प्रत्येक बिग बिलियन डेजमध्ये 5X वाढ: फ्लिपकार्ट विक्रेता विवेक मालवीयाचा रोमांचक प्रवास

Read this article in English | ಕನ್ನಡ | বাংলা

22 व्या वर्षी विवेक मालवीय आपल्या स्वप्नांना संधी देण्यासाठी मुंबईहून राजकोट, गुजरात येथे शिफ्ट झाला. एकदा तो फ्लिपकार्ट विक्रेता झाला आणि द बिग बिलियन डेज सेल्समध्ये भाग घेतला, त्याला ई-कॉमर्स आणि फ्लिपकार्टच्या संपूर्ण भारतातील व्याप्तीची खरी क्षमता समजली. त्याच्या किचनवेअर कंपनीच्या दरवर्षी होणाऱ्या 5X प्रगती साक्षीदार ठरण्याव्यतिरिक्त, त्याने कल्पनाही केली नव्हती अशाप्रकारचा बदल त्याला त्याच्या आयुष्यात करणे शक्य झाले. त्याची #SellfMade कथा वाचा.

हसा ही मुंबई, स्वप्नांचे शहर, जे देशभरातल्या धडपड्या माणसांना यशस्वी होण्याची आशा घेऊन आपल्या किनाऱ्यावर येऊन धडकण्यास उद्युक्त करते. विवेक राघवभाई मालवीय याची कथा मात्र वेगळी आहे. “मी मुंबईहून राजकोटला फ्लिपकार्टसाठी गेलो,” तो हसत सांगतो. मूळचा मुंबईचा रहिवासी असलेल्या विवेकने चार्टर्ड अकाउंटंटची नोकरी सोडली आणि तो प्लॅस्टिक आणि काचेच्या किचनवेअरचा फ्लिपकार्ट विक्रेता बनला.

सुरुवातीला, त्याने गुजरातमधील राजकोटमध्ये त्याच्या आतेभावाबरोबर काम सुरू केले आणि अखेरीस 2017 मध्ये त्याने त्याची स्वतंत्र कंपनी स्थापन केली. इथेच विवेकने अनेक उत्पादनांसाठी फ्लिपकार्टशी भागीदारी केली, जसे ऑइल डिस्पेन्सर्स, पाण्याच्या बाटल्या, जार आणि बरेच काही.

द बिग बिलियन डेज 2021 साठी त्याची तयारी सुरू असताना त्याची अनोखी कथा जाणून घेण्यासाठी वाचा.

एक ठिणगी जी पसरली

विवेकने कॉलेजचे तिसरे वर्ष पूर्ण केले होते आणि नुकतेच चार्टर्ड अकाऊंटन्सी प्रॅक्टिससाठी काम सुरू केले होते, जेव्हा त्याला स्वतः उद्योजक बनण्याचे स्वप्न पाहीले. किरकोळ किंवा ऑफलाइन व्यवसायाऐवजी, ई-कॉमर्सकडेच त्याचा रोख होता. “ऑफलाइन सेटअपमध्ये, कुठलाही ग्राहक माझ्याकडे येईल की नाही आणि आम्ही विकत असलेली कुठली उत्पादने खरेदी करेल की नाही त्याला मर्यादा आहे. आणि ऑनलाइन व्यवसायांत, मला ग्राहकांना शोधायला बाहेर जाण्याची गरज नाही. ग्राहक उत्पादन शोधू शकतात आणि ऑनलाइन जाहिरातीद्वारे थेट उत्पादनांपर्यंत आणि आमच्यापर्यंत पोहोचू शकतात!” तो म्हणतो.
जेव्हा 2017 मध्ये संधीने दार ठोठावले, तेव्हा विवेकने संकोच केला नाही. त्याच्या आतेभावाला स्टार्टअपमध्ये मदत करण्यासाठी कोणीतरी हवे होते आणि जेव्हा विवेकला समजले की राजकोट हे सर्व स्वयंपाकघरातील वस्तूंचे केंद्र आहे, तेव्हा त्याने हे पाऊल उचलले. “मुंबईत राहिल्याने माझ्या वाहतूक आणि टपाल खर्चात वाढ होईल हे मला माहीत होते, म्हणून मी गुजरातला रहायला गेलो.”
सहा महिन्यांनंतर, विवेकने स्वतःचा उद्योग सुरू केला, तेव्हा त्याने अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आपले नशीब आजमावले. जाहिरातींपासून लिस्टिंगपर्यंत, गोदामांपासून ते विक्रेता पोर्टलचे व्यवस्थापन करण्यापर्यंत, हे सोपे नव्हते आणि बरेच काही शिकण्यासारखे होते. पण विवेकला हे माहीत होते की ही ऑनलाइन विक्री आहे जी त्याला हव्या असलेल्या बाजाराचा वाटा मिळवण्यास मदत करेल.

फ्लिपकार्टच्या लाभांना चालना

फ्लिपकार्ट विक्रेता म्हणून नोंदणी केल्याने विवेकला हवी होती तशी संपर्क सुविधा आणि विविध प्रकारची साधने असणारी इकोसिस्टिम अगदी हाताशी उपलब्ध आहे. फ्लिपकार्टची वेबिनार्स व व्हिडिओ आणि अकाउंट मॅनेजर्सच्या मदतीने विवेकने कांस्य ते रौप्य आणि आता सुवर्ण यादीपर्यंत प्रगती केली. एकदा एक प्लॅटफॉर्म म्हणून फ्लिपकार्ट कसे आहे ते विवेकला स्पष्टपणे समजले, तेव्हा मागे वळून पाहण्याची गरज नव्हती. त्याच्या पहिल्या बिग बिलियन दिवसांच्या विक्रीदरम्यान त्याच्या यशाने पहिला टप्पा गाठला.
“मला अजूनही 2017 मधील माझा पहिला टीबीबीडी आठवतो. मी जितक्या संख्येने ऑर्डर्सचे काम केले ते मला अपेक्षित नव्हते! आणि सलगपणे येणाऱ्या दरवर्षी, 2017 ते 2020 पर्यंत, दरवर्षी 5X प्रगती मी साध्य केली आणि सेलमध्ये येणाऱ्या ऑर्डर्स प्रचंड प्रमाणात वाढल्या. यावर्षी, द बिग बिलियन डेज 2021 साठी, मला दररोज 5,000 ऑर्डर वितरीत करायच्या आहेत.

कृतीमुळे साध्य झालेले नशीब, सहजसंधीमुळे नाही

flipkart seller

विवेकच्या यशासाठी कठोर परिश्रम हा एक आवश्यक घटक असताना, त्याने स्मार्ट चालीही केल्या ज्यामुळे त्याला त्याचा ऑनलाइन व्यवसाय वाढण्यास मदत झाली. 600 चौरस फूटच्या गोदामातून 1500 चौरस फुटाच्या गोदामापर्यंत पोहोचणे खूप अवघड होते. ऑर्डर्स लवकर पाठवण्यासाठी साठवणुकीची जागा मोठी करण्याव्यतिरिक्त, त्याच्या तयारीमध्ये दक्षिणेकडील शहरांमध्ये लक्ष्यबद्ध जाहिराती करण्याच्या कृतीचाही समावेश आहे, जिथे त्याला वाढीची अधिक शक्यता दिसते.

आज, येणाऱ्या टीबीबीडीसाठी तयारी करत असताना, विवेकने स्वतःला फ्लिपकार्ट विक्रेता होण्यासाठी समर्पित केले आहे, आणि इतर बहुतेक ऑनलाइन प्लॅटफॉर्मपासून स्वतःला दूर ठेवले आहे. त्याची कारणे सोपी आहेत. “वेळेत पेमेंट, नियमित अपडेट्स, एक सोपा आणि सुलभ विक्रेता प्लॅटफॉर्म, आणि अकाउंट मॅनेजर्स जे वेळेवर माहिती देतात त्यांची मदत, या गोष्टी फ्लिपकार्टला इतरांपेक्षा वेगळं ठरवतात म्हणूनच, फ्लिपकार्टच्या माध्यमातून, मी कुठल्याही सर्वसाधारण दिवशी सुमारे 500 ऑर्डरवर प्रक्रिया करण्यास सक्षम ठरतो. ”

या #SellfMade फ्लिपकार्ट विक्रेत्याने, त्याच्या स्वप्नांसाठीची संधी घेतली तेव्हा त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले.

“फ्लिपकार्टकडे येण्यापूर्वी, मी एक सर्वसाधारण काम करत होतो आणि भाड्याने राहत होतो. तीन वर्षे इथे काम केल्यावर, मी आता राजकोटमध्ये 2 बिएचके फ्लॅटचा मालक आहे आणि अलीकडेच एक कार खरेदी केली आहे. मी माझ्या भावाबरोबर संस्थेची सुरुवात केली आणि आता आम्ही 5 कर्मचारी ठेवण्याइतकी प्रगती केली आहे. गोष्टी चांगल्या चालू आहेत आणि मी या टीबीबीडीच्या काळात माझे लक्ष्य साध्य करण्यासाठी उत्सुक आहे! ” विवेक म्हणतो.

अशा आणखी #Sellfmade stories वाचा इथे.

Enjoy shopping on Flipkart