कोविड-19 साथरोगाच्या काळात भारतभरातील लोक त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवेशासाठी ई-कॉमर्सकडे वळले. आमचे विशमास्टर्स दररोज ग्राहकांना आवश्यक वस्तू पोहोचवत असताना, आमचे विक्रेते पुरेशा पुरवठ्याची खात्री करण्यासाठी निरंतर काम करत आहेत. मोहित अरोरा, हा फ्लिपकार्ट विक्रेता, हॅन्ड सॅनिटायझर्स आणि फेस मास्क विकतो. त्याने त्याचा व्यवसाय ग्राहक आणि कर्मचारी यांच्या सुरक्षिततेची खात्री करत, आणि त्याच वेळी भारतासाठी त्याचे थोडेसे योगदान करत कसा सुरू ठेवला ते वाचा.
माझे नाव मोहिक अरोरा आहे. मी हिस्सार, हरियाना इथे राहतो. मी चार वर्षापूर्वी आवश्यक वस्तू ऑनलाइन फ्लिपकार्टवर विकायला सुरुवात केली आणि माझी कंपनी श्री राधेय ट्रेडिंग कंपनी, त्यावेळेपासून उत्तम सुरू आहे. माझे स्वतःचे रिटेल विक्रीचे स्टोअर देखील आहे जिथे मी आवश्यक उत्पादने विक्री करतो.
जेव्हा कोविड-19 साथरोगाचा हल्ला झाला, त्याने आमच्यासाठी बरीच आव्हाने निर्माण केली. एखाद्या नेहमीच्या दिवशी. माझ्या 15 जणांच्या कर्मचारीवृदाला ग्राहकांच्या मागण्या पुरवण्याची काळजी घेतो, पण सध्याच्या स्थितीत मला ती संख्या तीन पर्यंत कमी करावी लागली, यामुळे मला शारीरिक अंतर ठेवायलाही मदत होते आम्ही भाग्यवान होतो कारण रेड क्रॉसचे पथक नियमितपणे आमच्या सोसायटीचा परिसर सॅनिटाईज करायला येतो.
आम्ही स्वतःप्रमाणेच कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठेवत आहोत हे आम्ही सुनिश्चित करतो- आम्ही नियमितपणे स्वतःला आणि आमच्या कामाच्या जागेला सॅनिटाईज करतो. आम्ही मास्क आणि हातमोजे यासारखे संरक्षणात्मक किट देखील वापरतो आणि आमच्या गोडावून मध्ये येत असलेल्या मालाला देखील सॅनिटाईज करतो.
या कठिण प्रसंगात फ्लिपकार्ट आमच्याशी अतिशय मोकळ्या मनाने संवाद साधत आहे. आम्हाला दैनंदिन अपडेट्स आणि सावधगिरीच्या सूचना मिळतात.
साथरोगाच्या आधीपासूनच, मी सॅनिटायझर्स, साबण आणि शाम्पू विकत होतो. मात्र फ्लिपकार्टने मला माझी उत्पादन सूची विस्तारण्यास सांगितले आणि मास्कसारख्या काही अधिक आवश्यक वस्तूंचा समावेश करण्यास सांगितले. आणि या काळात, या आवश्यक वस्तूसाठी ग्राहकांच्या मागणीमध्ये वाढ झाली. मला नेहमीपेक्षा अधिकाधिक ऑर्डर्स प्राप्त झाल्या आणि मला माझा व्यवसाय वाढताना दिसला. मी माझ्या सेवा 10 एप्रिल, 2020 ला पुर्ववत केल्या आणि फ्लिपकार्टमधील माझ्या अकाउंट मॅनेजरने माझ्या व्यवसायासाठी हळूवार हस्तातरणांची आणि सातत्यपूर्णतेची खात्री दिली.
मी नेहमी फ्लिपकार्टवर विश्वास ठेवला आहे कारण त्यांचा दर्जा उच्च आहे आणि त्याचे नियम पद्धतशीर आहे. उत्पादन चित्र आणि वर्णन स्पष्ट आहे आणि त्यांची मार्गदर्शक तत्त्वे अतिशय उपयुक्त आहेत. आणि आमचे कुशलक्षेम विचारणारी तसेच आम्हाला खबरदारीसाठी मार्गदर्शन करणाऱ्या त्यांच्या रोजच्या ईमेल्समुळे आम्हाला कोणीतरी आमची काळजी करत असल्यासारखे वाटते.
घरी, मी आणि माझे कुटुंब देखील आमची प्रतिकार क्षमता बाधित होऊ ऩये याची खात्री करण्यासाठी सर्व काही करतो. आम्ही आमचा दिवस योगाचा सराव करून आणि फ्लिपकार्टने आयोजित केलेल्या नृत्याच्या वर्गाला हजेरी लावून सुरू करतो. माझे वडील आमची प्रतिकारक्षमता वाढण्यास मदत होण्यासाठी काही औषधी पेय तयार करतात.
.
जेव्हा लॉकडाउन पहिल्यांदा जाहीर झाले होते तेव्हा आमच्या ग्राहकांच्या माग्ण्या पूर्ण करण्यासाठी तयार होताना, माझ्या कंपनीसाठी फार काही करणे मला शक्य नव्हते. म्हणून त्या काळात, मी आणि माझे कुटुंब आमच्या निवासाजवळच्या गरजू लोकांना अन्नाची पाकिटे आणि सॅनिटायर्झ वितरीत करायचो.
माझ्या सहकारी भारतीयांसाठी मला एक छोटासा संदेश द्यावयाचा आहे. आम्ही तुमच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी शक्य ती प्रत्येक सावधगिरी बाळगत आहोत. तुमच्याकडून, तुम्ही जे काही खरेदी कराल, खात्री करा की ते योग्य प्रकारे सॅनिटाईज केलेले आहे. चला या साथरोगातून जसे आपण पूर्वी होतो त्याचप्रमाणे निरोगी बाहेर पडण्यासाठी शक्य ते सर्व काही करू!
जिष्णू मुरली यांना सांगितले तसे, पल्लवी सुधारक यांनी पुरविलेल्या अतिरीक्त माहितीसह.