आपला छोटा बिझनेस केवळ ५,००० रुपये हातात असताना सुरु करणारी फ्लिपकार्ट विक्रेती चारू गुप्ता म्हणजे लवचिकतेच्या शक्तीचा एक टेस्टामेंट आहे. येथे तिने आपल्या आव्हानातून मार्ग काढत #सेल्फमेड यश कसे मिळविले ते पहा.
[ड्रॉपकॅप]आ[/ड्रॉपकॅप]पले स्वप्न साकार करण्यासाठी तिने धैर्य व प्रामाणिक प्रयत्नावर दृढ विश्वास ठेवला. फ्लिपकार्ट विक्रेती चारू गुप्ताला हार्ड वर्क काही नवीन नव्हते. तिने स्वत:चा उद्योग सुरु करण्यापूर्वी अनेक जॉब केले होते. पण जेव्हा संकटांची मालिका सुरु होती, त्यातही फॅमिली समस्या उद्भवल्या होत्या तेव्हा तिला माहित होते की यातून मार्ग काढण्यासाठी फक्त एक पाऊल पुढे टाकले पाहिजे. २०१५ साली चारूने तिचा छोटा बिझनेस हातात केवळ ५,००० रुपये असताना सुरु केला. तिच्या पाठीशी तिचे कुटुंब आणि फ्लिपकार्टची इंसाईट होती आणि त्याच्या जोरावर तिने तिचा छोटा बिझनेस भरभराटीला आणला.
फ्लिपकार्ट विक्रेती चारू गुप्ताची गोष्ट पहा:
मोठमोठ्या आव्हानांपुढे न झूकता ‘धैर्य व चिकाटी’ या मंत्राशी चारू प्रामाणिक राहिली. आपल्या बिझनेसचा टर्नओव्हर ५ कोटी रुपयावर नेल्यावर चारू गुप्ता मागे वळून पाहताना तिची संपूर्ण परिस्थिती पालटणाऱ्या २०१५ सालचाच विचार करते. तिने केलेली प्रत्येक महत्त्वाची चाल तिच्या प्रबळ इच्छाशक्तीचे दर्शन घडविते. ती केवळ तिच्या विस्तारित क्षमताच दाखवीत नाही तर समाजाने घालून दिलेल्या नारीशक्तीच्या मर्यादा सुद्धा ओलांडते.
होलसेलर्स कडून दिवसभरातील वेळ न मिळणे, आपल्या बिझनेस प्लॅनमध्ये वेळोवेळी बदल करावे लागणे, आय-कॉमर्स मुळापासून शिकणे– अशा प्रकारच्या अनेक आव्हानांशी तिने यशाकडे जाताना मुकाबला केला. फ्लिपकार्टची विक्रेती झाल्यावर तिच्या छोट्या बीजनेसने १ कोटी टर्नओव्हरचा टप्पा पार करण्यास फार वेळ लावला नाही – आणि त्यानंतर केवळ एकच वर्षात तिने त्यात ४००% वाढ केली!
तिच्या यशोगाथेत तिची साईकारा कलेक्शन्स कंपनी ही केवळ बिझनेसपेक्षा खूप काही आहे आणि फ्लिपकार्ट हा सुद्धा प्लॅटफॉर्मपेक्षा खूप कांही जास्त आहे. हे एक असे ठिकाण झाले जेथे चारुला तिची खरी क्षमता लक्षात आली. आणि येथेच तिने तिच्यासारख्याच क्षमतेच्या महिलांना रोजगार आणि त्यांची स्वत:ची स्वप्ने साकार करण्याची संधी दिली.
याशिवाय पहा: चेन्नाई सुपर क्वीन्स: या फ्लिपकार्ट हबवर, एक महिलांची टीम सप्लाय चेनमध्ये इतिहास घडवते आहे!