फॅशन पॉवरहाऊस ब्रँड तयार करणाऱ्या या फ्लिपकार्ट विक्रेतीसाठी शब्द आहे #Sellfmade – Mom

Read this article in English | ಕನ್ನಡ | বাংলা

आपल्या मुलांना आनंदी आणि यशस्वी पाहणे हे आईचे स्वप्न असते. फ्लिपकार्ट विक्रेता शिबाजी सरकारच्या आईचेही हेच स्वप्न आहे. त्याच्या आईने त्याला प्रोत्साहन दिल्याने, शिबाजीने भारताला त्याची सृनशील बाजू दाखवली आणि एक ब्रँड तयार केला जो त्याच्या शैलीचा प्रतिध्वनी आहे. #Sellfmade फ्लिपकार्ट विक्रेता म्हणून त्याच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल सर्व वाचा.

designs

मानाव आहे शिबाजी सरकार. मी फ्लिपकार्टवर लहान मुलांचे कपडे विकणारा ब्रँड कारिगरी डिझाइन चा मालक आहे आणि मला याचा अभिमान आहे. मी फॅशन डिझायनर म्हणून पदवी प्राप्त केली आणि एका खाजगी फर्ममध्ये अनेक वर्षे काम केले. माझे नियोक्ते माझी डिझाइन्स त्यांच्या ब्रँडच्या नावाने विकत होते आणि मला ते बदलायचे होते. त्यामुळे खूप उशीर होण्याआधी मी फ्लिपकार्ट विक्रेता झालो.

मला माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता तेव्हा मला फ्लिपकार्टबद्दल कळले. मला वाटले की यामुळे मला ग्राहकांमधील ट्रेंड समजून घेण्यास आणि चालणारी डिझाइन्स पाहण्यास मदत होईल. माझ्यासाठी माझ्या डिझाइन्सइतकेच सृजनशील होण्याची आणि त्यांना खऱ्याअर्थी एक स्वतंत्र ओळख देण्याची ही एक संधी होती. माझी सृजनशीलतेची शैली एक ब्रँड बनावी अशी माझी इच्छा होती आणि फ्लिपकार्टने त्यासाठी एक परिपूर्ण व्यासपीठ म्हणून खरोखरच पाऊल उचलले आहे.

माझ्या व्यवसाय वाढीमध्ये फ्लिपकार्टचे मोठे योगदान आहे. फ्लिपकार्टवरील माझे अकाउंट मॅनेजर्स हे एक अद्भुत आधारस्तंभ आहेत. मला माझ्या उद्दिष्टांची आखणी करण्यात मदत करण्यापासून ते नवीनतम विक्री धोरणांविषयी मला ताजी माहिती देण्यापर्यंत आणि फ्लिपकार्ट जाहिरातींसारखी साधने ज्यांचा वापर मी माझा ब्रँड नेहमीपेक्षा मोठा बनवण्यासाठी करू शकेन – फ्लिपकार्टकडून मला नेहमीच मदतीचा हात मिळतो! फ्लिपकार्टने मला फ्लेक्सी-लोनमध्ये मदत केली आणि उद्योजक म्हणून माझ्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये मला पाठिंबा दिला. जेव्हा मी फ्लिपकार्टवर विक्री सुरू केली, तेव्हा माझ्या डिझाइन्सचे ग्राहकांनी कौतुक केले आणि माझी भरपूर विक्री झाली. मी कांस्य विक्रेता म्हणून सुरुवात केली. आज, मी एक रूपेरी विक्रेता आहे आणि याचे सर्व श्रेय माझ्या अकाउंट मॅनेजरचे आहे!

मी तीन ते चार शिलाई मशीन घेऊन माझा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला मला रोज पाच ते दहा ऑर्डर मिळत असत आणि आज मला रोज 1500 ते 2000 ऑर्डर मिळतात! मी माझ्या उत्पादनांचा एकमेव निर्माता आणि डिझायनर आहे. मी माझ्या कपड्यांवरील डिझाइन्समध्ये सुधारणा करत राहतो. आज माझा स्वतंत्र व्यवसाय आहे आणि मला मासिक पगारावर अवलंबून राहण्याची गरज नाही. मला खूप अभिमान वाटतो की माझ्या व्यवसायातून मी अनेक कुटुंबांना आधार देतो. माझ्या प्रत्येक कर्मचारी सदस्य डिझाइन्सवर काम करतो. ते याकडे त्यांचा स्वतःचा व्यवसाय म्हणून पाहतात. खाजगी नोकऱ्यांमध्ये हे कधीच होत नाही.

2019 मध्ये, द बिग बिलियन डेज सेल दरम्यान, आमची विक्रीसंख्या शिखरावर होती. आम्हाला दररोज सुमारे 5,000 ऑर्डर्स मिळत होत्या आणि त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्हाला अहोरात्र काम करावे लागले. हा एक कठीण अनुभव होता पण आमच्या डिझाइन्ससाठी प्रचंड मागणी येताना पाहून आम्हाला खूप छान वाटले. 2020 हे महामारीमुळे फारसे चांगले गेले नाही आणि आम्ही अजूनही नवीन सामान्य परिस्थितीशी जुळवून घेत होतो. पण यावर्षी, आम्ही तयार आहोत आणि पुढे जाण्याच्या तयारीत आहोत! मी नवीन डिझाइन्स सादर करत आहे आणि मी मालाचा साठा करण्याचे सुनिश्चित केले आहे. माझी उत्पादने नेहमी स्टॉकमध्ये असतील याची मी खात्री करेन. सेलच्या काळात फ्लिपकार्टच्या जाहिरातींमध्ये गुंतवणूक केली जाईल हे देखील मी सुनिश्चित करतो. या वर्षी आम्ही दररोज 7,000 – 8,000 ऑर्डरची अपेक्षा करत आहोत. मी आवश्यक असलेल्या सर्व सामग्रीची व्यवस्था आधीच केली आहे आणि आज माझ्याकडे 77 मशीन चालू आहेत. फ्लिपकार्ट मार्केटप्लेस वरील व्हिडिओ आणि माहितीपूर्ण लेखांनीदेखील मला ऑनलाइन विक्रीबद्दल माझे ज्ञान वाढवण्यासाठी मदत केली आहे.

मी माझ्या यशाला आकार देत आहे हे माझ्या कुटुंबाला आवडत आहे आणि माझ्या आईने मला खूप मदत केली आहे. ती माझ्या यशाचा आधारस्तंभ आहे, मला तिच्याकडून मिळणारा पाठिंबा अफाट आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी माझ्या कुटुंबाकडून मला खूप आर्थिक मदत मिळाली. आता आमच्या ब्रँडला भारतातील नंबर 1 अॅपरल ब्रँड बनवण्याचे माझ्या आईचे स्वप्न आहे. द बिग बिलियन डेज 2021 मध्ये आपण किती चांगले काम करतो हे पाहण्यासाठी आम्ही अधीर झालेले आहोत! आम्ही उत्साहित आहोत आणि त्याची आतुरतेने वाट पाहत आहोत.

राहुल गुप्ता रॉय यांनी जोडलेल्या जास्तीच्या मुद्द्यांसह, जिष्णू मुरलीला सांगितल्याप्रमाणे.

Enjoy shopping on Flipkart