1. Home
  2. Marathi
  3. पानिपतमधील फ्लिपकार्ट विक्रेत्याला कसे यश आले आणि त्याने भारतीय ग्राहकांसाठी मूल्य कसे निर्माण केले.

पानिपतमधील फ्लिपकार्ट विक्रेत्याला कसे यश आले आणि त्याने भारतीय ग्राहकांसाठी मूल्य कसे निर्माण केले.

0
Read this article in English | বাংলা | ગુજરાતી | हिन्दी | ಕನ್ನಡ

साथीच्या आजाराच्या काळात अधिक ग्राहक ई-कॉमर्सकडे वळले असल्याने ऑनलाइन विक्रेत्यांनी मागणी पूर्ण करण्याच्या बाबतीत कोणतीही कसर सोडली नाही. पूर्व नियोजन आणि यशस्वी होण्याचा निर्धार करणारा संकल्प, # सेल्फफ्रेड फ्लिपकार्ट विक्रेता पुनीत जैन यांनी बिग बिलियन डेज 2020 च्या विक्रीदरम्यान केवळ नवीन उदाहरणच घालून दिले नाही, तर त्यांचे कर्मचारी आणि पुरवठादारांना लाभकारक पद्धतीने कामात गुंतवून ठेवले. पानिपतमधील या उद्योजकाने यश मिळविण्याचे हे प्रयत्न कसे वाढविले ते वाचा.

पानिपतमधील फ्लिपकार्ट विक्रेत्याला कसे यश आले आणि त्याने भारतीय ग्राहकांसाठी मूल्य कसे निर्माण केले.
0

या कथेतः #सेल्फमेड फ्लिपकार्ट विक्रेता पुनीत जैन यांनी बिग बिलियन डेज 2020 सेलच्या काळातील सर्वोत्कृष्ट कामगिरीमागील रहस्य उलगडले आहे.


माझे नाव पुनीत जैन आहे आणि मी हरियाणाच्या पानिपतचा आहे. मी 2012 मध्ये उद्योजक म्हणून माझा प्रवास सुरू केला, त्यापूर्वी मी नियमित नोकरी करत होतो. मी ऑनलाइन विक्रीतील संभाव्य यश पाहिले आणि माझ्या अनुभवातून मला दिसले की येत्या दशकात त्यात फक्त वृद्धीच होणार आहे. या डोमेनमध्ये मी माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात होतो याविषयी माझ्या कुटुंबाला आश्चर्य वाटले नाही.

पानिपत हे होम फर्निशिंग्जच्या उत्पादकांचे एक प्रसिद्ध केंद्र आहे. थोड्याफार संशोधनात, मला आढळले की घरगुती सामानाच्या परवडणार्‍या विभागातील एक स्थान मला प्राप्त करणे शक्य होते, जिथे तोपर्यंत केवळ वैशिष्ट्यपूर्ण प्रिमियम प्राइस टॅग्जचा समावेश होता.

मी बेडशीट आणि पडदे यांच्यासह विविध प्रकारचे होम फर्निशिंग्ज सादर केले, पुढील ब्रँडनेमसह होम कॅन्डी, आणि फ्लिपकार्टवर
# सेल्फमेड विक्रेता बनण्यापूर्वी विविध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर प्रयोग केले.

फ्लिपकार्टची पोहोच आणि विक्रेता स्रोतांनी ऑन बोर्ड येण्यासाठी माझे मन वळविले आणि आजवरच्या सर्व बिग बिलियन डेज सेल्समध्ये मी भाग घेतला आहे हे सांगताना मला अभिमान वाटतो!

मात्र, बिग बिलियन डे 2020 सेल थोडा वेगळा होता. बिग बिलियन डेज 2020 चा सेल सुरू होणार होता त्या वेळपर्यंत ऑफलाइन विक्रीसुद्धा आता पूर्ववत होऊ लागली होती, त्यामुळे यात मला निश्चितपणे क्षमता दिसली. मला वाटते की साथीच्या आजारामुळे ई-कॉमर्सची व्याप्ती वेगाने वाढली. पुढच्या दशकात, हे एक संपूर्ण नवीन जग असेल जिथे बहुतेक घरांसाठी ऑनलाइन शॉपिंग करणे हे दुसरे स्वरूप असेल. असं म्हटलं जात असताना मी आणि माझ्या टीमने आम्ही आधी न केलेल्या पद्धतीने बिग बिलियन डेज 2020 च्या सेलची तयारी करायला लागलो.

त्यासाठी एकतर, आम्ही आमच्या सर्व कर्मचार्‍यांना मास्क्स वाटून, स्वच्छता करून, शारीरिक अंतर राखून आणि इतर खबरदारी घेत आमच्या गोदामातील सुरक्षिततेकडे लक्ष दिले. आमचे पुरवठादार आणि उत्पादन कर्मचाऱ्यांनीही आमचे समर्थन केले ज्यांनी उत्पादन निर्मितीसाठी बरीच मेहनत घेतली. आमच्याकडे खूप मोठी टीम आहे आणि आम्ही सर्वांनी मिळून खूप कष्ट केले.

दुसरे म्हणजे, बिग बिलियन डे 2020 च्या सेलसाठी नियोजन करण्यात आम्हाला फ्लिपकार्टने पाठिंबा दर्शविला. मी 2020 मध्ये आभासी पद्धतीने आयोजित केलेल्या आणि सूत्रसंचालन केलेल्या बिझिनेस अवर्स इव्हेन्टमध्ये भाग घेतला, ज्याने मला स्पाइक विक्री समजून घेण्यास मदत केली आणि ऑनलाइन शॉपिंगचा अनुभव फोटोंमुळे कसा निर्माण होऊ शकतो किंवा बिघडू शकतो हे समजण्यास मदत केली.

माझ्या अकाउंट मॅनेजरने मला किंमतींविषयीची माहिती दिली, मला इन्व्हेन्टरी ठेवण्याविषयी आणि टार्गेट नंबर्स लक्षात ठेवण्याविषयी सल्ला दिला. फ्लिपकार्टने मला सर्वोत्तम व्यवसायनीती दिली आणि बिग बिलियन डेज 2020 सेल चांगल्या रितीने पार पडला.

खरेतर, मागील वर्षांच्या तुलनेत आम्ही बिग बिलियन डे 2020 सेलदरम्यान सर्वाधिक प्राप्ती केली आहे. हे यश गेल्या काही वर्षांतील मोठ्या शिकवणीतून प्राप्त झाले. यावेळी, आम्ही आणखी चांगल्या नियोजनासह काम केले आणि थोडी जोखीमही घेतली! म्हणूनच आम्हाला चांगले परिणाम प्राप्त झाले.

आमच्याकडे पुरवठा साखळीचाही खूप फायदेशीर अनुभव होता – तिथे आणखी पिन कोड होते जिथे सेवा देणे शक्य होते आणि आमचे पिक-अप्स सुद्धा सहजपणे झाले. साथीच्या काळातही लॉजिस्टिकचे व्यवस्थापन नीट केले गेले!

बिग बिलियन डेज 2020 च्या सेलची तयारी करणे ही एक घटनाच आहे. माझे वेअरहाऊस 24×7 चालू होते. माझ्या कर्मचार्‍यांनी पाळ्यांमध्ये काम केले आणि जबरदस्त प्रयत्न केले ज्यामुळे आम्ही सेलच्या 6 दिवसांच्या आणि सणाच्या काळात सर्व मागण्या पूर्ण करण्यास सक्षम होतो.

आपण सर्वजण कोविड-19 मुळे तात्पुरते अडकलेले होतो तरी, सुदैवाने पानिपतवर फारसा परिणाम झालेला नव्हता. माझ्या कुटुंबानेही योग्य ती खबरदारी घेऊन परत कामावर जाण्यासाठी मला साथ दिली. आता मी पुढील मोठ्या सेलसाठी आधीच नियोजन सुरू केले आहे!


हेही वाचा:एकत्र आल्याने जास्त कणखर – या पती-पत्नीच्या जोडीने साध्य केला फ्लिपकार्ट विक्रेता म्हणून त्यांचा मोठा मैलाचा दगड!

Enjoy shopping on Flipkart

About the Author

Jishnu Murali
Jishnu Murali

जिष्णू मुरली फ्लिपकार्ट स्टोरीज सह लेखक आहेत. पाककृती, इतिहास आणि परंपरेद्वारे वेगवेगळ्या संस्कृतींचा अनुभव घेणे त्याला आवडते. संगीत आणि गडद विनोद त्याला जिवंत ठेवतात.

jQuery('.more').click(function(e) { e.preventDefault(); jQuery(this).text(function(i, t) { return t == 'close' ? 'Read More' : 'close'; }).prev('.more-cont').slideToggle() });