फ्लिपकार्ट बनावट प्रॉडक्टस् विकत आहेत यावर ऑनलाईन चाललेल्या चर्चेमध्ये काही तथ्य आहे का? ह्या दाव्यांमागील तथ्ये समजून घेण्यासाठी तुम्ही काही गंभीर प्रयत्न केले आहेत का? त्याची उत्तरे थेट इथेच शोधा.
फ्लिपकार्ट घोटाळा, फ्लिपकार्ट लबाडी, फ्लिपकार्ट फसवणूक. अशा प्रकारची कल्पक दूषणे वेब आणि सोशल मिडीयावर फिरत आहेत. फ्लिपकार्ट खरोखरच बनावट उत्पादने विकते किंवा नाही यावर इंटरनेट वापरणार्यांचा वाद सुरू असताना, प्रिय ग्राहकराजा, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. हे आरोप खरे आहेत किंवा नाही हे शोधण्यासाठी तुम्ही पुरेसे खोलात शिरून पाहिले आहे का? तुम्ही तसे केले नसेल तर आम्ही समजू शकतो. अशा प्रकरणांमध्ये तुम्ही प्रतिक्रियाशील असणे स्वाभाविक आहे आणि या सहज पसरणाऱ्या दाव्यांमागचे मूळ कारण शोधणे हे नक्कीच तुमच्यावर अवलंबून नाही. म्हणून हा लेख तुम्हाला – आणि आम्हालाही सतावत असलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आहे. तसेच फ्लिपकार्टमध्ये आम्ही या समस्येच्या बाबतीत हातावर हात ठेवून बसलेलो नाही आहोत हे सत्य मांडण्याचे कामही हा लेख करतो. तुमच्या चिंतांचा विचार आम्ही गांभीर्याने करत आहोत
बनावट उत्पादनांविषयीच्या तुमच्या चिंता फ्लिपकार्ट कसे सोडविते ते समजून घेण्यासाठी पुढे वाचा.
ऑनलाइन शॉपिग साइटवर विकल्या जाणार्या काही उत्पादनांच्या खरेपणाबद्दल शंका घेतल्यामुळे, तक्रारी आणि संतापजनक संभाषणांद्वारे सोशल मीडिया टाईमलाईन व इंटरनेट चर्चा मंच यांच्यामध्ये गोंधळ आहे. बनावट उत्पादने, बनावट माल आणि मूळ ब्रॅन्डेड उत्पादनांच्या अनुकरणाबद्दल दररोज प्रश्न उठविला जातो. (आमचा शैक्षणिक लेख वाचा बनावट परफ्यूमची खरेदी कशी टाळायची).
फ्लिपकार्टसारख्या ऑनलाईन बाजारपेठांमध्ये त्यांच्या प्लॅटफॉर्मवर विकल्या जाणार्या उत्पादनांची गुणवत्तेविषयी कथितपणे दुर्लक्ष केले जाते याबद्दल निराशा पसरली आहे. फ्लोपकार्ट, फेककार्ट आणि फ्रॉडकार्ट ही इंटरनेट मिम्स सध्या फिरत आहेत. आम्ही तुमच्या सर्जनशीलतेचे कौतुक करत तुमच्याबरोबर हसलोही, पण आम्ही येथे प्रामाणिकपणे व्यवसायासाठी उतरलो आहोत. हे प्रकरण आमच्या लक्षात आणून दिले जाण्यापूर्वीच सत्य शोधून काढण्यासाठी आम्ही खोलवर आणि भेदक चौकशी सुरू केली आहे. फ्लिपकार्टवरील विक्रेते खरोखरच बनावट उत्पादने विकत आहेत का?
बनावट उत्पादन कशाची बनतात?
ऑनलाईन बनावट उत्पादनांच्या विषयात खोलवर जाण्यापूर्वी ‘बनावट’चे स्पष्टीकरण काय आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. बनावटसाठी स्पष्ट लोकप्रिय ऑनलाईन परिभाषा म्हणजे ‘अस्सल नसलेले; नक्कल केलेले किंवा बनावटी’. शाब्दिक परिभाषेपलिकडे, आपण ऑनलाईन पाहात असलेल्या उत्पादनांच्या संदर्भात याचा काय अर्थ आहे?
ऑनलाईन रिटेल उद्योगातील एक सर्वात मोठे आव्हान म्हणजे बनावट उत्पादनांचा प्रचार करणे आहे. थोडक्यात, ही उत्पादने अस्सल असल्याचे दिसते परंतु वस्तुत: ती कमी दर्जाची केलेली नक्कल आहे जी काही उत्पादक मूळ ब्रॅन्डेड उत्पादने म्हणून पास करण्याचा प्रयत्न करतात. ऑनलाईन खरेदी करणार्या ग्राहकांना दर्शविलेल्या प्रतिमा ह्या मूळ उत्पादनांसारख्याच दिसू शकतात. प्रतिमा आणि वर्णन हे मूळ ब्रँडचा लोगो, पॅकेजिंग तसेच ट्रेडमार्क या संबंधित अंगभूत गुणांसारखे हुबेहुब दिसू शकतात. दुर्देवी ऑनलाईन गिर्हाईकाला या दोन्हीमध्ये फरक करणे कठीण होऊ शकते.
आम्हाला हे समजले आहे की ‘डुप्लिकेट उत्पादने’ केवळ मोठ्या लेबल ब्रँडची प्रतिष्ठाच धोक्यात आणत नाहीत तर त्याची परिणीती आर्थिक आणि भावनिकदृष्ट्या ग्राहकांना दुखविण्यात होते. म्हणून तुम्हाला एक गोष्ट माहीत असणे आवश्यक आहे : एखादा ऑनलाईन विक्रेता, फ्लिपकार्टवर बनावट उत्पादनांची जाहिरात करत असल्याचे आढळल्यास तो लगेचच संशयित गुन्हेगारांच्या यादीत (ब्लॅकलिस्ट) जातो व तो साईटवर विक्री करण्यासाठी निलंबित होतो.
तुम्ही ऑनलाईन बनावट उत्पादन कसे शोधू शकता?
चला, याला सामोरे जाऊया. विशेषत: तुम्ही जेव्हा खरेदीच्या उत्साहात असता किंवा सेलमध्ये खरेदी करता, अशावेळेस ऑनलाईन खरेदीतली बनावट उत्पादने शोधणे सोपे नसते. जर तुम्हाला उत्पादनाबाबत खात्री नसेल आणि त्यात काहीतरी चुकीचे आहे असे वाटत असेल तर प्राथमिक स्तरावर तुम्ही या तीन गोष्टी तपासू शकता.
पहिली पायरी: बारकाईने पहा
मूळ ब्रँडची नक्कल खूपच अक्कलहुशारीने डिझाईन केलेली असते. पहिल्या दृष्टिक्षेपामध्ये ती उत्पादने अगदी हुबेहुब मूळ उत्पादनांसारखीच दिसतील. म्हणून उत्पादनाचा काळजीपूर्वक अभ्यास करण्यासाठी, उत्पादनांचे वर्णन लक्षपूर्वक वाचा आणि चुकीचे वाटणारे ब्रँडचे नाव, लोगोचा प्रकार, तसेच डिझाईनसंबंधीचे इतर निर्धारक पहा.
दुसरी पायरी: स्वस्त किंमतीच्या उत्पादनांचा अर्थ बनावट उत्पादने असू शकतात
भारतामध्ये, कोणतीही वस्तू खरेदी करताना त्याची किंमत हा महत्त्वाचा घटक असतो. घोटाळेबाजांना त्यांचे मानसशास्त्र माहीत असते. म्हणून, जर तुम्ही एखाद्या परिचित ब्रँडेड उत्पादनावर अडखळलात जे विश्वास बसणार नाही अशा किमतीत विकले जात आहे तर एकदम हुरळून जाऊ नका. सावध व्हा. इतर विक्रेत्यांद्वारे ऑफर केलेल्या किमतीच्या तुलनेत त्या किमतीची तुलना करा आणि आकार, वजन व त्याच्या इतर पैलू यासारख्या वैशिष्ट्यांची पुन्हा तपासणी करा. बर्याचदा विक्रेत्याकडे किमतीचे अवमूल्यन करून उत्पादन विकायचा परवाना असून शकतो. अशा वेळी, उत्पादन अस्सल असू शकते. नाही तर, तुमचा संशय योग्य असू शकतो.
तिसरी पायरी: विक्रेता रेटिंग आणि उत्पादन पुनरावलोकन
बरेचजण एखाद्या उत्पादनाच्या रेटिंग किंवा रिव्ह्यूबद्दलच्या विश्वासार्हतेवर मतभेद व्यक्त करू शकतात, परंतु उत्पादनाची सत्यता ठरवण्यासाठी अधिकृत माहितीचा हा निर्विवाद स्रोत आहे. तुमच्या मनातील शंका दूर करण्यासाठी आणि उत्पादनाविषयी विश्वासार्हता वाटण्यासाठी उत्पादन सूची पृष्ठावरील (प्रॉडक्ट लिस्टिंग पेज) रेटिंग्ज आणि रिव्ह्यूज वाचण्यासाठी पुरेसा वेळ घ्या. नेहमीच सर्वांत सकारात्मक रिव्ह्यूज् असलेल्या विक्रेत्याकडून खरेदी करा. फ्लिपकार्टवरील उत्पादनांच्या रिव्ह्यूज् च्या बाबतीत, नेहमीच प्रमाणित खरेदीदारांचे रिव्ह्यूज् शोधा कारण ह्यात उत्पादनाला पडताळून घेतलेल्या खरेदीदारांनी त्यांचे योगदान दिले आहे. सूचीबध्द उत्पादनांमध्ये प्रमाणित (सर्टिफाइड) खरेदीदारांकडून सकारात्मक रिव्ह्यूज् दिले असतील तर तुम्ही खात्री बाळगू शकता की ती बनावट उत्पादने नाहीत.
फ्लिपकार्ट बनावट उत्पादनांना कसे हाताळते?
फ्लिपकार्टने बनावट वस्तू शोधण्यासाठी व त्याची पाळेमुळे खणून काढण्यासाठी अनेक प्रकारचे अंकुश निर्माण केले आहेत. या उपायांचे सामान्यपणे सक्रिय आणि प्रतिक्रियात्मक शोधांमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते, आणि यामध्ये स्वयंचलित व हस्तचलित अडसरांचा समावेश आहे. एक समर्पित गट फ्लिपकार्टवर विकल्या जाणार्या उत्पादनांची विश्वासार्हता सातत्याने पारखून पाहतो आणि अगदी लहानात लहान सूचना/बनावटीविषयीच्या इशाऱ्याकडेही गांभीर्याने पाहिले जाते.
उत्पादन बनावट असल्याचे आढळले तर विक्रेत्याच्या संपूर्ण पोर्टफोलिओसह त्याचे संपूर्ण लिस्टिंग त्वरित काढून टाकले जाते. त्यानंतर प्रकरण अंतर्गत तपासणी विभागाकडे नेले जाते, जिथे विक्रेत्याची चौकशी सुरू होते. जर उत्पादन बनावट असल्याचे आढळले आणि विक्रेता त्याचा प्रचार करण्यात दोषी ठरला तर त्याला/तिला त्वरित ब्लॅकलिस्ट केले जाईल. ब्लॅकलिस्ट केलेल्या विक्रेत्यास भविष्यात कधीही फ्लिपकार्टवर सक्रिय होण्याची परवानगी दिली जाणार नाही.
फ्लिपकार्टच्या बनावट उत्पादनांवर विश्वास ठेवण्यासाठी आणखी एक यंत्रणा म्हणजे विक्रेत्याचे (सेलर) क्षमतानिर्देशन (रेटिंग) कार्यतंत्र (मेकॅनिझम) आहे. या प्रक्रियेमध्ये फ्लिपकार्टवरील अनैतिक विक्री शोधण्यासाठी लोकांनी दिलेल्या सूचनांचा (क्राऊडसोर्सड्) उपयोग केला जातो. ग्राहक मूल्यमापन (रेटिंग), रिटर्नस् ची संख्या, आणि विक्रेत्याला किती वेळा रद्द केले आहे (सेलर कॅन्सलेशन्स) यावरून विक्रेत्याची विश्वासार्हता निश्चित करण्यासाठीचा आधार तयार होतो. जर विक्रेता रेटिंग ठरविलेल्या (प्रीसेट) कट-ऑफ मर्यादेच्या बाहेर गेला, तर त्या समस्येवर निशाण लावले जाते आणि तपास केला जातो. तपासादरम्यान, हे विक्रेते दोषी असल्याचे आढळल्यास, त्यांना फ्लिपकार्टवर विक्री करण्यापासून ब्लॅकलिस्ट केले जाते आणि त्यांच्या उत्पादनांचा पोर्टफोलिओ डी-लिस्ट केला जातो.
फ्लिपकार्ट बनावट उत्पादनांना कसे शोधून काढते ते जाणून घ्या सहस्यमय दुकानदारांसह
ढोंगी विक्रेत्याबरोबर काय होते?
फ्लिपकार्टच्या बोर्डवरील सर्व विक्रेत्यांना नोंदणी करून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्रीस सुरूवात करण्यापूर्वी पळवाटा नसलेल्या पडताळणी (व्हेरिफिकेशन) प्रक्रियेमधून जाणे आवश्यक आहे. या प्रक्रियेमध्ये विक्रेत्यांच्या पाश्वभूमीची पध्दतशीर तपासणी, व्यवसाय नोंदणी (रजिस्ट्रेशन) दस्तऐवजीकरण (डॉक्युमेंटेशन), आणि एकापेक्षा अधिक तपासणी चेकपॉईंट्सचा समावेश आहे ज्यात भारतीय कायद्याचे तसेच उद्योग नियम व विनियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
फ्लिपकार्टकडे बनावट उत्पादने बाजारात विकल्या जाणार्या या प्रत्येक घटनांविषयी कोणत्याही प्रकारची सहिष्णुता न दाखविण्याचे (झीरो-टॉलरन्स) धोरण आहे. आमच्या ओळख प्रक्रिया आणि उपाय सुनिश्चित करतात की केवळ सकारात्मक ट्रॅक रेकॉर्ड असलेल्या विक्रेत्यांना फ्लिपकार्टवर व्यवसाय करण्याची परवानगी आहे. बनावट उत्पादनांचा शोध घेणारा गटदेखील नकली उत्पादनांच्या घटनांची दखल घेण्यासाठी व नियमितपणे त्या सौम्य होत आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी सतत याद्यांचे सर्वेक्षण करतो.
बनावट उत्पादनांच्या विक्रेत्यांचे काय होते? शोधून काढा
फ्लिपकार्टवर सुरक्षितपणे आणि आनंदाने खरेदी करण्यासाठी तुम्हाला शिक्षित करणे हा या लेखाचा उद्देश आहे
…
फ्लिपकार्ट गोष्टींसाठी के. एन. बलराज यांनी काढलेले कार्टून