#सेल्फमेड – हा फ्लिपकार्ट विक्रेता पेट च्या मालकांना मदत करतो. कोविड-१९ मध्ये “paw-sitive” राहतो!

Read this article in हिन्दी | English | বাংলা | தமிழ் | ಕನ್ನಡ | ગુજરાતી | తెలుగు

जेव्हा लॉकडाऊनमध्ये आपल्यातील बहुतांश लोकांना ग्रॉसरी आणि इतर वस्तू मिळणे अवघड झाले होते तेव्हा संपूर्ण भारतातील पेट ओनर्स पेट-फूडसाठी सोर्स श्धाण्याचे जास्तीचे ओझे वाहात होते. फुडी पपीज ग्रूप, एक छोटीशी कंपनी, बहुतेक वेळा ऑनलाईन ऑन फ्लिपकार्ट online on Flipkart, त्यांनी आपले उद्दिष्ट ठरविले की पेट ओनर्सना जे हवे ते सर्व पुरविण्याची खात्री देणे. त्यामुळे त्यांचे लाडके पेट्स आनंदात आणि हेल्थी राहतील. त्यांची गोष्ट वाचा.

pet supplies

जेव्हा कोविड-१९ या जागतिक महामारीमुळे लॉकडाऊन सुरु होता तेव्हा अनेकांना त्यांच्या घरातून बाहेर पाउल टाकणे, ग्रोसरी आणि इतर आवश्यक वस्तू विकत आणणे अवघड किंवा अशक्य झाले होते. त्यातील क्वारंटाइन लोकांमध्ये पेट ओनर्स, आणि नकळत त्यांचे पेट्ससुध्दा क्वारंटाइन झाले होते. अशा अनेक वस्तीतील् व सभोवतालची पेट शॉप्स चे मालक सुध्दा भयानक करोना वायरसचा संसर्ग पसरू नये म्हणून दरवाजे बंद करून बसले होते. पण फुडी पापीज ग्रूप, एक छोटी पेट्सना आवश्यक वस्तू ऑनलाईन सेल करणारी कंपनी पेट ओनर्सना दिलासा देत होती की त्यांचे पेट्स खात्रीने निरोगी आणि चांगले राहतील. ही त्यांची गोष्ट आहे.

“माझे नाव अंकित पाहुजा. मला प्राणी, पक्षी आणि मासे खरेच आवडतात. मी जेथे असेन तेथे त्यांच्यासाठी पाणी आणि अन्न ठेवतो. त्यांच्यावरील माझ्या प्रेमाने एका उपक्रमाने जन्म घेतला. साडेचार वर्षांपूर्वी मला पेट ओनर्सना ऑनलाईन पेट सप्लाईज विकण्याची कल्पना मला आली.

मी माझ्या कल्पनेची शक्याशक्यता माझ्या बिझनेस पार्टनर्सशी बोललो, सिद्धार्थ गुलाटी आणि वरुण क्लारा, आणि झालो #सेल्फमेड फ्लिपकार्ट विक्रेते. मी पेट फूड आणि उपकरणे विकू लागलो. आता, 95% बिझनेस ऑनलाईन सेलिंग मॉडेलशी अॅडजस्टेड आहे.

या लॉकडाऊन काळात आम्हाला साहजिकच नेहमीपेक्षा जास्त ऑर्डर्स मिळाल्या. आम्हाला फक्त याची खात्री करायची होती की पेट ओनर्सना त्यांच्या पेट्सची काळजी घेण्यात काही अडचण येऊ नये. म्हणून आम्ही या सप्लाईजच्या किमती त्याच ठेवण्याची खबरदारी घेतली. या परिस्थितीत आम्ही प्रॉफिटचा विचार करीत नव्हतो.

आम्ही आमचे स्टॉक्स कमी न होण्याची काळजी घेतली. परंतु मालाच्या मागणीने उसळी घेतल्याने आमचे ५० टक्के स्टॉक्स संपून गेले. आमच्यापासून जवळ असलेल्या लोकॅलीटीतील विक्र्त्यांकडून माल घेण्यावर काम करीत आहोत. आम्ही प्रेडीग्री सारखे काही इम्पोराटेड प्रोडक्ट्स. विक्रेते आम्हाला जास्ती चार्ज करीत आहेत. आम्ही आशा करतो आहोत की ही परिस्थिती लवकरच बदलेल.

या महामारीच्या काळात आम्ही सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येक गोष्टीची आम्ही काळजी घेत आहोत. त्याच वेळी आम्ही आमचे ग्राहक आणि त्यांचे पेट्स सुरक्षित ठेवण्याची काळजी घेत होतो. आम्ही सॅनिटायझर्स वापरतो आणि आमचे कामाचे ठिकाण प्रत्येक दोन तासांनी सॅनिटायझड करतो. आमच्या प्रवेशद्वारावर आम्ही सॅनिटायझर व साबणाचे डिस्पेन्सार्स ठेवलेले आहेत. आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला इन्फ्रारेड थर्मामीटरने तपमान चेक मधून जावे लागते. मास्क वापरणे बंधनकारक आहे आणि ते घातल्याशिवाय कोणालाही आमच्या आवारात प्रवेश दिला जात नाही. आमच्या एम्प्लॉइजना आम्ही आमच्या गाडीने कामाच्या जागी आणतो.

जेव्हा प्रथम लॉकडाऊन सुरु झाला तेव्हा आमची कामे चालू ठेवणे खूप अवघड झाले होते. फ्लिपकार्टच्या च्या मदतीने आम्हाला जिल्हा कलेक्टरकडून परवानगीचे प्रमाणपत्र व आमचा बिझनेस सुरु ठेवण्यास मंजुरी मिळाली.

दि. २२ मार्च ते १० एप्रिल आमचे काम पूर्णपणे बंद होते. पण फ्लिपकार्ट मधील आमच्या अकौंट मॅनेजरनी या कोविड-१९ महामारीत आम्हाला खूप मदत केली. ती आम्हाला कोणते प्रोडक्ट्स लाइव्ह जाऊ शकतात त्याबाबत अपडेट करीत राहिली व आम्ही त्याप्रमाणे आमचे लिस्टिंग त्याप्रमाणे करीत राहिलो. फ्लिपकार्टने आमचे पेमेंट एक दिवसाआड मिळत राहील याची काळजी घेतली.

जेव्हा तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करतां, तेव्हा प्रोडक्ट्स थेट तुमच्या दरवाजाशी येतात. यात कोठेही तुमच्या संपर्कात कोणी येत नसल्याने इन्फेक्शनचा धोका नसतो आणि सोशल डिस्टन्सिंग पाळले जाते. इ-कॉमर्स हे या परिस्थितीत खरोखरच खूप मदत करते आहे. तेव्हा कृपया तुम्ही घराच्या बाहेर पडू नका. तुमची काळजी घ्या आणि हेल्थी रहा.”

पेट्स आपले प्रेमाचे मैत्रीचे स्थान आहेच आणि त्याशिवाय ते आपला स्ट्रेस आणि भीती कमी करते. ते आपले साथीदार बनते. माया लावते. सुरक्षा देते आणि त्यांच्या मालकाशी अतूट नाते जोडते. म्हणून अंकित आणि त्याचे पार्टनर्स सिद्धार्थ, आणि वरूण सारखे पेट्सचे फूड ऑनलाईन विक्रेते आपण खात्री देऊ शकतो की आपल्या देशातील पाळीव प्राण्याचे मालकसुध्दा या धकाधकीच्या जागतिक महामारीत त्यांच्या घरात आरामात राहू शकतात कारण त्यांचे पेट्स त्याच्या बाजूला आराम करीत असतात आणि क्वालिटी प्रोडक्ट्स परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध आहेत.

जसे जिष्णू मुरलीला सांगितले आणि पल्लवी सुधाकर कडून मिळालेल्या अधिक इनपुट प्रमाणे.

Enjoy shopping on Flipkart