विना व्यत्यय स्वप्ने:सुरत मधील एक कौटुंबिक व्यवसाय ई-कॉमर्सच्या माध्यमातून अनिश्चितेतून मार्गक्रमण करत आहे

Read this article in ગુજરાતી

अंकुर तुलसियनच्या खांद्यावर मोठी जबाबदारी पडली जेव्हा त्यांच्या वडिलांनी पिढ्यान्पिढ्या असलेला टेक्सटाईल व्यवसाय त्याच्या हाती दिला. व्यवसायाला नवीन उंचीवर नेण्याच्या मोठ्या स्वप्नांसह, अंकुरने फ्लिपकार्ट विक्रेता बनण्यासाठी स्वाक्षरी केली. नवीन भागिदारीची फळे त्याला त्यांच्या उत्पनाचा प्रवाह अगदी आव्हानात्मक काळातही राखण्यासाठी त्याला मदत करणारा ठरला. येथे त्याची कथा आहे, त्याच्या स्वतःच्या शब्दात

selling online

या कथेमध्ये: या फ्लिपकार्ट विक्रेत्याला ऑनलाइन विक्री करताना अनिश्चिततेतून मार्गक्रमण करत असताना, त्याला त्याचा कौटुंबिक व्यवसाय विस्तारीत करण्यास मदत झाली, आणि त्याच्या व त्याच्या पूर्वजांचे स्वप्ने पूर्ण करण्यास मदत झाली!

टेक्सस्टाईल उद्योग हा सुरत, गुजरातमध्ये मोठ्या विस्तृत प्रमाणात पसरलेला आणि सर्वात जुन्या उद्योगांपैकी एक उद्योग आहे. यामुळेच या शहराला भारताचे सिल्क शहर म्हणून लौकिक प्राप्त झालेला आहे. शहराच्या लोकसंख्येपैकी बराचसा भाग हा टेक्सस्टाईल उद्योगाशी संबंधित आहे आणि शहर हे देशातील टेक्सस्टाईल व्यवसायासाठी व्यावसायिक हब म्हणून टिकून राहिलेले आहे.

सुरत मधील अनेक टेक्सस्टाईल व्यवसाय मालकांमध्ये फ्लिपकार्ट एक विक्रेता पिढ्यानपिढ्या चालू असलेला कौटुंबिक व्यवसाय हाती घेऊन चालवत आहे. ई-कॉमर्सच्या जगामध्ये प्रवेश करणे आणि ऑनलाइन विक्री करणे या विक्रेत्याला त्याचा व्यवसाय नवीन उंचीवर नेण्यासाठी मदत करणारे ठरले ज्यांची त्यांच्या वाडवडिलांनी फक्त कल्पनाच केली असेल. ही अंकुर तुलसियनची कथा आहे, त्याच्या शब्दात.


माझे नाव अंकुर तुलसियन आहे आणि माझ्या ब्रॅण्डचे नाव आनंद सारीज आहे. पिढ्यानपिढ्या माझे कुटुंब सुरतच्या टेक्सटाईल्स उद्योगामध्ये नाव कमावत आहे आणि आता आम्ही ती परंपरा अधिक समृद्ध करत आहोत. माझे वडील दिल्लीमध्ये लहानाचे मोठे झाले. त्यांनी सुरतला स्थलांतरीत होण्यापूर्वी तिथे काही काळ काम केले. माझा जन्म येथे झाला आणि माझे सगळे आयुष्य इथेच गेले आहे


एक मौल्यवान विक्रेता आणि भागिदार असलेला, आनंद सारीजचा अंकुर याने या आव्हानात्मक काळात फ्लिपकार्टने केलेल्या सहाय्यासाठी फ्लिपकार्टचे आभार मानणारा आणि त्याच्या व्यवसायाच्या ठिकाणी घेत असलेली सुरक्षाविषयक खबरदारी ग्राहकांना दाखवणारा एक ह्रदयस्पर्शी व्हिडिओ तयार केलेला आहे. अधिक माहितीसाठी व्हिडिओ पहा:


आम्ही मुख्य उत्पादनामध्ये किंवा आमचे इन-हाऊस उत्पादनामध्ये गुंतलेले आहोत. धागा बनवण्यापासून ते तयार साडीपर्यंत, सर्व काही आमच्या येथेच बनवले जाते. आमचे विणण्याचे युनिट आणि प्रोसेसिंग हाऊस सुद्धा आहे. आमचे सुरत मध्ये किरकोळ विक्रीचे दालन नाही, मात्र आमचे होलसेल विक्रीचे दालन आहे.

खास करून टेक्सटाईल उद्योगासाठी ऑनलाइन विक्री करणे आणि ऑफलाइन विक्री करणे यामधील पूर्ण फरक आम्हाला जाणवला आहे. ऑफलाइन विक्री करताना, आमच्या डिझाइन आणि मटेरियलला ग्राहक कशाप्रकारे प्रतिसाद देत आहेत ते पाहण्यासाठी कोणताही डेटा मिळवण्यासाठी आम्हाला जवळपास सहा महिने वाट पाहावी लागते. किरकोळ दालनामध्ये आम्ही काय ऑफर करत आहोत ते ग्राहकांनी ब्राऊझ करायला सुरूवात करेपर्यंत आम्हाला वाट पाहावी लागायची आणि त्यानंतर ग्राहकाच्या अभिप्रायावर कुठल्या बाबतीत सुधारणा करायची ते ठरवावे लागायचे. ऑनलाइन, प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद आहे. आमची उत्पादने सूचीबद्ध केल्यापासून एका आठवड्याच्या आत, आम्ही डिझाइन कसे सुधारू शकू आणि टेक्सस्टाईलमधील अधिक श्रेणीमध्ये कसे विस्तार करू शकू याबद्दल वापरयोग्य डेटा आम्हाला मिळतो. डेटा बदलत्या ट्रेण्डबद्ल देखील अपडेट ठेवतो. आम्हाला ग्राहकाचा अभिप्राय अगदी तत्काळ मिळतो आणि तो आम्हाला जुळवून घ्यायलाही मदत करतो.

“ऑनलाइन आणि ऑफलाइन विक्री करण्यामधील फरक हा ग्राहकांच्या अभिप्रायानुसार नाटक आणि सिनेमा यांच्यात जसा फरक आहे तसा आहे. ऑनलाइन विक्री करताना, तुम्हाला तुमच्या प्रेक्षकांचा प्रतिसाद थेट आणि तत्काळ पहावयास मिळतो. – अंकुर तुलसियन, आनंद साडी, फ्लिपकार्ट विक्रेता

कोविड-19 च्या लॉकडाउनमध्ये, आमच्या टेक्सस्टाईलची विक्री कमी झाली होती. जीवनावश्यक नसलेल्या वस्तूवरील सरकारचे प्रतिबंध हटण्याची मी वाट पाहत होतो आणि ते जेव्हा आले, तेव्हा मी कर्मचाऱ्यांसाठी पासेस आणले आणि सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक असलेली सर्व प्रकारची खबरदारी लागू केली. . आमची फ्लिपकार्ट सोबतची भागिदारी अतिशय लाभदायक होती, मी फ्लिपकार्ट विक्रेता बनल्यानंतर, मला व्यवसाय वाढवायच्या अनेक संधी दिसल्या.

फ्लिपकार्टबरोबर काम करताना मला माझ्या व्यवसायासाठी भरपूर मदत झाली. ते एक स्वप्न सत्यात उतरले!

जिष्णू मुरली यांना सांगितले तसे, पल्लवी सुधारक यांनी पुरविलेल्या अतिरीक्त माहितीसह

हे देखील वाचा: फ्लिपकार्ट वर ऑनलाइन विक्री करताना, घरची ओढ असलेला या उद्योजकाला त्याचा घराचा रस्ता परत सापडला!

Enjoy shopping on Flipkart