फ्लिपकार्टच्या मदतीने राहुल कुमावतने त्याच्या कुटुंबाचा आधार आणि त्याच्या व्यवसायावरील कुटुंबाचा विश्वास जिंकून घेतला. आज, त्यांना नुसते कुंपणावर बसून त्याची प्रगती पाहायची नाही आहे. ते त्याच्या मार्गातील प्रत्येक पावलावर त्याच्यासोबत आहेत आणि त्याला त्याचे उद्योजकीय ध्येय साध्य करण्यात मदत करण्यास वचनबद्ध आहेत. त्याची कथा वाचा आणि त्याने रात्री उशिरापर्यंत काम करण्यापासून ते त्याच्या भविष्याची जबाबदारी घेण्यापर्यंत कसा पोचला ते पाहा.
माझे नाव राहुल कुमावत आहे आणि मी #Sellfmade फ्लिपकार्ट विक्रेता म्हणून काथू क्राफ्ट्स चालवतो. आम्ही फोटो फ्रेम, वॉल क्लॉक, की होल्डर, वॉल हँगिंग्ज आणि इतर गृहसजावटीच्या वस्तू विकणाऱ्या होम डेकॉर श्रेणीमध्ये काम करतो. मी 2013 मध्ये फ्लिपकार्ट वर विक्री करण्यास सुरुवात केली. मी फार्मास्युटिकल साधनांसह सुरुवात केली, पण 2014 पर्यंत मी माझी श्रेणी बदलली आणि गृहसजावटीच्या वस्तूंची विक्री सुरू केली. माझ्या कुटुंबातील सदस्य या हस्तनिर्मित उत्पादनांच्या निर्मितीमध्ये मला मदत करतात.
मी बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर औषधांच्या दुकानात काम करायचो. मी ₹ 3,000- ₹ 4,000 कमवत असे जे पुरेसे नव्हते. मला आयुष्यात आणखी काही करायचे होते. माझ्या कष्टाने कमावलेल्या पैशाने माझे स्वतःचे घर आणि कार खरेदी करण्याचे माझे स्वप्न होते. मी संध्याकाळी काम करायचो त्यामुळे दिवसा ऑनलाईन विक्री करण्याचे काम सुरु केले.
मी पर्सनलाइज्ड फ्रेम आणि डिझाईन्स बनवत असे आणि त्यांचे रूपांतर मी विकता येतील अशा उत्पादनांमध्ये करत असे. मी ऑनलाईन पोर्टलवर विकण्यास सुरुवात केली, पण त्यावेळेस ऑनलाईन विक्रीसाठी फारशी शिक्षण सामग्री उपलब्ध नव्हती. त्यामुळे ते सोपे नव्हते. पण मला आणखी ऑर्डर निर्माण करण्यासाठी यंत्रसामग्री, मनुष्यबळ, विपणन आणि अशा आणखी आवश्यक संसाधनांमध्ये प्रवेश मिळणे आवश्यक होते आणि त्यासाठी फ्लिपकार्ट हा मार्ग होता. इतर पोर्टलच्या तुलनेत ते सर्वात विश्वसनीय होते. आम्ही दररोज तीन ऑर्डरवर प्रक्रिया करण्यास सुरुवात केली आणि सणासुदीच्या काळात आम्ही दररोज सुमारे 2,000 ऑर्डर पूर्ण करतो.
फ्लिपकार्टवरील माझ्या अकाउंट मॅनेजर्सनी मला विविध जाहिराती निवडून माझ्या लक्ष्य विक्रीपर्यंत पोहोचण्यास मदत केली आहे. त्यांनी मला कोणत्या डिझाइन्स चालतात आणि कोणत्या नाहीत याची माहिती दिली, ज्यामुळे मला माझा नफा वाढण्यास मदत झाली. आणि माझ्या व्यवसायाची वाढ आश्चर्यकारक आहे! फ्लिपकार्ट आम्हाला ऑनलाइन विक्रीबद्दल बरेच काही शिकण्यास मदत करते आणि ते त्यांच्या प्रक्रियांमध्ये सुधारणा करत राहतात.
द बिग बिलियन डेज सेलच्या बाबतीत माझा आतापर्यंतचा अनुभव समृद्ध करणारा आहे. गेल्या वर्षी माझी 70% उद्दिष्टे पूर्ण झाली. सध्या, आम्ही येणाऱ्या सेलसाठी सुसज्ज आहोत आणि आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम वितरित करण्यास उत्सुक आहोत. फ्लिपकार्टने आम्हाला डेटा आणि सर्वसमावेशक विश्लेषण देखील दिले आहे जेणेकरून आम्ही येणाऱ्या सणाच्या काळासाठी आमची उद्दिष्टे समजून घेऊ शकू आणि साध्य करू शकू. आमच्या इन्व्हेंटरीमध्ये प्रत्येक प्रकारच्या उत्पादनासाठी आमच्याकडे समर्पित गटही आहेत, ज्यांना उत्पादन आणि पॅकेजिंगचे काम देण्यात आले आहे आणि ते गेल्या वर्षीची आमची विक्रीची संख्या मागे पडावी म्हणून मेहनत घेत आहेत!
विक्रेता म्हणून माझ्या प्रवासाच्या सुरुवातीला, मला माझ्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा नव्हता. माझ्या करिअर निवडीबद्दल आणि उद्योजक होण्याच्या जोखमीबद्दल त्यांना शंका होती. पण आज, फ्लिपकार्टने माझी स्वप्ने पूर्ण केल्याचे पाहिल्यानंतर, मी कसा सशक्त आहे आणि माझ्या कुटुंबासाठी माझे स्वतःचे घर आणि कार विकत घेतली आहे हे पाहून, त्यांना माझ्या क्षमतेविषयी पूर्ण विश्वास वाटत आहे आणि माझ्याइतकेच ते व्यवसायात सहभागी आहेत!
मी आता फ्लिपकार्टमध्ये 8 वर्षे पूर्ण केली आहेत आणि माझा स्वतःवरील विश्वास पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आहे. मला खात्री आहे की नजीकच्या भविष्यात मी माझ्या स्वप्नांच्या पलीकडे यशाची उंची गाठेन.
राहुल गुप्ता रॉय यांनी जोडलेल्या जास्तीच्या मुद्द्यांसह, जिष्णू मुरलीला सांगितल्याप्रमाणे