घोटाळ्याविषयीचा सल्ला: फ्लिपकार्टच्या नावाचा गैरवापर करून फसविणार्‍या साईट्स आणि बनावट ऑफर्सपासून सावध रहा

Read this article in हिन्दी | English | বাংলা | தமிழ் | ಕನ್ನಡ | ગુજરાતી

तुम्हाला आश्चर्यकारक डील्स आणि सवलतींची ऑफर देण्याचा दावा करणार्‍या अनधिकृत वेबसाइट्स आणि मेसेजेस पासून दूर रहा. सुरक्षित शॉपिंगसाठीचे हे माहिती पत्रक पहा.

fraudulent

फ्लिपकार्टकडून तुम्हाला अविश्वसनीय सवलत आणि ऑफर्स देण्याचा दावा करणारा एखादा ई-मेल, कॉल, एसएमएस, व्हॉट्स अ‍ॅप मेसेज अथवा सोशल मिडीयावरील इतर कोणताही संदेश अलीकडेच प्राप्त झाला आहे का? मग हे सावधपणे समजून घ्या की हे संदेश फ्लिपकार्टच्या अधिकृत माध्यमांनी पाठविलेले नसून तुम्हाला फसविण्याचा उद्देश असणारे ठग आणि घोटाळेबाजांनी पाठविले आहेत. तुम्ही खबरदारी घेतली नाही तर तुमची फसवणूक होऊ शकते. फ्लिपकार्टच्या परिचित आणि विश्वासू नावाचा गैरवापर करून ठकबाजांना कमी अवधीत जास्त पैसा कमवायचा आहे. आम्ही तुम्हाला असे सांगू इच्छितो की तुमचे पैसे किंवा तुमच्या वैयक्तिक व आर्थिक माहितीच्या बाबतीत तुम्ही अशा फसव्या व्यक्ती किंवा संस्थांवर विश्वास ठेवू नका. नेहमीच फ्लिपकार्टचे खरे आणि मूळ स्रोत आधी पहा.

तर मग, तुम्ही एखादा संशयास्पद फसव्या जाहिरातींचा संदेश पाहिला तर तुम्ही काय करावे? कोणताही संकोच न बाळगता, कृपया फ्लिपकार्ट कस्टमर केअर टोल फ्री क्रमांक 1800 208 9898 वर संपर्क साधून त्वरीत कळवा. कृपया फ्लिपकार्ट ग्राहक सेवा प्रतिनिधीला शक्य तितके जास्त तपशील देऊन मदत करा कारण यामुळे या समस्येची सखोल चौकशी करण्यास आणि तुमच्यासारखेच इतर ग्राहकांचे संरक्षण करण्यास आम्हाला मदत होईल.

फ्लिपकार्टवर तुम्हाला सुरक्षित खरेदी कशी करता येईल आणि घोटाळेबाज व फसवणुकीला बळी न पडता अजूनही जास्त चांगले डील्स कसे मिळतील याबद्दल हा लेख आपल्याला माहिती देतो. तुम्हाला संभाव्य फसवणुकीस प्रतिबंध करून त्याबद्दलची माहिती कशी देता येईल ते समजून घेण्यासाठी पुढे वाचा.


फ्लिपकार्टच्या फसव्या जाहिराती आणि बनावट ऑफर्स मला कशा ओळखता येतील?

fraudulent

फ्लिपकार्ट ही भारतातील सर्वांत मोठी ई-कॉमर्स बाजारपेठ असून तिथे 100 दशलक्षाहून अधिक नोंदणीकृत ग्राहक आहेत. आमच्यासाठी, ग्राहकांच्या माहितीची सुरक्षितता आणि निश्चिंतपणा सर्वांत महत्त्वाचा आहे. आमचे डेटा सेंटर पीसीआय:डीएसएस सारख्या आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांचे पालन करते. आम्ही हे सुनिश्चित करतो की डेटा उच्च पातळीवरील सुरक्षा नियंत्रणाखाली संग्रहित केला जाईल. शिवाय, या डेटाच्या बाबतीत कुठलीही तडजोड केली जाणार नाही, त्यामध्ये फेरफार होणार नाहीत किंवा कोणत्याही अनधिकृत व्यक्ती किंवा संस्थांना तो दिला जाणार नाही हे सुनिश्चित करण्यासाठी अत्याधुनिक सुरक्षा उपायांनी आमची माहिती प्रणाली संरक्षित केली आहे. याचबरोबर, आमचे ग्राहक त्यांच्या स्वत:च्या डेटाचे संरक्षण कसे करू शकतात आणि डेटा चुकीच्या हातामध्ये पडू नये यासाठी कसा प्रतिबंध करू शकतात याबद्दल आम्ही आमच्या ग्राहकांना सतत प्रशिक्षण आणि माहिती देत असतो.

ऑनलाईन खरेदीदारांची हेतु:पुरस्सर फसवणूक आणि दिशाभूल करण्याच्या प्रयत्नात काही ठक आणि घोटाळेबाज फ्लिपकार्टच्या नावाचा गैरवापर करीत आहेत. यातून ते फ्लिपकार्टची प्रतिष्ठा आणि भारतातील ऑनलाईन शॉपिंगची सुरक्षा या दोन्हींसाठी धोका निर्माण करत आहेत. तुम्ही त्यांच्याशी कोणताही व्यवहार करू नये असा आग्रही सल्ला आम्ही आहोत.

ह्या व्यक्ती किंवा संस्थांकडून पाठविलेले फसवे संदेश/कॉल्समध्ये फ्लिपकार्टवरील भुरळ पाडणारी डील्स, सवलती आणि ऑफर्स यांचा संदर्भ दिला जाऊ शकतो. हे संदेश फ्लिपकार्टचा लोगो, टाईपफेसेस् आणि ब्रँडचे रंग यांसारख्या फ्लिपकार्टच्या अधिकृत ट्रेडमार्कशी साम्य असेल अशा पद्धतीने तयार केलेले असू शकतात. काही बनावट वेबसाईट्सच्या यूआरएल किंवा लोगोमध्ये ‘फ्लिपकार्ट’ हा शब्दही असू शकतो.

हे असे काही मार्ग आहेत, ज्यांच्या माध्यमातून ठकबाज तुमच्याशी संपर्क साधू शकतात :

fraudulent

बनावट वेबसाईट्स: या वेबसाईट्समध्ये इतर नावांप्रमाणे ही नावे आणि इंटरनेट अ‍ॅड्रेसेस (यूआरएल) असू शकतात (URLs) like flipkart.dhamaka-offers.com, flipkart-bigbillion-sale.com एकसारखे दिसणारे आणि सारखीच भासणारी नावे वापरून अशा वेबसाईट्स फ्लिपकार्टशी संलग्न असल्याचे भासवतात. तथापि, ते फ्लिपकार्टद्वारे अधिकृत केलेले नाहीत.

fraudulent

व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक मेसेन्जर, आणि/किंवा इतर सोशल मेसेजिंग फ्लॅटफॉर्म्स: फसविणारे या परिचित मेसेजिंग प्लॅटफॉर्मवरून तुम्हाला मेसेज पाठविण्याचा प्रयत्न करू शकतात. अनेक फ्लिपकार्ट ग्राहकांनी यासारखे मेसेजेस् प्राप्त झाल्याची माहिती दिली आहे :

  • तुम्हाला नाव, मोबाईल क्रमांक, पत्ता, बँकेचे तपशील इत्यादी प्रकारचा वैयक्तिक तपशील देण्यास सांगितले जाते.
  • तुम्ही हे संदेश आकर्षक बक्षिसे जिंकण्यासाठी तुमच्या संपर्क यादीतील इतर व्यक्तींना किंवा तुमच्या संपर्क यादीतील ग्रुप्सना पाठवावेत असे सांगितले जाते
  • तुम्हाला अविश्वसनीय आणि अतिशय आकर्षक किमतीला प्रॉडक्ट्स देऊ करतात (उदा. 32 जीबी चा पेन ड्राइव्ह ₹25 ला)
  • तुम्ही फ्लिपकार्टसारख्या दिसणार्‍या वेबसाईटकडे आकर्षित होता
  • तुम्हाला मोफत भेटवस्तू मिळविण्यासाठी ऑनलाईन वॉलेट्स, बँक ट्रान्सफर किंवा लॉजिस्टिक्स अथवा करांच्या अन्य माध्यमांतून पैसे देण्यास सांगितले जाते.

ऑफर्स कितीही आकर्षक दिसत असल्या तरी कृपया या मेसेजेसना उत्तर देऊ नका किंवा फ्लिपकार्टशी त्यांची सत्यता पडताळ्याशिवाय कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. असे फसवे मेसेज पाठविणार्‍यांशी फ्लिपकार्टचा काहीही संबंध नाही आणि तुम्ही त्यांना दिलेल्या कोणत्याही माहितीवर आमचे नियंत्रण नाही. फ्लिपकार्टचा मुखवटा घातलेले ठकबाज तुमच्या आर्थिक आणि वैयक्तिक माहितीचा गैरवापर करू शकतात. एकदा या खात्यांवर पैसे भरले की ते परत मिळविता येत नाहीत किंवा परत खात्यातही येऊ शकत नाही, आणि तुम्हाला तुमचे कष्टाचे पैसे गमवावे लागू शकतात.


fraudulent

 

ग्राहकांना बनावट कॉल्स किंवा एसएमएस: कधीकधी, ग्राहकांना अनोळखी क्रमांकावरून फोन येऊ शकतात. कॉल करणारा इंग्रजी, हिंदी किंवा कोणत्याही इतर भाषेमध्ये बोलू शकतो. तुम्ही विनामूल्य भेटवस्तू जिंकल्या आहेत किंवा लकी ड्रॉमध्ये तुमचा मोबाईल क्रमांक निवडला गेला आहे इत्यादी प्रकारची प्रलोभने ते तुम्हाला देऊ शकतात. या भेटवस्तूंचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला गुप्त आणि संवेदनशील वैयक्तिक वित्तीय माहिती किंवा तुमच्या बँकेचा खाते क्रमांक, इलेक्ट्रॉनिक वॉलेट तपशील, क्रेडिट/डेबिट कार्डची माहिती, सीव्हीव्ही, पिन किंवा ओटीपी क्रमांक अशा प्रकारच्या संकेतशब्दांविषयी माहिती देण्यास सांगितले जाईल. ते तुम्हाला अगदी फ्लिपकार्टसारखीच दिसणार्‍या वेबसाईटवरही प्रलोभने दाखवू शकतात किंवा ते तुम्हाला खोटी प्रमाणपत्रे पाठवू शकतात. ते फ्लिपकार्टचे कर्मचारी किंवा फ्लिपकार्टचे भागीदार असल्याचा दावाही करू शकतात आणि पुरावा म्हणून बनावट ओळखपत्रे दाखवू शकतात. ही कागदपत्रे तुम्हाला खरी वाटतील अशा पद्धतीने सहज तयार करता येतात. बक्षिसे किंवा भेटवस्तूंवर हक्क सांगण्यासाठी तुम्हाला काही विशिष्ट डिजिटल वॉलेटमध्ये पैसे हस्तांतरीत करण्यास सांगितले जाऊ शकते. लक्षात ठेवा की ही खाती फ्लिपकार्टद्वारे व्यवस्थापित केली जात नाही तर ज्यांना तुम्हाला फसवायचे आहे अशा ठकांकडून केली जातात.
fraudulent

 

फिशिंग (बनावट ई-मेल्स):फिशिंग म्हणजे इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनमधील विश्वासार्ह संस्था असल्याचे भासवून एखाद्या हानिकारक उद्देशाने युजरनेम, पासवर्ड आणि क्रेडिट कार्डचे तपशील यासारखी संवेदनशील माहिती प्राप्त करण्याचा फसवा प्रयत्न आहे. ठकबाजांकडून फिशिंग ईमेल्स पाठवले जातात, ज्यामध्ये तुम्हाला हानिकारक लिंक्सवर जायला सांगितले जाते; आणि त्या माध्यमातून तुमची वैयक्तिक आणि /किंवा आर्थिक माहिती मिळविली जाऊ शकते आणि तिचा वापर तुमच्या संमतीशिवाय फसव्या व्यवहारांसाठी केला जाऊ शकतो. यामध्ये तुम्ही पैसे, वैयक्तिक आणि संवेदनशील माहिती गमवू शकता आणि ई-मेल मधील लिंक्सवर क्लिक केल्यावर किंवा उघडल्यावर तुमच्या सिस्टिम्स म्हणेच डेस्कटॉप संगणक, लॅपटॉप्स किंवा मोबाईल फोनला धोका निर्माण होऊ शकतो.

 

fraudulent

ऑनलाईन गेम्स/वेबसाइट्स (डिस्काऊंट कुपन्स/गिफ्ट व्हाऊचर्स/ऑफर्स/ऑनलाईन गेम्स): ग्राहकांना ‘स्पिन द व्हील,’ सारखे गेम्स खेळण्यास सांगून त्यामध्ये फ्री गिफ्टस्, रोख बक्षिसे, आणि इतर आमिषे दाखवून या प्रकारचे ऑनलाईन घोटाळे ग्राहकांपर्यत पोहोचतात. खेळाडूंना बक्षीसे मिळवता यावी म्हणून अनेकदा हा खेळ त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना पाठवण्यास सांगितले जाते, पण ती बक्षीसे अर्थातच कधीच मिळत नाहीत. उपयोगकर्त्यांना त्यांचे ई-मेल आयडी, पत्ते आणि फोन नंबर्स अशा प्रकारची संवेदनशील माहिती देण्यास भाग पाडले जाते. या मध्ये भाग घेतल्याने तुमची फसवणूक होऊ शकते.बनावट ऑनलाईन गेम्सविषयीचा हा लेख वाचा अधिक माहितीसाठी.

 

fraudulent

बाजारपेठ विक्रेत्यांकडून: तुम्ही फ्लिपकार्टवर ऑर्डर केलेली वस्तू तुम्हाला मिळते, तेव्हा तुम्हाला एखादे माहितीपत्रक किंवा छोटे जाहिरात पत्रक पाठवलेले असू शकते, ज्यामध्ये भविष्यकाळात अधिक सूट मिळण्यासाठी इतर ऑनलाईन शॉपिंग साईट अथवा पोर्टलवर खरेदी करण्यास सांगितले जाते. त्याचप्रमाणे, विक्रेते/फोन करणारे स्वत:ला विक्रेते म्हणून सांगून त्यांच्याकडे थेट ऑर्डर देण्यास सांगू शकतात तसेच त्यांनाच थेट पेमेंट करण्यासाठी सांगू शकतात. बर्‍याचदा ते तुम्हाला तुमची फ्लिपकार्टची ऑर्डरही रद्द करण्यास सांगू शकतात. एकदा जर तुम्ही या फसव्या विक्रेत्यांशी असा कोणताही व्यवहार करण्याची तयारी दाखवली, तर तुम्ही त्यांना दिलेल्या कोणत्याही माहितीवर फ्लिपकार्टचे नियंत्रण राहणार नाही. तुम्ही अशा ऑफर्स स्वीकारल्याने तुमची फसवणूक होऊ शकते.

 

fraudulent

ऑफलाईन मिडीया: अशा घोटाळ्यांमध्ये कमिशन/शुल्काच्या मोबदल्यात नोकरी देण्याच्या प्रस्तावांचा समावेश असू शकतो आणि ते विशेषकरून वर्तमानपत्रातील जाहिराती व जॉब पोर्टलमध्ये दिसू शकतात. फ्लिपकार्ट कधीही संभाव्य उमेदवारांना नोकरी किंवा कॉन्ट्रॅक्टससाठी पैसे मागत नाही, तसेच त्यांनी कोणत्याही तृतीय पक्षाला पैसे गोळा करण्याचे अधिकार दिलेले नाहीत. (अधिक माहितीसाठी ही पोस्ट वाचा Fake Flipkart job offers).

फसवणूक करणार्‍यांच्या कामाच्या इतर ज्ञात पध्दती

फसवणुकीच्या इतर काही पध्दती आमच्या पाहण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये ग्राहकांना फसविणार्‍या लोकांकडून फसवे एसएमएस किंवा व्हॉटस् अप मेसेजेस अथवा फोन कॉल्स येऊ शकतात. हे फसविणारे लोक आम्ही फ्लिपकार्टचे किंवा मिंत्रा, जबाँग, जीव्हज् किंवा फोनपे या ग्रुप कंपनीज् चे प्रतिनिधित्व करतो असे सांगून ग्राहकांची दिशाभूल करू शकतात. फसविणारे तुम्हाला तुमच्या अलिकडील ऑर्डर नंबरचे तपशीलही सांगू शकतात (हे ऑर्डर नंबर्स तुम्ही फेकून दिलेल्या पॅकेजिंगच्या लेबल्स आणि कव्हर्सवरून मिळू शकतात) आणि बँक ट्रान्सफर/ वॅलेट्सच्या इत्यादी मार्फत काही आगाऊ शुल्क भरण्यास सांगतील किंवा ते तुम्हाला तुमचे बँकिंग आणि/किंवा क्रेडिट/डेबिट कार्डचे तपशील आणि/किंवा वैयक्तिक माहितीही विचारू शकतात. काही घटनांमध्ये, ग्राहकांना आणि सामान्य लोकांना कोणतेतरी थर्ड पार्टी अ‍ॅप्लिकेशन (एनीडेस्कसारखे) इन्स्टॉल करण्यास सांगितले जाऊ शकते.कृपया सावध रहा कारण अशी अ‍ॅप्लिकेशन्स तुमच्या मोबाईल फोनचा ताबा घेऊ शकतत आणि त्यावरून तुमच्या वैयक्तिक तसेच फोनमधील आर्थिक माहितीपर्यंत पोहोचू शकतात. . कृपया खात्री बाळगा की फ्लिपकार्ट किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींकडून या तपशिलांची विचारणा किंवा थर्ड पार्टी अ‍ॅप्लिकेशन इन्स्टॉल करण्यासाठीची विचारणा कधीही केली जाणार नाही

तुम्हाला अशा प्रकारचे कॉल्स अथवा मेसेजेस् आले तर लगेचच डिसकनेक्ट करा आणि त्यांना कोणतीही माहिती देऊ नका. कृपया आमच्या ग्राहक सेवा क्रमांकावर (1800 208 9898) संपर्क साधून किंवा ट्विटरवर फ्लिपकार्ट सपोर्ट (@flipkartsupport) ला थेट संदेश (DM) पाठवून अशा गोष्टी लवकरात लवकर आमच्या लक्षात आणून द्या. फसवणूक करणार्‍यांचे फोन नंबर्स किंवा संशयास्पद मेसेजेसचे स्क्रीनशॉटस् यासारखे तपशील आमच्या ग्राहक सेवा प्रतिनिधींना द्या.

फ्लिपकार्टवर सुरक्षित खरेदी कशी करावी आणि फसवणुकीचा धोका कसा टाळता येईल

fraudulent

फ्लिपकार्टचे ग्राहक खरेदी करू शकतात फक्त फ्लिपकार्टच्या अधिकृत वेबसाईटवर, फ्लिपकार्ट मोबाईल शॉपिंग अ‍ॅपवर (आयओएस आणि अँड्रॉइड), आणि फ्लिपकार्टच्या मोबाईल साईटवर . याशिवाय अन्य कोणत्याही वेबसाइटवर किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर फ्लिपकार्टवरील ऑनलाईन शॉपिंग करता येणार नाही.

फ्लिपकार्टने त्यांचे आणि त्यांच्या ग्रुप कंपन्यांचे प्रतिनिधित्व करण्याचे अधिकार कोणत्याही तृतीय पक्षाच्या वेबसाइटना दिलेले नाहीत (फ्लिपकार्टच्या ग्रुपमध्ये मिंत्रा, जबाँग, फोनपे, जीव्हज्, फ1 इन्फोसिस्टिमस् आणि 2गुड.कॉम) आणि त्यांच्या वतीने सवलत व व्यवहार सादर करण्याचे अधिकार दिलेले नाहीतआम्ही दिलेल्या खबरदारीच्या सल्ल्यानंतरही जर तुम्ही तुमची वैयक्तिक/आर्थिक माहिती किंवा पैसे दिले तर कृपया हे समजून घ्या की तुम्ही हे स्व:तच्या जोखमीवर करीत आहात.


फ्लिपकार्टवरील ऑफर्स, डील्स आणि सवलतींबाबतची विश्वसनीय माहिती मला कोठे मिळेल?

fraudulent

हा खूप चांगला प्रश्न आहे. अर्थातच, आम्हाला माहीत आहे की तुम्हाला जास्तीत जास्त व्यवहार करायचे आहेत, सवलती आणि ऑफर्स मिळवायच्या आहेत, पण तुम्ही हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की ते सर्व वैध आहेत. कृपया इथे भेट द्या https://www.flipkart.com/ आणि https://stories.flipkart.com सर्व अधिकृत ऑफर्स, सेल आणि सवलतींच्या संदर्भातील ताज्या बातम्या आणि घोषणांसाठी. माहिती प्राप्त करण्यासाठीचे हे सर्वात अचूक आणि विश्वासार्ह स्रोत आहेत.

तुमच्या फ्लिपकार्ट मोबाईल शॉपिंग अ‍ॅप वर नोटिफिकेशन्स चालू करा आणि आमच्या अलीकडील आवृत्तीनुसार अ‍ॅप अपडेट केले आहे हे सुनिश्चित करा.

कृपया फ्लिपकार्टविषयीच्या ताज्या माहितीसाठी हे ऑनलाईन स्रोत पहा:
फ्लिपकार्टसाठी अधिकृत फेसबुक पेज
फ्लिपकार्ट स्टोरीजसाठी अधिकृत फेसबुक पेज
फ्लिपकार्टचे अधिकृत ट्विटर अकाउंट
फ्लिपकार्ट स्टोरीजचे अधिकृत ट्विटर अकाउंट

फ्लिपकार्ट किंवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी कधीही तुम्हाला तुमची गोपनीय माहिती जसे पासवर्डस, ओटीपी आणि पिन नंबर्स देण्यास सांगत नाहीत. अशा प्रकारची माहिती अनधिकृत लोकांना दिल्याने तुम्हाला आर्थिक फसवणुकीचा आणि तुमची वैयक्तिक माहिती बेकायदेशीर पध्दतीने गोळा करण्याला बळी पडण्याचा धोका आहे. तुम्हाला बनावट ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी अगदी प्रलोभन दिले जाऊ शकते किंवा फसवणूक करणारे आमच्या प्लॅटफॉर्मवरून अफरातफर करण्यासाठी तुमच्या बँकेशी संबंधित माहितीचा वापर करू शकतात.

अशा प्रकारच्या कुठल्याही फसवणुकीमुळे तुम्हाला कोणतेही आर्थिक नुकसान झाले असल्यास तुम्ही फ्लिपकार्ट कस्टमर सपोर्ट टोल फ्री नंबर क्रमांकावर त्वरीत संपर्क साधून आमच्यापर्यंत पोहचू शकता 1800 208 9898. आम्ही तुमची ऑर्डर रद्द करण्याचा प्रयत्न करून आणि जिथे जिथे फ्लिपकार्टचे नियंत्रण व जिथे व्यवहार्य असेल तिथे तुमचे पैसे परत तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करू. इतर प्रकरणांमध्ये तुम्हाला अधिकृत तक्रार नोंदविण्यासाठी तुमच्या बँकांमध्ये आणि संबंधित सायबर क्राइम पोलिस ठाण्यांमध्ये संपर्क साधावा लागेल. संशयित खरेदीदारांची माहिती आम्ही थेट तुम्हाला देणार नाही. प्रत्येक प्रकरणानुसार, कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या संस्थांनाच संशयित खरेदीदारांची माहिती दिली जाईल.

तुम्ही केलेले सहाय्य तुमच्यासारख्या ग्राहकांना आणि सामान्य जनतेला अशा प्रकारच्या फसवणुकींपासून वाचवण्यासाठी उपयोगी ठरू शकते. कुठल्याही प्रकारच्या संशयित हालचालींची माहिती फ्लिपकार्टच्या कस्टमर सपोर्ट टोल फ्री नंबर वर कळवा 1800 208 9898. तुम्ही आम्हाला ई-मेलही पाठवू शकता किंवा फ्लिपकार्ट अ‍ॅपमधून आमच्याशी चॅटही करू शकता (स्क्रीनशॉट पहा):

fraudulent

फ्लिपकार्ट माहितीच्या सुरक्षिततेकडे गांभीर्याने पाहते आणि सातत्याने त्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करते. यापूर्वी आम्ही अशा प्रकरणांचा तपास केला होता आणि फसविणार्‍यांविरूध्द, घोटाळेबाजांविरूध्द तसेच तोतया लोकांविरूध्द कायदेशीर कारवाई करण्याबरोबरच सातत्याने आमच्या प्रणाली आणि प्रक्रिया अधिक मजबूत करत आलो आहोत. कृपया भारतातील ऑनलाईन शॉपिंगच्या संदर्भात ग्राहकांच्या डेटाची सुरक्षितता वाढविण्यासाठीच्या आमच्या प्रयत्नात आम्हाला मदत करा.


हे ही वाचा

फ्लिपकार्टवरील खोट्या नोकर्‍या आणि बनावट नोकरभरती प्रतिनिधींपासून सावध रहा.

फ्लिपकार्टवर बनावट रिव्ह्यूज्? त्यांवर विश्वास ठेवण्यापूर्वी हे वाचा

Enjoy shopping on Flipkart