हा फ्लिपकार्ट विक्रेता जो त्याची उत्पादने ग्राहकांपर्यंत सुरक्षितपणे पोहचावीत यासाठी सर्व ती काळजी घेत आहे

Read this article in বাংলা | English | हिन्दी | தமிழ் | ગુજરાતી | ಕನ್ನಡ

दर दोन तासांनी सॅनिटाईज करण्यापासून ते त्याच्या कर्मचाऱ्यांना कामासाठी फार लांब प्रवास करावा लागणार नाही याची खात्री करण्यापर्यंत, फ्लिपकार्ट विक्रेता संजीब प्रसाद त्याच्या कर्मचाऱ्यांच्या आणि ग्राहकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न येतो तेव्हा हरतऱ्हेने प्रयत्न करतो. इथे, तो त्याच्या कंपनीने कोविड-19 च्या परिस्थितीशी कसे जुळवून घेतले त्याबद्दल बोलत आहे आणि त्याच्या सारख्या लहान व्यवसायाला ग्राहकांनी समर्थन दिल्याबद्दल आभार मानत आहे. त्याची कथा वाचा

essentials

माझे नाव संजीब प्रसाद आहे आणि मीफ्लिपकार्ट च्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तू विकत आहे. कोविड-19 च्या प्रसार रोखण्यासाटी लॉकडाउन आणि त्याच्या परिणामस्वरूप प्रतिबंध जाहीर करण्यात आले, तेव्हा आम्हाला जाणून घ्यावयाचे होते की आमच्या व्यवसायाला सुरू ठेवण्यासाठी आम्ही ई-कॉमर्सचा फायदा कसा करून घेऊ शकतो. फ्लिपकार्टने आमच्याशी वेळेवर संवाद साधून आणि सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे सांगून सहाय्य केले, आणि आमचे कार्य पुन्हा सुरू करण्यासाठी ते उत्सुक होते, ज्याची खरोखऱ प्रशंसा करतो.

आम्ही आधीच सॅनिटायझर, फेस वॉश, साबण आणि स्वच्छता किट यासारखे जीवनावश्यक विकत होतो, त्यामुळे फ्लिपकार्टवर आमच्या उत्पादनाची सूची करून विकणे हा एक अडथळाविरहीत अनुभव होता.

कोविड-19 च्या साथरोगाच्या काळात कर्मचारी आणि व्यावसायिक कामांच्या बाबतीत आम्ही सर्वाधिक काळजी घेतो. कार्यालयीन वेळेच्या नंतर, आम्ही स्वतःला सॅनिटाईज करतो आणि आवश्यक ती सर्व खबरदारी घेतो. सध्या, आम्ही 33% कर्मचारी क्षमतेने काम करत आहोत. देशभरातील लॉकडाउनच्या आधी, आमच्याकडे 20 कर्मचारी होतो परंतु आता फक्त चार ते पाच कर्मचारी काम करत आहेत.

essentials

ते देखील माझ्या जवळच्या भागात राहत होते त्यामुळे आम्ही सुनिश्चित करतो की त्यांना कामाला येण्यासाठी जादा प्रवास करावा लागणार नाही. आमचे कर्मचारी कार्यालयात पोहोचल्यावर त्यांना एका लॉगबुकमध्ये स्वाक्षरी करावी लागते. त्यानंतर आम्ही कर्मचाऱ्यांचे तापमान तपासतो आणि त्यांच्या हात आणि पायासाठी सॅनिटायर्झ देतो. आम्ही कामाच्या स्थळी आणि दरवाज्याच्या जवळ सॅनटायर्झ ठेवतो. दर 2 तासांनी, मी प्रत्येकाला त्यांचे हात सॅनिटाईज करण्याची सूचना देतो आणि मी देखील तसेच करतो. आम्ही दोन हातमोज्यांच्या जोड्या देखील देतो,जे कामाच्या तासांनंतर काढले जातात. आम्ही दररोज या दिनक्रमाचे पालन करतो.

आम्ही फ्लिपकार्टबरोबर जोडले गेल्याबद्दल आम्हाला अभिमान आहे आणि देशभरातील ग्राहकांची सेवा करू शकतो. आम्ही आमच्या सहकारी भारतीयांना जेव्हा शक्य असेल तेव्हा ऑनलाइन खरेदी करा अशी विनंती करतो. फ्लिपकार्ट सारख्या कंपन्या या कठीण काळात परवडणाऱ्या किंमतीमध्ये जीवनावश्यक वस्तू आणि किराणा माल सर्वांना उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना जे काही शक्य असेल ते करत आहेत. यामुळे आमच्यासारख्या लहान व्यवसायांचे अस्तित्व टिकून राहिल हेदेखील सुनिश्चित केले जाते. आणि आमच्याकडून खरेदी केल्याबद्दल आमच्या सर्व ग्राहकांचा मोठा ‘आभार!’

जिष्णू मुरली यांना सांगितले तसे, पल्लवी सुधारक यांनी पुरविलेल्या अतिरीक्त माहितीसह

Enjoy shopping on Flipkart