फ्लिपकार्टच्या बनावट नोकर्‍या आणि नोकरी देणार्‍या तोतया एजंट्सपासून सावध राहा.

Read this article in English | हिन्दी | ಕನ್ನಡ | বাংলা | தமிழ் | ગુજરાતી

तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्यापैकी कोणाला पैशांच्या मोबदल्यात फ्लिपकार्टवर नोकरी देण्याचे आश्वासन देणारा ई-मेल अथवा SMS आला आहे का ? फ्लिपपकार्टमधील नोकरीच्या बनावट ऑफर्स आणि फसवे भरती एजंट्स यांकडून फसविले जाऊ नका. तुम्हाला अशा प्रकारचे संदेश (मेसेजेस) आल्यास काय करावे ते येथे सांगितले आहे.

Fake Jobs

तुम्हाला एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून किंवा नोकरी देणारा एजंट असल्याचा दावा करणार्‍या व्यक्तीकडून फ्लिपकार्ट किंवा ईकार्ट लॉजिस्टिक्स, जीव्ह्ज्-F1, मिन्त्रा, जबॉन्ग, फोनपे अथवा 2GUD या फ्लिपकार्ट ग्रुप कंपन्यांपैकी एखाद्या कंपनीमध्ये नोकरी किंवा पद असल्याचा ई-मेल किंवा SMS आला आहे का ? तुम्ही एकटे नाही आहात. फ्लिपकार्टच्या बनावट नोकर्‍यांपासून सावध राहा!

फ्लिपकार्टमधील रोजगाराच्या संधी खूप आकर्षक आहेत आणि त्यांना खूप मागणी पण आहे, परंतु या संधीविषयीची माहिती कोणत्याही रिसेलर्स किंवा एजंटस्कडे कधीच दिली जात नाही. अशा ई-मेल्सना उत्तर देण्यापूर्वी किंवा SMS नमूद केलेल्या फोन क्रमांकावर फोन करण्यापूर्वी एक खबरदारीचा संदेश : असे अजिबात करू नका. फ्लिपकार्टच्या नोकर्‍या (किंवा फ्लिपकार्ट ग्रुपच्या कोणत्याही कंपनीमधील नोकर्‍या) या विक्रीसाठी नाहीत. पुन्हा एकदा लक्षात घ्या की फ्लिपकार्टच्या नोकर्‍या विक्रीसाठी नाहीत. अशा फसवणूक करणार्‍या लोकांकडून फसविले जाऊ नका. ते नोकरी घोटाळ्यांचा प्रसार करून बेकायदेशीरपणे नफा कमाविणारे तोतये आहेत. बहुतेककरून, पैशाच्या मोबदल्यात नोकरीच्या ऑफर्स देणार्‍या अशा फसव्या व्यक्ती किंवा संस्था ह्या फ्लिपकार्टद्वारे अधिकृत केलेल्या नाहीत. तुमची दिशाभूल करणार्‍या अशा संदेशां(मेसेजेस)पासून दूर राहाण्याचा सल्ला तुम्हाला देण्यात आहे आणि अशा घोटाळेबाजांकडून सहजरित्या फसण्याची शक्यता असलेल्या नोकरीसाठी इच्छुक अशा सर्वांना सतर्क करा अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.

Don't be fooled by Fake Flipkart jobs

तुम्हाला फ्लिपकार्टच्या बनावट नोकर्‍यांकरिता ऑफर्स आल्या आहेत का ? फसविले जाऊ नका

तुम्ही नक्कीच व्हिसा घोटाळे, पासपोर्ट घोटाळे आणि नोकरीचे घोटाळे यांविषयी ऐकले असेल. अशाच प्रकारचा फ्लिपकार्टमध्ये नोकरी देण्यासाठी केला गेलेला घोटाळा आमच्या लक्षात आणून देण्यात आला आहे. आमच्या निदर्शनास आले आहे की सद्सद्वि‍वेक बुद्धीला धरून न वागणारे काही तोतये फ्लिपकार्ट किंवा त्यांच्या ग्रुप कंपन्यांचे (ईकार्ट लॉजिस्टिक्स, जिव्हज्-F1, मिन्त्रा, जबॉन्ग, फोनपे आणि 2GUD.com यासह) कर्मचारी किंवा प्रतिनिधी आहोत अशी बतावणी करून बनावट नोकर्‍यांच्या जाहिराती व ऑफर्स देऊन जनतेची दिशाभूल व फसवणूक करीत आहेत. याशिवाय, आम्हाला असे कळविण्यात आले आहे की अशा व्यक्ती किंवा एजन्सीज् फ्लिपकार्ट किंवा त्‍यांच्या ग्रुप कंपन्यांमध्ये नोकरीचे आश्वासन देऊन संभाव्य नोकरी शोधकर्त्यांकडून पैशांची मागणी करीत आहेत.

तुम्ही किंवा तुमच्या ओळखीच्या कोणासही जर अशा प्रकारचा SMS, ई-मेल आला असल्यास अथवा अन्य कोणत्याही माध्यमाद्वारे त्यांच्याशी संपर्क साधला गेला असल्यास किंवा तुम्हाला प्रिंट मीडिया, ऑनलाइन मीडिया तसेच सोशल मीडियायांच्या माध्यमातून कोणतीही पत्रके, सूचना, जाहिराती दाखविल्या गेल्या असतील तर त्यावर तुम्ही अजिबात विश्वास ठेवू नका किंवा त्यास प्रतिसाद देऊ नका असा सल्ला आम्ही तुम्हाला देत आहोत व सतर्क करीत आहोत.

फ्लिपकार्ट मुद्दाम स्पष्टपणे सांगू इच्छिते की अशा बेकायदेशीर व फसव्या कामांमध्ये गुंतलेल्या व्यक्तींशी अथवा संस्थांशी त्याचा कोणताही संबंध नाही. आम्ही आमच्या ग्राहकांना, संभाव्य नोकरी शोधणार्‍यांना व सर्वसामान्य जनतेला असे मेसेजेस व जाहिराती यापासून दक्ष राहण्याचा आणि सावधगिरी बाळगून त्यांना शंकास्पद आणि संशयित नजरेने पाहावे असा सतर्कतेचा इशारा देत आहोत. याशिवाय, अशा घोटाळेबाज व्यक्ती किंवा संस्थांविरुध्द फ्लिपकार्टचे नाव व प्रतिष्ठा कलंकित करण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली फ्लिपकार्ट कायदेशीर कारवाई सुरू करण्याचाही विचार करू शकते.

फ्लिपकार्ट कोणत्याही व्यक्ती किंवा नोकरभरती करणार्‍्या एजन्सीज यांना फ्लिपकार्टमध्ये नोकरी देण्यासाठी उमेदवारांकडून पैसे गोळा करण्याचा अधिकार देत नाही आणि असे यापूर्वी कधीही केले नव्हते. फ्लिपकार्टच्या बनावट नोकर्‍यांसाठी केलेल्या जाहिरातींचा या व्यक्ती अथवा गट/संस्थांद्वारे फसवेगिरीच्या उद्देशाने आणि गुप्त हेतूने प्रसार केला जातो अशी धोक्याची सूचना आम्ही देत आहोत. अशा व्यक्ती आणि संस्था चुकीच्या पध्दतीने फायदा प्राप्त करण्यासाठी दुर्बल व कमकुवत लोकांचा अप्रामाणिक हेतूने वापर करण्याची शक्यता असते. आपले पैसे, कागदपत्रे आणि वैयक्तिक व आर्थिक नोंदी त्यांच्या हातात पडल्यास अत्याधिक धोका संभवतो.

Fake Flipkart jobs - be cautious

जर तुम्हाला फ्लिपकार्टच्या बनावट नोकर्‍या देऊ केल्या तर तुम्ही काय केले पाहिजे?

सर्व प्रथम, तुम्हाला आलेला मेसेज किंवा तुम्ही पाहात असलेले संकेतस्थळ हे खरे आहे की बनावट हे पडताळून पाहा. तुम्हाला आलेला ई-मेल किंवा एसएमएस हा अधिकृत flipkart.com या अकाउंटवरून पाठविण्यात आला आहे किंवा फ्लिपकार्टच्यावतीने एखाद्या कंपनीला नोकरी देण्यासाठीचे कंत्राट देण्यात आले आहे ? फ्लिपकार्टच्या नोकर्‍या या केवळ विश्वासार्ह आणि विश्वसनीय करियर साइट्सवरच पोस्ट केल्या जातात. त्यांची यादी यावरही मिळू शकते flipkartcareers.com आणि करिताचे फेसबुक पेज फ्लिपकार्टवर काम करण्यासाठी.

जर तुमचा प्रोफाइल उपलब्ध नोकरीशी जुळत असेलतर फ्लिपकार्टचे अधिकृत रिक्रूटमेंट पार्टनर्स (नोकरभरती भागीदार) तुमच्याशी संपर्क साधू शकतात, पण ते नेहमीच तुम्हाला कामाचे स्वरूप सांगतील. याशिवाय, फिल्पकार्टचे अधिकृत नोकरभरती एजंट्स नोकरी शोधणार्‍यांकडून किंवा अर्जदारांकडून पैशांची मागणी करीत नाहीत हे लक्षात घ्या. जर एखाद्या भरती करणार्‍या कंपनीने तुमच्याकडून पैशांची मागणी केली तर कृपया आम्हाला त्या प्रकरणाची माहिती त्वरित आमच्याग्राहक सेवा चॅनल्सना. किंवा आमच्या @workatflipkart या ट्विटर अकाउंटवर द्या.

फ्लिपकार्टचे रिक्रूटर्स (नोकरभरती करणारे) फ्लिपकार्टच्या ग्रुप कंपन्यांमध्ये नोकरीसाठीच्या जाहिरातींचे अनाहूत मेसेजेस पाठवित नाहीत. त्याहीपेक्षा महत्त्वाचे हे की नोकर्‍यांसाठी ते पैसे किंवा इतर कोणत्याही प्रकारचे पेमेंट घेत नाहीत. फ्लिपकार्टमधील सर्व नोकर्‍या या गुणवत्तेवर मिळतात.

तुम्हाला आलेला मेसेज हा जर संशयास्पद आहे असे वाटल्यास कृपया ते त्वरित आमच्या निदर्शनास आणून द्या. फ्लिपकार्टच्या बनावट नोकर्‍यांमुळे फसवले जाऊ नका. लक्षात ठेवा, फ्लिपकार्ट आणि फ्लिपकार्टच्या ग्रुप कंपन्यांमध्ये नोकर्‍यांना मागणी असते, पण त्या केवळ गुणवत्तेवर मिळतात. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये नेहमीच शंभराच्या वर नवनवीन प्रॉडक्ट्स असतात, परंतु नोकर्‍या त्यापैकी कधीही नसतात !


ग्राहकाला अधिक प्रशिक्षणासाठी वाचा आमचे लेख आमच्या सुरक्षित खरेदीविभागामध्ये

Enjoy shopping on Flipkart