सिस्टम देऊ केली.” तो म्हणतो, आणि पुढे सांगतो, “मी फ्लिपकार्टच्या मदतीने खूप लांबवर आलेलो आहे. मी माझ्या बहिणीच्या लग्नासाठी पैसे साठवतो आहे. ये सब फ्लिपकार्ट वजहसे पोसिबल हुआ. (हे शक्य झाले ते केवळ फ्लिपकार्ट मुळे).”

फैझन सिद्दीकी, सुध्दा डेहराडूनहून फ्लिपकार्ट किराणाचा पार्टनर आहे. त्याच्या कुटुंबातील आर्थिक परिस्थितीमुळे त्याने फ्लिपकार्ट बरोबर काम निवडले.

लॉकडाऊन डोंगराळ भागात खूप भीषण ठरला, आणि त्याने आपले हात अनेक जॉब्समध्ये घालाण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी फ्लिपकार्टच्या किराणा प्रोग्रामवर जॉईन झाला. जेव्हा तो त्याच्या भावाच्या किराणा मालाच्या दुकानात काम करतो, तेव्हा तो त्याच्या डिलीव्हरीज साठी वेळ राखून ठेवतो. तो या गोष्टीची प्रशंसा करतो की त्याचे स्वत:चे फ्लिपकार्टच्या डिलिव्हरी करण्याचे तास आणि कोणत्या एरीयात केव्हा डिलिव्हरी करायचे हे तो प्लॅन करू शकतो.
Flipkart Kirana Program Story Faizan

“मी एकत्र कुटुंबात राहतो आणि आमच्या कुटुंबाचे दुकान माझ्या भावा बरोबर सांभाळतो,” फैझन सांगतो, “उत्पन्न मर्यादित होते आणि मला फक्त बेसिक गरजा भागाविण्यापुरतेच होते. काही वर्षांच्या संघर्षानंतर आता मी माझ्या कुटुंबासाठी जमिनीचा एक प्लॉट डेहराडून मध्ये घेऊ शकलो आहे. आज मला माझ्या वेळेवर लवचिकतेमुळे ताबा आहे. फ्लिपकार्ट किराणाने मला स्वातंत्र्य दिले आहे, जे मी या पूर्वी कधीच अनुभवले नव्हते.” त्याने पुढे सांगितले, “अनअब हम अपनी मार्झिके मलिक है (मी माझा स्वत:च्या एछेचा मालक आहे).”

मोठी स्वप्ने, डिलीव्हरिंग बेटर

भारतामध्ये अंदाजे १२ मिलिअन किराणा स्टोर्स आहेत.. आज, या बिझनेस कम्युनिटीचे सभासद मोजले तर ते फ्लिपकार्टच्या एकूण डिलीव्हरिजच्या सुमारे एक त्रीतीयांश भरतात. खात्रीशीर पूरक उत्पन्न आणि लवचिकता दोन्हीत ग्रोथ समाविष्ट आहे —— फ्लिपकार्ट किराणा कार्यक्रमाने पार्टनर्सकरिता आणखी एक इंसेंटीव्ह सुरु केले आहे. त्यात पार्टनर्ससाठी संदर्भ देणाऱ्यांना प्रोत्साहन आणि रु. ५.०० लाखाचा पर्सनल अपघात विमा आणि अनेक फायदे आहेत.

सुरेश, एक कर्नाटकातील बेंगळूरूमधील फ्लिपकार्ट किराणा पार्टनरने स्ट्रिंग ऑफ जॉब्सचे काम केले ज्याला खूप जास्तीचे तास आणि पैसे लागले. सुरेशच्या कुटुंबाने त्याला दुसरे पर्याय शोधण्यास सांगितले. आणि अखेरीस त्यांनी किराणा दुकान उघडले. जे त्यांच्यासाठी मूळ आर्थिक स्रोत बनले. लवकरच सुरेशने फ्लिपकार्ट किराणा डिलिव्हरी पार्टनर म्हणून सही केली. त्यतून त्याला पूरक उत्पन्न मिळू लागले. किराणा पार्टनर असल्यामुळे त्याला मिळणारी लवचिकता हा सुरेशसाठी एक सूक्ष्म मुद्दा होता.

Flipkart Kirana Program Story Suresh

“मी मिळविलेले पैसे माझ्या कुटुंबाला देण्यासाठी आणि माझ्या मुलांचे शिक्षणासाठी खूप मदतीचे आहेत,” सुरेश सांगतो. “मी जेव्हा फ्लिपकार्ट किराणा कार्यक्रम बरोबर बिझनेस सुरु केला तेव्हा मला फोन येऊ लागले की मला बँकेचे कर्ज हवे आहे का? पण मी त्यांना सांगितले की मी किराणा कार्यक्रमातून पैसे मिळवितो आहे आणि त्यांचे कर्ज नाकारले. जेव्हा कधी माझ्या घरात उत्सव किंवा तसेच काही इतर समारंभ असतात तेव्हा मला माझे फ्लिपकार्ट किराणा कडून मिळणाऱ्या पैशाचा उपयोग होतो.”

श्रीकांत, दुसरा एक बेंगळूरूचा किराणा पार्टनर, त्याने फ्लिपकार्ट किराणा पार्टनर म्हणून सही केल्यानंतर त्याच्या जीवनात कसे अमुलाग्र बदल झाले त्याबाबत सांगतो. पत्र्याचे छप्पर असलेल्या घरातून तो त्याच्या कुटुंबा बरोबर राहत होता. आज तो लीज केलेल्या स्वत:च्या घरात कसा आला ते हसत हसत सांगतो.

“मी गेली २-२.५ वर्षे फ्लिपकार्ट किराणा प्रोग्रामबरोबर काम करीत आलेलो आहे,” श्रीकांत सांगतो. “ तुम्ही जर जास्तीच्या सेव्हिंग बाबत बोलत असाल तर मी माझ्या साठविलेल्या पैशातून घर लीज केले आणि उरलेल्या पैशातून माझ्या पत्नीला थोडे सोने विकत घेतले. पूर्वी माझे सासरे त्यांचा बिझनेस कार्टमधून चालवत असत. आता आम्हाला आमचे स्वत:चे स्टोर आहे आणि ते त्याची देखभाल करतात आणि मी किराणा पार्टनर म्हणून काम करतो. माझी फमिली आता खूप सुखात आहे.”

Flipkart Kirana Program Story Srikanth

कर्नाटकातील मंड्या गावात श्रीकांतचे आई-वडील शेतकरी आहेत आणि त्यांना तो आर्थिक मदत करू शकतो म्हणून अभिमानाने सांगतो. तो आपल्या कार्यक्रमातून केलेल्या सेव्हिंग्ज मधून वडिलांसाठी मोटर-सायकल सुध्दा खरेदी करू शकला. त्याचा फ्लिपकार्ट किराणा पार्टनर म्हणून त्याला लवचिकता मिळते, त्यामुळे तो आणखी एक गोष्ट करू शकतो ती म्हणजे तो त्याच्या मुलाला रोज त्याचा शाळेतून घरी घेऊन येतो आणि त्याला शाळा सुटल्यानंतरचे जेवण देतो. त्याने त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी आधीच तरतूद केली असून त्यासाठी तो त्याला मिळणाऱ्या पैशातून थोडे पैसे शिल्लक टाकतो व त्यामुळे तो आपल्या मुलाला चांगल्या शाळेत घालू शकेल.

घरात वाढलेला वाढीचा समावेश असलेला

Flipkart Kirana story - Hemant Badri

हेमंत बद्री, सीनिअर व्हाईस प्रेसिडेंट, कस्टमर एक्सपीरिअन्स आणि फ्लिपकार्टची सप्लाय चेन, स्पष्ट करून सांगत आहेत की फ्लिपकार्ट किराणा कार्यक्रमाचा भारताच्या इ-कॉमर्स आणि इको सिस्टीम वर होणारा परिणाम ग्राहकांसाठी आणि किराणा पार्टनर्स साठी.

“घरा-घरातून वाढलेला फ्लिपकार्ट ग्रूप हा किराणा मध्ये समाविष्ट असलेली टेक्नोलॉजी ड्रिव्हन ग्रोथ करण्यास वचनबद्ध आहे. आणि त्याने भारतात किराणा इकोसिस्टीम सक्षम केली आहे, “ तो सांगतो. ” पँडेमिक मध्ये आमच्या किराणा कार्यक्रमामुळे आमचे स्टोर ओनर्सनी सप्लीमेंटरी उत्पन्न मिळवले, त्यांच्या गरजा भागल्या आणि ते त्यांच्या कुटुंबाना सहाय्य करू शकले.”

फ्लिपकार्ट किराणा प्रोग्राम २७,००० पार्टनर्सनी २०१९ मध्ये झाला. तेव्हापासून यात सहभागी होणारे, विशेषत: किराणा विक्रेते असून ही संख्या सतत वाढताना दिसते आहे. सध्या २००,००० हून अधिक पार्टनर्स भारतभर मिलिअन्स हून अधिक फ्लिपकार्ट ग्राहकांना सेवा देत आहेत. या प्रोग्राममध्ये काही स्त्रियांचा सहभाग आहे, जो फ्लिपकार्टच्या सर्वांना समविष्ट करून घेण्याच्या, समान संधी देण्याच्या धोरणानुसार आहे. या प्रोग्राममध्ये भारताच्या उत्तर-पूर्व राज्यातून, त्रिपुरा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांसाहित येणाऱ्यांची संख्या पाचपटीने वाढलेली आहे. त्यातील १५,००० पार्टनर्स यंदा या भागात आलेले आहेत. गेल्या केवळ एक वर्षात फ्लिपकार्ट किराणा पार्टनर्सनी त्यांच्या उत्पन्नामध्ये सुमारे ३० टक्के वाढ त्यांच्या मासिक प्राप्तीत झाल्याची नोंद केलेली आहे.


हे पण वाचा: #बिलिअनमध्येएक: फ्लिपकार्ट किराणा पार्टनर For अमित कुमार, फॅमिली म्हणजे सर्वकांही. Amit Kumar, family is everything

Enjoy shopping on Flipkart